मरीन इंजिनीअरिंग या क्षेत्राचे स्वरूप आणि संधींची सविस्तर माहिती
एखादी व्यक्ती जेव्हा इंजिनीअरिंगला आहे असे आपल्याला कळते, तेव्हा आपल्या मनात पटकन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल किंवा सिव्हिल हेच पर्याय येतात. शेवटी हे सर्व पारंपरिक इंजिनीअरिंगशी संबंधित अभ्यासक्रम आहेत. भारतातील बहुसंख्य विद्यार्थी हेच पर्याय निवडतात. यामागील कारण म्हणजे बहुतेकवेळा पालकांचा सल्ला (दबाव), अन्य अभ्यासक्रमांबाबत जागरूकतेचा अभाव, तसेच पारंपरिक अभ्यासक्रम निवडण्यामागील सुरक्षितता हेच असते. तुम्हाला असे वाटत नाही का, की रुळलेली पायवाट सोडून नवीन काही तरी निवडण्याची हीच वेळ आहे? असा एखादा अभ्यासक्रम ज्यात साहस तर आहेच, पण स्पर्धेचा तणाव नाही आणि तो आकर्षकही आहे.. मरीन इंजिनीअरिंग हा अशा प्रकारचा एक आश्वासक अभ्यासक्रम आहे, पण पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडे हा अभ्यासक्रम आजही तितकासा लोकप्रिय नसल्यामुळे करिअरविषयक पर्याय म्हणून विद्यार्थी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
सुरुवातीला आपण मरीन इंजिनीअरिंग म्हणजे काय, ते समजून घेऊया. मरीन इंजिनीअरिंगमध्ये डिझाईन, ऑपरेशन आणि शिप मशिनरी तसेच इंजिनशी संबंधित सेवा यांची माहिती दिली जाते. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने जहाजाचे बांधकाम आणि देखभाल याच्याशी निगडित असून, अन्य सागरी वाहनांचाही समावेश आहे. मरीन इंजिनीअरिंग प्रामुख्याने मशीन चालवणाऱ्या इंजिन क्रूच्या देखभालीशी संबंधित आहे. ते प्रामुख्याने इलेक्ट्रिकल मोटर्स, स्टीम इंजिन्स आणि प्रोपलसिव्ह इंजिन यांचे कार्य सुरळीतपणे चालेल यावर नियंत्रण ठेवतात. मरीन इंजिनीअर सातत्याने टर्बाईन, शिपबोर्ड, पारंपरिक स्टीम, न्यूक्लिअर प्रोपल्शन आणि डिझेल इंजिन यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी प्रयत्नशील असतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर मरीन इंजिनीअर हे प्रामुख्याने जहाजामधील महत्त्वपूर्ण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल उपकरणांची दुरुस्ती, देखभाल तसेच कामकाज याकरता जबाबदार असतात. या कामाच्या स्वरूपासोबतच हे जबाबदारीने पेलणे, उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचा सामना करणे आणि घरापासून दीर्घकाळ दूर राहणे या बाबी येतात. मरीन इंजिनीअरने केलेले कठोर परिश्रम, त्याग याचा मोबदला त्यांना सुरुवातीपासूनच मिळणाऱ्या मोठमोठय़ा आकडय़ातील वेतनातून मिळतो.
मालवाहू जहाजामध्ये अनेक विभाग असून त्यात व्यावसायिक आणि मरीनसंबंधी काम करणारे असतात. सुरुवातीला डेक साइड जॉब दिला जातो. नंतर पदोन्नती होत चीफ इंजिनीअरपदापर्यंत पोहोचता येते. जहाजावरील इलेक्ट्रॉनिक नेव्हिगेशन आणि अन्य आधुनिक उपकरणे यामुळे मरीन इंजिनीअरच्या नोकरीला आज चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. जहाजावरील गुंतागुंतीच्या यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन तेच करत असून, महासागरातून पार पडायला मदत करतात. मरीन इंजिनीअर्सना मालवाहू जहाजे, कंटेनर जहाजे किंवा ऑइल व गॅस टँकरवर काम करावे लागते. मरीन इंजिनीअरिंगमधील काही रोजगार क्षेत्रांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण, ऑफशोअर ऑइल रिकव्हरी, मरीन मेटल्स आणि कोरोशन, विजेची पुनर्निर्मिती, रिमोट सेिन्सग, नेव्हल आíकटेक्चर, डिफेन्स, ग्लोबल क्लायमेट मॉनिटरिंग आणि मरीन ट्रान्स्पोर्टेशन यांचा समावेश असून, हे हळूहळू लोकप्रिय होत आहेत. बँक, हॉटेल, वीजप्रकल्प यासारख्या अन्य क्षेत्रांमध्ये मरीन इंजिनीअरकरिता संधी उपलब्ध असून याखेरीज सरकारी तसेच भारतीय नौदलाकरता काम करण्याची संधी असते.
अमर्यादित थरार आणि साहस
जे मरीन इंजिनीअर व्यापारी जहाजांवर काम करतात, त्यांच्याकरता तर कोणतीही अतिरिक्त किंमत न मोजता जगभरातील आकर्षक ठिकाणे पाहता येण्याची संधी सहज उपलब्ध होते. आपल्यापकी बहुतेकजण परदेश दौरा करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करतात, मात्र मरीन इंजिनीअरना संपूर्ण जग पाहण्याची संधी मिळते. थरार आणि साहसाबरोबरच या करिअरसंबंधी पर्यायामध्ये आपल्याला आदर व व्यावसायिक समाधानही मिळते.
सेवेचा कालावधी
मरीन इंजिनीअरना जवळपास १५-२० वष्रे घरापासून दूर व्यतीत करावी लागतात. त्यानंतर त्यांना सहजपणे शीपयार्ड, मेरीटाईम युनिव्हर्सटिी किंवा शििपग कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये काम मिळू शकते.
वेतन आणि अन्य लाभ
मरीनसंबंधीचे तांत्रिक काम हे पुरस्कार देणारे आणि समाधानकारक असते. अनेकदा ही गोष्ट लक्षात येत नाही की, अन्य अभियांत्रिकी शाखांमध्ये मिळणाऱ्या वेतनापेक्षा मरीन इंजिनीअरला अधिक वेतन मिळते. जर एखाद्याने ऑईल टँकरमध्ये काम करण्याचे निश्चित केले, तर त्याला र्मचट नेव्हीपेक्षा किती तरी अधिक पटीने वेतन मिळेल. त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात मरीन अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारीचे व अधिकाराचे पद मिळते, तसेच कठोर परिश्रम करणाऱ्यांना कमी कालावधीत करिअरमध्ये वरच्या अधिकारांपर्यंत पोहोचता येते.
जहाजांवरील कनिष्ठ अभियंत्याला ३० हजार रु. दर महिना यानुसार मोफत बोìडग आणि लॉजिंगसमवेत मिळतात. लेखी परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्याला व्यापारी जहाजावर वॉच कीिपग इंजिनीअर ऑफिसरची जागा मिळू शकते. त्यानंतर सेकंड इंजिनीअर आणि चीफ इंजिनीअर म्हणून जहाजावर काम मिळू शकते. मुख्य अभियंत्याला दर महिना दीड लाख रु. किंवा त्याहून अधिक प्राप्त होतात. कनिष्ठ अभियंता अधिकाऱ्याला मुख्य अभियंत्यापर्यंत पोहोचायला सहा ते सात वष्रे लागतात. मात्र त्याकरिता वैयक्तिक पात्रता तसेच कामाच्या संधींची आवश्यकता आहे.
अन्य इंजिनीअरच्या तुलनेत मरीनरचे कामाचे आयुष्य अधिक असते. बाकीच्या लोकांना ११५ दिवस मिळत असले, तरी त्यांना १५० दिवस काम करता येते.
या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सागराविषयी प्रेम आणि फिरण्याची आवड असावी लागते. मरीन इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकरिता बारावी किंवा तत्सम परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) किमान ६० टक्क्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. आकर्षक वेतन, उत्तम जीवनमान आणि जग पाहण्याची संधी मरीन इंजिनीअरिंग क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे उपलब्ध होऊ शकते.
अनिश चक्रबोर्ती
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सीकॉम ग्रुप