या लेखाद्वारे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेची माहिती आपण करून घेऊयात.
पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालय साहाय्यक पदांकरता परीक्षा स्वतंत्रपणे राबवल्या जातात. या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक १चा अभ्यासक्रम सारखाच आहे, परंतु मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक २च्या अभ्यासक्रमाचा आकृतिबंध संबंधित पदाच्या जबाबदारीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळा आखलेला आढळून येतो. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक २ मध्ये अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेष भर दिल्याचे जाणवते.
मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाचा आकृतिबंध
आयोगाच्या संकेतस्थळावर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तर दिलेला आहे.
पेपर क्रमांक १ :
मराठी व इंग्रजी अभ्यासक्रम –
सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, उताऱ्यावरील प्रश्न.

पेपर क्रमांक २ :
सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम
राष्ट्रीय तथा जागतिक चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल व आधुनिक इतिहास, भारतीय राज्यघटना, माहितीचा अधिकार अधिनियम-२००५, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, नियोजन- पहिली ते दहावी पंचवार्षकि योजना, ७३वी आणि ७४वी घटनादुरुस्ती, शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आíथक सुधारणा व कायदे, एलपीजी धोरण, जागतिक व्यापार संघटना, मूल्यवíधत करप्रणाली, वस्तू आणि सेवा कर, त्या अनुषंगाने होऊ घातलेले बदल, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल चळवळ, जागतिक व्यापार महासंघ, जागतिक बँक, पतमूल्यांकन संस्था आणि पद्धत, सार्वजनिक वित्त व्यवस्था- करप्रणाली, अर्थसंकल्प, तूट व तुटीचे प्रकार, राजकोषीय धोरण आणि सुधारणा, शून्याधारित अर्थसंकल्प व इतर संकल्पना इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
पेपर क्रमांक १ : मराठी व इंग्रजी
पेपर क्र. २ : सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी
या पेपरमध्ये १०० प्रश्न सोडवावे लागतात. त्यातील उपघटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विभाजन पुढीलप्रमाणे आहे-
विश्लेषणाची निकड
२०१४ सालच्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत बुद्धिमापन आणि अंकगणितावर आधारित १५ पकी १२ प्रश्न ताíकक क्षमतेवर आणि केवळ ३ प्रश्न अंकगणितावर विचारण्यात आले होते. अर्थशास्त्र आणि
भारतीय अर्थव्यवस्थेवर ८५ पकी तब्बल ४८ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या विषयाचे महत्त्व इथे ठसठशीतपणे अधोरेखित होते.

संदर्भ साहित्य सूची
मराठी आणि इंग्रजी : या विषयाची तयारी करताना माध्यमिक शालेय स्तरावरील व्याकरणाच्या पुस्तकांचा वापर करावा. आयोगाचे मागील वर्षांचे पेपर अभ्यासावे. इंग्रजी विषयाची तयारी करताना स्टाफ सिलेक्शन कमिशन-उॅछ परीक्षेचेमागील वर्षांचे पेपर अभ्यासल्यास नक्कीच फायदा होईल.
इतिहास : ‘एनसीइआरटी’चे सातवी ते बारावीच्या इतिहासाचे क्रमिक पुस्तक, राज्य मंडळाचे पाचवी, आठवी आणि अकरावीचे इतिहासाचे क्रमिक पुस्तक, इंडिया इयर बुकमधील संस्कृतीविषयक पाठ.
भूगोल : ‘एनसीइआरटी’चे सहावी ते बारावीचे भूगोलाचे क्रमिक पुस्तक‘, इंडिया इयर बुकमधील पाठ.
नागरिकशास्त्र : ‘एनसीइआरटी’ची राज्यशास्त्र विषयाची पुस्तके.
आíथक व सामाजिक विकास : ‘एनसीइआरटी’चे अकरावी आणि बारावीची क्रमिक पुस्तके, भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, इंडिया इयर बुकमधील पाठ, वार्षकि अंदाजपत्रक.
अंकगणित-तर्कक्षमता आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञान : या विषयावरील प्रश्नांचा सराव करण्यासाठी बँक क्लार्क व परिविक्षाधीन अधिकारी किंवा स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या गतवर्षांच्या सोडवलेल्या प्रश्नासंचांचा वापर करता येईल.
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ : प्रत्यक्ष अधिनियम, इंटरनेट आणि यशदाचे संकेतस्थळ इत्यादींचा वापर करायला हवा.
अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था- ४८ प्रश्न.
चालू घडामोडी- ५ प्रश्न.
बुद्धिमत्ता चाचणी- १५ प्रश्न.
महाराष्ट्राचा भूगोल- ६ प्रश्न.
महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास- ६ प्रश्न.
भारतीय राज्यघटना- ११ प्रश्न.
माहिती अधिकार अधिनियम २००५- ४ प्रश्न.
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान- ८ प्रश्न.

12

123