देशातील फार्मसी संबंधित उद्योगांच्या वाढीचा दर १५ ते २० टक्के असा आहे. ही आकडेवारी आगामी काळातील फार्मसी क्षेत्रांतील उपलब्ध संधीचे महत्त्व पटवून देते. देशातील अनेक फार्मसी कंपन्या दुर्धर आजारांवर संशोधन करत आहेत. आरोग्यविषयक सॉफ्टवेअर विकसित होत आहे. त्यामुळे फार्मसी म्हणजे फक्त औषधाचे दुकान ही ओळख आता नाहीशी होत आहे.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

औषधनिर्माणशास्त्रात (फार्मसी) सध्या डिप्लोमा इन फार्मसी आणि बीफार्म करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. डीफार्म करून औषधांचे दुकान आणि बीफार्मनंतर दुकान थाटण्याचा किंवा नोकरीचाच विचार केला जात होता; परंतु गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे. औषध कंपन्यांसोबत अन्न उद्योग आणि रसायन कंपन्यांमध्येही फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मोठय़ा प्रमाणात गरज लागते. हे लक्षात घेत फार्मसीचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रम

  • डी.फार्म : विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन फार्मसी करता येते. कालावधी- दोन वर्षे. डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षांच्या (अंतिम वर्षांत) जर प्रथम वर्ग मिळाला तर देशातील कोणत्याही राज्याच्या विद्यापीठात अथवा महाविद्यालयात बी.फार्म पदवीच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळतो. डी.फार्म अभ्यासक्रमानंतर फार्मसीचे दुकान आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तसेच सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती, रिपॅकिंग करणे अशा उद्योगांत संधी उपलब्ध आहेत.
  • बी.फार्म : बारावीनंतर चार वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमानंतर फार्मसीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते. फार्मसीचे दुकान आणि मेडिकल रिप्रेझेंटिव्ह तसेच कॉस्मॅटिक प्रॉडक्शन, रिपॅकिंग करणे यांसारख्या उद्योगात संधी उपलब्ध आहेत.
  • एम.बी.ए फार्म.टेक- हा अभ्यासक्रम सध्या भारतात नव्याने सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमामध्ये तीन वष्रे फार्मसीसंबंधी शिकवले जाते, तर दोन वष्रे (एमबीए) व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असून तो ‘यूजीसीपीसीआय’ मान्यताप्राप्त आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रांत चांगली मागणी आहे.
  • एम.फार्म- फार्मसी क्षेत्रातील मास्टर्स डिग्री प्राप्त केल्यानंतर संशोधन क्षेत्रात काम करता येते. पदविका आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते. औषधनिर्मिती कंपनीतील विविध शाखांमध्ये काम करता येते.
  • एमएस एमएस इन फार्मास्युटिकल सायन्सेस- हा अमेरिकेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम २ वर्षे कालावधीचा असतो. यात वेगवेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
  • एमएस्सी. इन फार्मास्युटिकल सायन्सेस- कालावधी- एक वर्ष. तो इंग्लंड व युरोपांतील काही देशांत चालतो. यामध्येही वेगवेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. शेवटी संशोधन प्रकल्पावरही काम करावे लागते.
  • फार्म.डी. – ‘फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया’ने तयार केलेल्या फार्म.डी. नावाच्या जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाला केंद्र सरकारची मान्यता आहे. ‘डॉक्टर ऑफ फार्मसी’ असा याचा अर्थ आहे. हा अभ्यासक्रम ६ वर्षांचा आहे. प्रत्येक रुग्णाचे प्रोटोकॉल तयार करणे, नवीन औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे तयार करणे, योग्य औषधांची रुग्णाला माहिती देणे.  अ‍ॅडव्हर्स ड्रग्ज रिअ‍ॅक्शन अथवा ड्रग्ज इंटरअ‍ॅक्शनच्या संदर्भात माहिती गोळा करून त्याचे अहवाल तयार करणे. रुग्णालयाच्या अत्यावश्यक औषधांची यादी तयार करणे, रुग्णासाठी सुरक्षा कार्यक्रम तयार करणे व तो राबवणे, बाजारात आलेल्या नवीन औषधांची महिती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफला देणे, एखाद्या विषयात संशोधन करणे अथवा क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंटमध्ये किंवा क्लिनिकल ट्रायलसंबंधित संशोधन कार्यात मदत करणे अथवा प्रत्यक्ष भाग घेणे अशा प्रकारे फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा असतो. महाराष्ट्रात सध्या अमरावती पुणे येथे हा अभ्यासक्रम चालतो.
  • पीएच.डी इन फार्मास्युटिकल सायन्सेस हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम साधारणपणे २-३ वर्षे कालावधीचा असतो. याच वेगवेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. संशोधन करणे, नवीन औषधी मूलकणांचा शोध घेणे, त्याच्या इतर प्रक्रियांची रचना करणे व योग्य त्या स्वरूपात विकसित करणे असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे.

पीएच.डी पदव्युत्तर पदवीसाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात (PET) वेगवेगळी विद्यापीठे प्रवेश परीक्षा घेतात व त्यानुसार प्रवेश दिले जातात. ए.आय.सी.टी.ई. दरवर्षी जीपॅट (GPAT) नावाची एम.फार्मसी पदव्युत्तर पदवीसाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रवेश परीक्षा घेते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमातील स्पेशलायझेशन

क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स, क्लिनिकल फार्मसी /फार्मसी प्रॅक्टिस, हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्माकोलॉजी, फार्माकोलॉजी अ‍ॅण्ड टॉक्सिकोलॉजी, फार्माकॉग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री,  फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, बायो फार्मास्युटिक्स, इंडस्ट्रियल फार्मसी, रेग्युलेटरी अफेयर्स, फार्माको इकोनॉमिक्स, फार्माकोजिनोमिक्स, बायोइन्फॉर्मटिक्स, किमोइन्फॉर्मटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, कॉस्म्यास्युटिकल्स, फार्माको विजिलन्स, फार्मा मॅनेजमेंट.

केंद्र सरकारचा औषधनिर्मिती क्षेत्रातील शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असून सरकारने आयआयटीच्या धर्तीवर फार्मसीमध्येही नायपर (National Institute of Pharmaceutical Education & Research) सारख्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्थेत दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम १३ वेगवेगळ्या विषयांत करता येतो. अधिक माहितीसाठी खालील संस्थेच्या वेबसाइटवर ६६६.ल्ल्रस्र्ी१.ल्ल्रू.्रल्ल  अथवा संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्यावी.

करिअर संधी

  • होलसेल व रिटेल (स्वतंत्र व्यवसाय), व्यवसायातील संधी- कमीत कमी पदविका शिक्षण घेतले आणि स्टेट फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी झाली, तर औषध विक्रेता रिटेल व होलसेल म्हणून व्यवसाय सुरू करता येतो. परवानाधारक फार्मासिस्ट औषधविषयक चाचणी, प्रयोगशाळा, रिपॅकिंग युनिट औषधनिर्माण/ सौंदर्यप्रसाधन आयुर्वेदिककंपनी संशोधन केंद्र आदी सुरू करू शकतो. तसेच स्वत:चा औषध उत्पादन व निर्मितीचा उद्योग उभारून उद्योजक होण्याचीही त्याला संधी असते.
  • सरकारी नोकरी – सरकारी उपक्रम, रेल्वे, संरक्षण, अथवा राज्य किंवा केंद्र सरकारचे शासकीय दवाखाने, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रुग्णालय फार्मासिस्ट, डिस्पेन्सिंग फार्मासिस्ट, ड्रग्ज इन्फॉम्रेशन सेन्टर, पॉयझन इन्फॉम्रेशन सेंटर तसेच हॉस्पिटल फार्मसी परचेसिंग विभागात काम करता येते. राज्य फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाठी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ड्रग्ज इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टरपासून सहाय्यक आयुक्त, सहआयुक्त पदापर्यंत पोहोचता येते. केंद्र सरकारच्या सिडॅस्को विभागामध्ये ड्रग्ज इन्स्पेक्टरपासून डेप्युटी डीसीजीआय ते डीसीजीआय जाता येते. यूपीएससीमार्फत नागरी सेवेत प्रवेश करून उच्च पदावर औषध व आरोग्य विभागाशी निगडित असलेल्या अनेक पदांपर्यंत पोहचता येते व देशासाठी उत्तम काम करता येते.
  • संशोधन आणि विकास- औषधी कंपन्यांमध्ये किंवा कंपनी संशोधन प्रयोगशाळांमध्ये नवीन औषधांवर संशोधन करणे, तत्संबंधी प्रक्रिया विकसित करणे, फॉम्र्युलेशन विकसित करणे, नैसर्गिक उत्पादने विकसित करणे, संशोधन विभागात खालीलप्रमाणे वेगवेगळ्या शाखेत काम करता येते. उदा- बायोटेक रिसर्च, मॉलिक्युलर रिसर्च व बायोफिजिक्स, क्लिनिकल फार्मसी, बायोइक्व्युवॅलन्स स्टडीज, अपस्केलिंग पायलट प्लान्ट ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सर्व प्रकारांचे काम करता येते. गुणवत्ता, चिकित्सक बुद्धी, आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द हे गुण ज्यांच्या अंगी आहेत, अशांना संशोधन क्षेत्रात काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवता येणे शक्य आहे.
  • रेग्युलेटरी अफेअर्स – (औषधी नियामकविषयक विभाग) – एफ.डी.ए. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागामध्ये नव्या अथवा सध्या प्रचलित असलेल्या औषधांचे जागतिक मानदंडाप्रमाणे उदा. आय.पी., बी.पी., यू.एस.पी., युरोपियन फार्माकोपिया, जी.एल.पी., जी.एम.पी., करंट जी.एम.पी. यांच्या मानकाप्रमाणे कागदपत्रे संबंधित विभागाला वेळोवेळी सादर करणे आणि त्या संदर्भात काही शंका असल्यास त्यांचे निरसन करणे, नव्या औषधांचा शोध व इतर संबंधित कायद्याप्रमाणे लागणारे सर्व एफ.डी.ए., यू.एस.एफ.डी.ए.च्या डब्ल्यू.एच.ओ. व इतर देशांतर्गत नियंत्रण व प्रमाणित करून संस्थेकडून परवाने घेणे व संबंधित इतर नियमांची पूर्तता करणे अशाप्रकारची कामे करता येतील.
  • निर्मिती आणि उत्पादने- नवीन फॉम्र्युलेशन वेगवेगळ्या डोसेज स्वरूपामध्ये विकसित करणे, तसेच औषधे- सौंदर्यप्रसाधने- साबण विकसित करणे रक्तापासून प्लाझ्मा, लसी तसेच जैविक उत्पादने बनवणे, आयुर्वेदिक तसेच होमियोपॅथिक औषधांची निर्मिती, प्राण्यांसाठीची औषधे, सुगंधी द्रव्ये, फूड सप्लिमेन्ट्स, पोषक अन्न निर्मिती यांची औषधी कारखान्यात निर्मिती करणे, सध्या भारतात आधुनिक मशीन व कॉम्प्युटराइज्ड कंट्रोल सिस्टीमद्वारे हे काम उत्तमरीत्या करता येते.
  • तांत्रिक व्यवस्थापन- बी.फॉर्म/ एम.फॉर्म/ पीएच.डी अथवा औषधी कारखान्यातला १० वर्षांचा अनुभव असल्यास संशोधन आणि विकास, उत्पादन, क्लिनिकल रिसर्च, नियमनासंबंधित गोष्टी, दर्जा नियंत्रण, दर्जाविषयक हमी, यांसारख्या औषधी कंपन्यांच्या विभागात टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करता येईल अथवा सल्लागार म्हणूनही काम करता येईल.
  • दर्जा नियंत्रण- औषधे अथवा सौंदर्य प्रसाधने कारखान्यात तयार करत असताना त्या संदर्भातील दर्जा नियंत्रणविषयक भारतीय ‘ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट १९४०’ व नियम १९४५ तसेच इतर नवे नियम अथवा मानकांचे पालन करणे तसेच त्या मानकांप्रमाणे उत्पादन निर्मिती झाली आहे का याची खातरजमा करणे, फार्मसिस्ट हे औषध निर्मितीच्या आधी व नंतरच्या स्तरावर दर्जा तपासणीसाठी जबाबदार असतात. उत्पादन प्रक्रियेच्यावेळी रसायनांच्या वजनाची टक्केवारी ठरवणे हेही त्यांचे काम आहे. हल्ली हे काम संगणकाद्वारे करण्यात येत असल्याने फार्मसिस्टची भूमिका पर्यवेक्षकाची असते. संशोधन आणि विकास भागात नव्या औषधाची निर्मिती तसेच औषधात फेरफार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्या संबंधीचा अहवाल तयार करणे व संबंधित सरकारी यंत्रणांना योग्य वेळेत तो सादर करणे व प्रमाणित दाखला संबंधित यंत्रणेकडून घेणे, ही कामे करता येतील.
  • दस्तावेज – प्रत्येक औषधी कंपन्यांचे तपासणी अधिकारी, राज्य अथवा केंद्र सरकारच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज (सिडॅस्को) अ‍ॅडमिन्रिटेशन अथवा त्यांचे अधिकारी येऊन प्रत्यक्षात औषधी कारखान्यांची निर्मिती कशी चालली आहे याची त्यांच्या मानकाप्रमाणे तपासणी करतात व संबंधित अहवालांचे परीक्षण केले जाते. यासाठीचे अहवाल तयार करणे व संबंधित संस्थांना ते सादर करणे हाही करिअरचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
  • दर्जाची हमी : औषधी कंपन्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या निर्मितीचे, दर्जा तपासणीचे ऑडिट करणे व औषधे तयार करण्याच्या सर्व प्रक्रियेद्वारे योग्य ती गुणवत्ता उत्पादनात आहे ना याचे परीक्षण करणे, अहवाल तयार करणे व संबंधित सरकारी यंत्रणांना तो सादर करणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
  • पॅकेजिंग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट – सध्या जगभरात सर्वच क्षेत्रांत पॅकेजिंग टेक्नालॉजीला चांगली मागणी आहे. पावडर, मलम, गोळ्या, कॅप्सूल अशा घन, द्रव्य व इतर स्वरूपातील औषधांसाठी योग्य ते पॅकिंग साहित्य निवडणे, पॅकेजिंग मटेरिअलच्या तांत्रिक बाजू समजून घेणे, औषधे किफायतशीर आणि टिकाऊ असावीत यांवर भर देणे,तसेच त्याच्या डिझाइनकडे आणि औषधाच्या पॅकिंगसाठी योग्य त्या सामग्रीची निवड करणे या स्वरूपाचे काम पॅकेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये अपेक्षित आहे.

(पूर्वार्ध)

careershedge@gmail.com