महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा पेपर-१ मधील चालू घडामोडीहा घटक कसा अभ्यासावा, याविषयी..

पुढच्या सोमवारी यंदाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा  आहे. राज्य सेवेसहित महाराष्ट्र  लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांची काठिण्यपातळी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या काठिण्यपातळीच्या जवळपास जाणारी आहे, हे मागील दोन-तीन वर्षांच्या प्रश्नप्रत्रिका पाहिल्या की लक्षात येते. ही बाब समजून घेतली तर पूर्वपरीक्षा पेपर- १ मधील ‘चालू घडामोडी’ हा घटक गांभीर्याने तयारी करायचा घटक आहे हे लक्षात येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांमध्ये पांरपरिक व चालू घडामोडींचे मिश्रण असते.  एकाच प्रश्नात एखाद्या मुद्दय़ाचा सिद्धान्त आणि त्याबाबत नुकतीच घडलेली एखादी घटना एकाच वेळी विचारली जाऊ शकते.

अनेक जागतिक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिकेत उमटते. हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणातून लक्षात येईल की, चालू घडामोडींच्या घटकात तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात-

  • स्वतंत्र चालू घडामोडी
  • सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी
  • सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती

अभ्यासासाठी अशी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकरता प्रश्नपत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे ते कळते. वृत्तपत्रांतील बातमी आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक माहिती यातील फरक परीक्षार्थीनी जाणून घेणे आवश्यक आहे. शेवटच्या आठवडय़ामध्ये या घटकाची उजळणी व अपडेट करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विभाजन करावे लागेल-

  • घटक विषयांशी संबंधित चालू घडामोडी
  • अर्थसंकल्प- केंद्राचा व राज्याचा
  • आर्थिक पाहणी अहवाल- केंद्राचा व राज्याचा
  • तथ्यात्मक तसेच अन्य सामान्य ज्ञान स्वरूपाच्या चालू घडामोडी

उमेदवारांचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एका विषयाच्या घडामोडींची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भपुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत परीक्षार्थीना हा प्रश्न पडतो. यावर एखादे दुसरे गाइड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही अथवा माहितीस्रोत म्हणून एकाच संदर्भपुस्तकाचा वापर करणेही उपयोगाचे ठरत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की, अशा तऱ्हेने अभ्यास केल्यास आपण स्पध्रेत टिकणे कठीण आहे याची जाणीव होते. यासाठी िहदी व इंग्रजी संदर्भपुस्तके वापरणाऱ्या उमेदवारांनी इंडिया इयर बुक, आíथक पाहणी अहवाल व अर्थसंकल्प यांची प्रत्यक्ष कागदपत्रे पाहावीत. मराठीतून तयारी करणाऱ्या उमेदवारांनी ‘करंट ग्राफ’ वार्षकिीचा वापर करावा.

संदर्भपुस्तके अथवा ग्रंथ हे परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी वाचायचे असतात.  त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा आधार घेऊन यांमधील काय वाचायचे व काय टाळायचे हे माहीत असायला हवे. इंडिया इयर बुक व आíथक पाहणी अहवालामधून आत्ता काय वाचणे अपेक्षित आहे ते पाहू- इंडिया ईयर बुक (हिंदी आवृत्ती) : कृषि प्रमुख कार्यक्रम, मूल आíथक आकडे (पूर्ण प्रकरण), वाणिज्य (पूर्ण प्रकरण), रक्षा-  रक्षा उपकरण,  मिसाइल. शिक्षा- प्राथमिक शिक्षा, माध्यमिक शिक्षा. ऊर्जा – (या घटकातील उपघटक अभ्यासक्रमानुसार निवडावेत.) पर्यावरण (पूर्ण प्रकरण). वित्त (पूर्ण प्रकरण)). कॉर्पोरेट मामलों का मंत्रालय कंपनी अधिनियम, कंपनी (संशोधन) अधिनियम, २०१५. खाद्य एवं नागरिक आपूíत  योजना-  लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली, अंत्योदय योजना, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम, माध्यान्ह भोजन योजना. राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण सबला, एथेनॉल मिश्रण का कार्यक्रम, विश्व खाद्य कार्यक्रम, राष्ट्रीय परीक्षण गृह, मूल्य निगरानी. स्वास्थ्य और परिवार कल्याण (पूर्ण प्रकरण). स्वास्थ्य और परिवार कल्याण (पूर्ण प्रकरण). आवास- (सुरुवातीचे दोन मुद्दे), राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन, स्ट्रीट वेंडर्स अधिनियम, २०१४, प्रबंधन सूचना प्रणाली. भारत और विश्व  पडोसी देश, नालंदा विश्वविद्यालय, प्रवासी भारतीयों का भारत विकास न्यास, प्रवासी भारती सुविधा केंद्र. उद्योग (पूर्ण प्रकरण). श्रम, कौशल विकास और रोजगार श्रम सुधार, असंगठित क्षेत्र, कर्मचारी भविष्यनिधि एवं विविध प्रावधान अधिनियम, कौशल विकास, राष्ट्रीय कौशल विकास एवं उद्यमिता नीति २०१५, राष्ट्रीय कौशल विकास मिशन. आयोजना (पूर्ण प्रकरण).

ग्रामीण और शहरी विकास- ग्रामीण विकास के लिए प्रमुख कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण अजीविका मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, दीन दयाल उपाध्याय- ग्रामीण कौशल योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, स्वच्छ भारत अभियान, शहरी विकास, भारत निर्माण, अटल मिशन (अमृत), स्मार्ट सिटी मिशन, जल संसाधन- नमामि गंगे कार्यक्रम, राष्ट्रीय जल मिशन, राष्ट्रीय जल संसाधन परिषद, राष्ट्रीय परियोजनाए, केंद्रीय भूमि जल बोर्ड, केंद्रीय जल आयोग, पडोसी देशों के साथ आंतरराष्ट्रीय सहयोग. कल्याण. युवा मामले और खेल-  राष्ट्रीय युवा नीति.

आर्थिक पाहणी अहवाल (२०१५-१०१६) केंद्रीय.

भाग एक- पाठ क्र. २, ३, ४, ६, ८ आणि १०.

भाग २- पान क्र. ५८, चौकट ३.२, चौकट ३.४, चौकट ४.१, पान क्र. ७३, ७४. पाठ क्र. ५ – पान क्र. ९ ते ९१, पान क्र. १२०- १२१, १३१-१३६, पान क्र. ८. मराठीतून तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्याचा अर्थसंकल्प व आíथक पाहणी अहवालासहित बहुतांश मुद्दे ‘करंट ग्राफ’मधून अभ्यासता येतील.

राज्यव्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत, इतिहासापासून सामान्य विज्ञानापर्यंत सर्वच विषयांत चालू घडामोडी केंद्रस्थानी ठेवून उमेदवाराचे समकालीन आकलन जोखण्याचा प्रयत्न आयोगामार्फत केला जातो. बहुतेक प्रश्नांच्या पाश्र्वभूमीला एखादी राज्य-राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय घडामोडी असते. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एक अनिवार्य प्रश्नपत्रिकेइतका महत्त्वाचा विषय आहे.