मूलभूत विज्ञानातील संशोधन युरोपमधील सर्व विकसित देशांमध्ये मोठय़ा पातळीवर सुरू आहे. यातल्या प्रमुख शाखांपकी एका म्हणजे ‘जैवविज्ञाना’तील संशोधनामध्ये इंग्लंड तिथल्या इतर देशांच्या तुलनेत खूपच आघाडीवर आहे. बायोसायन्सेसमधील तेथील संशोधन संस्था व शास्त्रज्ञांच्या कामावर एक नजर टाकल्यावर हे लक्षात येते. २००७ मधील जीवशास्त्रातील नोबेल पारितोषिक सर मार्टनि इव्हान्स यांच्या रूपाने इंग्लंडला मिळाले. ते ज्या ठिकाणी स्वत:चं संशोधन करायचे तो विभाग म्हणजे काíडफ विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ बायोसायन्सेस’. २०१३ च्या ऑक्टोबरमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी व त्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी या विभागाकडून ३० एप्रिल २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी
इंग्लंडमधील प्रख्यात ‘काíडफ विद्यापीठ’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ असून बायोसायन्सेसमध्ये इंग्लंडतील सध्याच्या ‘टॉप १०’ च्या यादीमध्ये या विद्यापीठाचा समावेश आहे. ‘संडे टाइम्स’ने यावर्षीच्या आपल्या विद्यापीठ मार्गदर्शकामध्ये या विद्यापीठाबद्दल ‘Cardiff is everything a good university should be’ असे गौरवोद्गार लिहिले आहेत. ‘काíडफ’ मधून पदवी मिळवणे हे जगभर मानाचे समजले जाते कारण शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत विद्यापीठ आग्रही असून इथल्या उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनामुळे विद्यापीठ जागतिक संशोधन क्षेत्रात नामांकित आहे. काíडफ विद्यापीठाला त्यामुळेच संशोधनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘रसेल ग्रुप’चे सदस्यत्व मिळाले आहे. दरवर्षी विद्यापीठाच्या विविध विभागात शंभरपेक्षा जास्त देशांमधून हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात व यशस्वीपणे त्यांचे पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. काíडफ विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ बायोसायन्सेस’ या विभागाची ख्यातीदेखील अशीच आहे. या विभागामध्येच फक्त बायोसायन्सेसशी संबंधित ३०० पेक्षाही अधिक पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठाच्या याच विभागामध्ये म्हणजे ‘काíडफ स्कूल ऑफ बायोसायन्सेस’मध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनेक अर्धवेळ व पूर्णवेळ शिष्यवृत्ती नेहमी देण्यात येतात. विद्यापीठाच्या या विभागात असलेल्या सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधायुक्त अशा प्रयोगशाळा, अत्याधुनिक ग्रंथालये, उत्कृष्ट दर्जाचे अध्ययन व अध्यापन स्रोत, अनुभवी व उत्तम प्राध्यापकवर्ग, बायोसायन्सेसच्याच अनेक ज्ञानशाखांमध्ये चालणारे अविरत संशोधन या कारणांमुळेच बायोसायन्सेस विभाग संशोधनामध्ये अग्रेसर आहे.
शिष्यवृत्ती व पदवी कार्यक्रम
काíडफ विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ बायोसायन्सेस विभागाकडून ही शिष्यवृत्ती ‘Master of Research in Biosciences (M.Res)’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दिली जाते. शिष्यवृत्तीचा कालावधी एक वर्षांचा असून शिष्यवृत्तीची रक्कम मात्र विभागाने उघड केलेली नाही. ही शिष्यवृत्ती युरोपव्यातिरिक्त सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली आहे. या शिष्यवृत्तीमध्ये अर्जदाराच्या एकूण टय़ुशन फीच्या अर्धीच रक्कम त्याला दिली जाते. उर्वरित अर्धी रक्कम त्याला स्वत:ला उपलब्ध करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर संशोधन कौशल्यांना चालना देता यावी, हा या शिष्यवृत्तीचा हेतू आहे. म्हणूनच या पदवी कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शन विख्यात शास्त्रज्ञांकडून केले जाते. विद्यार्थ्यांने वर्षांच्या सुरुवातीलाच त्याचा प्रकल्प विषय व मार्गदर्शक निवडणे आवश्यक आहे. एक वर्षांच्या या पदवी कार्यक्रमामध्ये एकूण ६० टीचिंग क्रेडिट्स व १२० रिसर्च क्रेडिट्सचा समावेश आहे. संशोधन प्रकल्पाचा विषय मात्र मार्गदर्शकाच्या सहाय्याने ठरवला जाईल. थोडक्यात, ज्या विद्यार्थ्यांनी बायोसायन्सेसमधील आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि पुढे पी.एच. डी. करण्याचा त्यांचा विचार आहे, त्यांना पी.एच. डी.ची पूर्वतयारी म्हणून एक वर्षांच्या या पदवीचा विचार निश्चित करता येईल.
आवश्यक अर्हता
‘काíडफ’च्या या पदवी कार्यक्रम व शिष्यवृत्तीसाठी जैवविज्ञान शाखेचा (Life Science) पदवीधर अर्ज करण्यास पात्र आहे. या कार्यक्रमासाठी किमान आवश्यक पात्रता जरी पदवीची दिली असली, तरी पदव्युत्तर अर्जदारांना प्राधान्य दिले जाते. त्याबरोबरच अर्जदाराकडे TOEFL अथवा IELTS या परीक्षांमध्ये काíडफ विद्यापीठाच्या नियमांनुसार किमान गुण असणे बंधनकारक.GRE, GMAT इत्यादी परीक्षा या शिष्यवृत्तीसाठी गरजेच्या नाहीत मात्र दिल्या असतील तर उत्तमच. अर्जदाराने बायोसायन्सेस स्कूल व आपल्या विषयाच्या संबंधित गाइडकडे अर्ज करण्याअगोदर इ-मेल अथवा दूरध्वनीवरून संपर्क करणे आवश्यक आहे. याबद्दल सर्व माहिती (दूरध्वनी क्रमांकासहित) विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिलेली आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्जदाराने या शिष्यवृत्तीला अर्ज करण्याअगोदर स्वत:चे शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव इ. बाबींनी सज्ज सी.व्ही. (Curriculum Vitae) PatersonRJ@cardiff.ac.uk‘ या ई-मेल आय डी वर पाठवून द्यावा. त्यानंतर अर्जदाराला ‘Master of Research in Biosciences (M.Res)’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा म्हणून एक औपचारिक अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्जदार विद्यापीठाच्या ऑनलाइन अर्जप्रक्रियेच्या माध्यमातून हा अर्ज भरू शकतो. अर्ज करताना अर्जदाराला ‘ऑक्टोबर २०१३ च्या प्रवेशासाठी’ हा पर्याय निवडावा लागेल. अर्जासोबत अर्जदाराला नोकरीच्या (किंवा व्यवसायाच्या) अनुभवाचे प्रशस्तीपत्र, दोन शैक्षणिक तज्ञांचे शिफारसपत्र, आतापर्यंतची सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स् आणि राष्ट्रीयत्वाचा व जन्मतारखेचा पुरावा देणारी कागदपत्रे स्कॅन करून जोडावी लागतील, किंवा admissions@cardiff.ac.uk  या इ-मेल आय डी वर इ-मेल करावी लागतील.
अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०१३ आहे.
महत्त्वाचा दुवा –
http://www.cardiff.ac.uk/