सौंदर्य केवळ वरवरच्या दिसण्यात नसून संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असतं. सौंदर्य तुमच्या हसण्यात, वागण्या-बोलण्यात, तुमच्या आयुष्याविषयीच्या दृष्टिकोनात असतं. सौंदर्य तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचता यात असतं, तुमच्या कळकळीत असतं. या नोकरीत या सगळ्याची गरज आहे. अनिताला फिरून एकदा तिला इंटरवूला विचारलेला प्रश्न आठवला- तुला एअर होस्टेस व्हावं असं का वाटतं?

अनिताने परत  एकदा आरशात स्वत:ला नीट न्याहाळलं. ड्रेस, केस, मेकअप सगळं ठीकठाक आहे ना पाहिलं. सिंगापूर फ्लाइटसाठीचं सकाळचं सहा वाजताचं रिपोìटग. हा सेक्टर तिला आवडायचा. मोठी ७४७ किंवा ७७७ विमानं, थोडा लांबचा पण फार लांबचा नसलेला ५-६ तासांचा प्रवास, जेट लॅगही कमी आणि पॅसेंजर्सही डीसेंट. फरक होता तो एकच. आज इन फ्लाइट सíव्हस मॅनेजर (पर्सर) असण्याचा तिचा पहिला दिवस होता! अख्ख्या फ्लाइटची जबाबदारी तिच्यावर होती! स्वत:चं स्क्रीिनग संपवून ती प्री-फ्लाइट ब्रीिफगसाठी आपल्या क्रूची वाट पाहात बसली.

अनिता लहानपणापासूनच सर्वाची आवडती. तिचा स्वभाव खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ. किती लहान असल्यापासून ती घरात सर्वाची चौकशी करीत असे. आजोबांना ‘जेवलात का?’ अशा बोबडय़ा स्वरात तिने विचारलं की त्यांचे डोळे पाण्यानं भरून यायचे. घरात कुणाला बरं नसलं की तिला त्यांची शुश्रूषा करायला खूप आवडायचं. मग त्या कापसाच्या घडय़ा असोत की थर्मामीटर लावणं. अनिताला कधी बरं नसलं तर घराच्या उत्साहाला खीळच बसायची. अनिताला मत्रिणीही खूप. कुठलीही पार्टी पिकनिक तिच्याशिवाय होणं शक्य नसे. कुठल्या मित्र-मत्रिणीला काय आवडतं याचा अनिता चालताबोलता कोश होता. एअर होस्टेसची करिअर हा या सगळ्याचा पुढचा अध्यायच होता जणू! फ्लाइटवर तर अनिताची छापच पडायची. कायम हसतमुख आणि उत्साही, काही लागल्यास मदतीला आतुर, कुणीही बोलवावं आणि हक्कानं काही सांगावं. एखाद्या प्रवाशानं काही वेगळी मागणी केली तर ‘पाहते हां आहे का?’ असं म्हणत परत येऊन ते आठवणीनं त्याला देणं. नसल्यास ‘सॉरी’ म्हटलं तरी प्रवाशाला तिनं प्रयत्न केल्याबद्दल कधीच शंका नाही आली. चारजणी आसपास दिसत असता प्रवाशानं अनिताला हाक देण्याची तिला सवय झाली होती. हां हां म्हणता आठ र्वष गेली. तिच्या या सगळ्या गुणांची कदर होऊन आज

ती पर्सर आहे!

एक एक करीत दहा जणांची तिची टीम हजर झाली. आज तिच्या टीममध्ये नॅन्सी होती. तिला नॅन्सीची जरा काळजी होती. गेले काही महिने नॅन्सीला आपलं वजन ताब्यात ठेवणं कठीण जात होतं. पण आजतरी तिचा बी.एम.आय. बॉर्डरलाइन चालण्यातला होता. बाकी ग्रूिमगबाबत तशी कुणाचीच काळजी तिला नव्हती. ड्रेसची स्वच्छता आणि एकंदर नीटनेटकेपणा सगळ्यांचाच उत्तम होता. सकाळी सकाळी गौरवचा हसरा चेहरा पाहून तिला छान वाटलं. नॅन्सीनं तर तिला आनंदानं मिठीच मारली. सगळीच टीम फ्रेश दिसत होती. अनिताने मग आपल्या या फ्लाइटच्या टीमला प्री-फ्लाइट ब्रीफ दिला. विमानाच्या मॉडेलपासून ते त्यातील सेफ्टीसंबंधीची सामग्री, त्यांच्या जागा, तिचा योग्य वापर, संपूर्ण फ्लाइटच्या दरम्यान लागणाऱ्या सíव्हसेस, त्यांचा क्रम, तिच्या टीममधील प्रत्येकाची नेमलेली जागा, प्रवाशांच्या काही स्पेशल गरजा असल्यास त्या. अशा सगळ्यांची उजळणी झाली. विमानाच्या बोìडगसाठी मग ती आणि तिची टीम टर्मिनलच्या बाहेर निघाले.

फ्लाइट नेहमीप्रमाणे स्मूथ पार पडली. विमानातले चेक्स, टेकऑफची तयारी, सेफ्टी ब्रीिफग, इन-फ्लाइट सíव्हस, कॉकपिटमधल्या स्टाफची देखभाल, लँडिंग, डय़ूटी फ्री वस्तू आणि पशांचा हिशोब, पुढच्या शेडय़ूलचं कन्फम्रेशन- सगळं काही व्यवस्थित आटोपलं. अनिता मग टीमबरोबरच हॉटेलला परतली. सिंगापूरमध्ये नेहमीच येणं-जाणं असल्यानं बाहेर पडायचं, घ्यायचं असं काहीच नव्हतं. त्यामुळं झोप आणि मग रिटर्न फ्लाइट एवढाच काय तो प्रोग्रॅम होता.

हॉटेलवर परतल्यानंतर आपल्या रूमवर अनिता आरशासमोर मेकअप उतरवायला उभी राहिली. थकव्यानं अंग जड झालं होतं. तब्बल आठहून अधिक र्वष झाली तिला या करिअरमध्ये. काही दिवसांपूर्वीच  पर्सर (इन फ्लाइट सíव्हस मॅनेजर) चं प्रमोशन तिला मिळालं होतं. वय थोडंसं चेहऱ्यावर दिसू लागलं होतं. तिचे डोळे अचानक पाणावले. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिनं दहा वर्षांची असताना उत्साहानं आईला आपल्याला एअरहोस्टेस बनायचंय म्हटलं आणि आईनं तिला म्हटलं होतं, ‘तुला ढीग वाटतं आहे गं, पण तुझ्या काळ्या रंगाचं काय करायचं? वर दिसणंही अगदी चारचौघींसारखं. कोण देणार आहे गं एअर होस्टेसची नोकरी तुला! ’ तेव्हा खूप लागलं होतं ते बोलणं तिच्या कोवळ्या मनाला.

वाढत्या वयात सुंदर नसण्याचं वजन मग तिनं कायमच वागवलं. शाळेत, कॉलेजात मत्रिणींमध्ये सुंदर दिसण्याचं कौतुक आणि सुंदर दिसणाऱ्यांचं कौतुक ऐकत-पाहतच ती वाढली, मोठी झाली. मुलींच्या जगातलं सुंदर असण्याचं, दिसण्याचं, ते टिकवून ठेवण्याचं स्तोम पाहून तर कधी कधी तिटकाराच यायचा. बोलण्याचे विषयही तेच, त्याच त्याच प्रकारचे. कॉलेजमधल्या तिच्या वर्गातल्या काही मुलींचा यासाठी ोइतका वेळ जायचा की त्यानां दुसरं काही करायला वेळच नाही उरायचा. कधी प्रसंगी तिनं कुणाला हे समजावून सांगायचा प्रयत्न केला की सगळ्या तिला उडवून लावायच्या. ‘तू  स्वत: नाहीस ना छान, म्हणून आहे तुझं हे तत्त्वज्ञान’ असं त्यांच्या नजरेत तिला स्वच्छ दिसायचं. हळूहळू मोजक्याच मत्रिणी उरल्या तिला. पण तिने ग्रॅज्युएशन करताना बेसिक जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकून घेतल्या. ओळखीच्या दोन-तीन जणांशी बोलून बोलून कामचलाऊ तमिळ भाषाही शिकून घेतली एक दाक्षिणात्य भाषाही यावी म्हणून. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या भाषा येणं खूप प्रभावी ठरणार होतं. तिनं काही सामाजिक, स्वयंसेवी संघटनांबरोबर कामं केली. आपल्याला लोकांबरोबर असणं आवडतं आणि जमतंही, हे मनोमन कळून चुकलं होतं. एअर होस्टेस होता येईल असा विश्वास मग तिला वाटायला लागला होता. आरशासमोर उभं राहिल्यावर अनिताला हे सगळं आठवत गेलं.

पुढचे अनेक आठवडे ती सिंगापूर सेक्टरवरच होती. पर्सरची ही जबाबदारी आता  हळूहळू तिच्या सवयीची होऊ लागली होती. कॅप्टन्सचे तिच्याबद्दलचे फीडबॅकही चांगले येऊ लागले होते. तिच्या हाताखालच्या क्रूमधलेही बरेच जण त्या सेक्टरला रेग्युलर होते. त्यामुळे टीममध्ये परस्परांमधील सामंजस्यही चांगलं असे. अशाच एका रात्री दीडच्या फ्लाइटला तिच्या टीम रोस्टरवर तिला एक नवीन नाव दिसलं- सलोनी सिंग. सलोनी, एका नावासरशी सगळं लख्खं जागं झालं तिला. दोघींनी एकाच बॅचला इंटरवू दिला होता.

अनिताला इंटरवूचा तो दिवसही नीट आठवत होता. अनेक मुली होत्या त्या दिवशी. पण सगळ्या मुलींचं लक्षं फक्त एकीकडं होतं सलोनीकडे. सलोनीकडे निसर्गदत्त देखणेपण होतं, अगदी वळून वळून पाहावं असं. इतकं की त्या दिवशी इतर सगळ्या जणींच्या मनात येऊन गेलंच असणार ‘तिच्यासाठी तर काय पायघडय़ाच असणार आहेत.’ सलोनीबाईंना ते कळलंय हे तिच्या चेहऱ्यावर अगदी नीट दिसत होतं. अनिताची स्थिती नेमकी त्याच्या उलट होती त्या दिवशी. ‘ती इथे काय करते आहे?’, असं अनेक जणींच्या नजरेत स्वच्छ वाचता आलं तिला. अर्थात याची बऱ्यापकी सवय असल्यानं तिनं त्याच्यांकडे दुर्लक्ष केलं.

फायनल इंटरवूलाही पुन्हा तोच प्रश्न तिच्यासमोर आला, ‘एअर होस्टेस व्हावं असं तुला का वाटतं?’ विचारणाऱ्यानं साळसूदपणे विचारलं होतं. अनितानं आवंढा गिळला. शांतपणे म्हणाली, ‘मी स्वत: लोकांशी चांगलं जोडून घेऊ शकते. एक चांगली होस्टेस व्हायला ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं.’ मग ती पुढे बोलत राहिली, स्वयंसेवी संघटनांमार्फत केलेली कामं, त्यातून आपत्तीच्या वेळी निभावलेल्या जबाबदाऱ्या. अनिताचा रेझ्युमे पाहून इंटरवू पॅनेलचं कुतूहल जागं झालं असावं- तिने इतक्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या ना! सगळ्या प्रसंगांमध्ये लोकांबरोबर, लोकांसमवेत कामाचा अनुभव दिसत होता, अनेक भाषा माहीत असल्याचा फायदाही दिसत होता. इंटरव्ह्य़ू चांगलाच झाला.

एका आठवडय़ातच अनिताला नोकरीचा कॉल आला होता. सलोनीचीही निवड झाली हे तिला ट्रेिनगच्या वेळेस कळलं. तब्बल २८ दिवसांचं ट्रेिनग. खूप कठीण, खूप घाम गाळणारं. या ट्रेिनगमध्येही अनिता पहिली आली होती. सलोनीनं मात्र ते ट्रेिनगही काठाकाठावरनंच केलं होतं. तिचा सगळा आविर्भाव माझं सौंदर्यच मला सगळ्यातून तारून नेईल’ असा होता.

एअर होस्टेसेसचं जग छोटं. त्यात फारसं काही लपून राहात नाही. त्यात सलोनीबद्दल सुरुवाती-सुरुवातीला तर खासच ऐकू यायचं. बहुतेक वेळा नकारात्मकच. तिचं टीमप्लेअर नसणं, सगळं आवश्यक तेवढंच करणं, स्वत:ला जरा जास्तच सांभाळून असणं. हळूहळू सलोनीबद्दल फारसं काही ऐकूच येईनासं झालं. हे नावही मागे पडल्यासारखं झालं होतं अनिताला. आज एकदम सगळं जागं झालं. सलोनी हजर झाल्यावर अनिताने टीमला प्री-फ्लाइट ब्रीफ दिला. सलोनीची इतर लोकांना ओळख नसावी, म्हणून अनिताने सगळ्यांना आपापली ओळख करून द्यायला सांगितली. सलोनीची पाळी आली तेव्हा तिनं केवळ नाव आणि आठ वर्षांचा डोमेस्टिक फ्लाइटचा अनुभव एवढीच जुजबी माहिती दिली. देहबोलीही अगदीच ताठर होती. नॅन्सीनं अनिताच्या मनातला प्रश्न नेमका विचारला- ‘इंटरनॅशनलची पहिलीच खेप?’ उत्तर ‘हो’ आलं.

सलोनी आणि अनिता एकाच वेळी जॉइन झाल्या होत्या. म्हणजे सलोनीलाही आठच्या वर र्वष झाली. म्हणजे इतकी र्वष ती डोमेस्टिकलाच अडकली होती! तेही निव्वळ एक फ्लाइट अटेंडन्ट म्हणून. अनिताला वाईटही वाटलं आणि अभिमानही. अभिमान वाटला स्वत:च्या कर्तृत्वाचा, प्रगतीचा, आठ वर्षांत जे मिळवलं होतं त्याचा. वाईट वाटलं सलोनीचं. सलोनीला कळलंच नाहीय बहुतेक.. सौंदर्य केवळ वरवरच्या दिसण्यात नसून संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असतं. सौंदर्य तुमच्या हसण्यात, वागण्या-बोलण्यात, तुमच्या आयुष्याप्रतिच्या दृष्टिकोनात असतं. सौंदर्य तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचता यात असतं, तुमच्या कळकळीत असतं. या नोकरीत या सगळ्याची गरज आहे. अनिताला फिरून एकदा तिला इंटरवूला विचारलेला प्रश्न आठवला- ‘तुला एअर होस्टेस व्हावं असं का वाटतं?’

palsule.milind@gmail.com