नवी दिल्ली येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे देशांतर्गत विविध व्यवस्थापन शिक्षण संस्था व फार्मसी शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएमएटी) व ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (जीपीएटी) या प्रवेश पात्रता परीक्षांसाठी अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएमएटी) २०१६ :
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला
बसलेले असावेत.
ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (जीपीएटी) २०१६ :
अर्जदार फार्मसी विषयातील पदवीधर असावेत अथवा फार्मसी विषयातील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती :
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड चाचणी संगणकीय पद्धतीने १७ जानेवारी २०१६ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांच्या पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व संगणकीय प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांना संबंधित राज्यातील व्यवस्थापन अथवा फार्मसी विषयातील पदव्युतर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जदार सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय गटातील असल्यास त्यांनी रु. १४०० + बँक शुल्क आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांनी आपल्या प्रवेश अर्जासह प्रवेश शुल्क म्हणून रु. ६०० + बँक शुल्क भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची मुदत :
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० डिसेंबर
२०१५ पर्यंत अर्ज करावेत.
अधिक माहिती :
या अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ची सीएमएटी आणि जीपीएटी- २०१६ या प्रवेश पात्रता परीक्षांची जाहिरात पाहावी अथवा http://www.aicte-india.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.