महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेअंतर्गत पुण्याच्या ससून रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  प्रवेशाकरता पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
पदव्युत्तर समुपदेशन प्रमाणपत्र अभ्यासक्रम : (कालावधी एक वर्ष)-अर्जदारांनी मानसशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
मनो-सामाजिक पुनर्वसन व समुपदेशन प्रमाणपत्र अभ्यासक्रम :  (कालावधी एक वर्ष)- अर्जदारांनी समाजकार्य, समाजशास्त्र वा मानसशास्त्र या विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
या दोन्हीही अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांची संख्या प्रत्येकी १२ असून उमेदवारांनी अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण केल्यावर संबंधित क्षेत्रात तीन वर्षांची उमेदवारी करणे आवश्यक आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक अर्जदारांना २५-२६ ऑगस्ट २०१४ रोजी अनुक्रमे लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी आपल्या अर्जासह १५० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी १०० रु.चा)  डिमांड ड्राफ्ट पाठवावा. हा डिमांड ड्राफ्ट मा. संचालक- प्राध्यापक, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे यांच्या नावाने काढलेला व पुणे येथे देय असणारा असावा.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुण्याची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २६१२७३३१ वर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज संचालक- प्राध्यापक, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून रुग्णालय परिसर, पुणे- ४११००१ या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.