उमेदवार अभियांत्रिकीचे पदविकाधारक असावेत. त्यांना हेलिकॉप्टर विमान दुरुस्ती क्षेत्रातील कामाचा आठ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत.
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ ऑगस्टच्या अंकातील सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील भरलेले अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (एस्टॅब्लिशमेंट) एचक्यू- डीजी, सीमा सुरक्षा दल, ब्लॉक नं. १०, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर २३ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

भारतीय मानक ब्युरोमध्ये अभियंता संशोधकांसाठी ८४ जागा
उमेदवारांनी अभियांत्रिकीमधील पदवी परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी भारतीय मानक ब्यूरोच्या http://www.bis.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २४ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

इस्रोमध्ये वाहन चालकांच्या ६९ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व वाहन चालकाचा प्रचलित परवानाधारक असावेत. त्यांना वाहनचालक म्हणून काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इस्रोची जाहिरात पाहावी अथवा इस्रोच्या http://www.isro.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पूर्व रेल्वेमध्ये स्काऊट्स आणि गाईड्ससाठी ८ जागा
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी स्काऊट गाईडमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑगस्ट-४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज चीफ पर्सोनेल ऑफिसर, पूर्व रेल्वे- रिक्रुटमेंट सेक्शन, १७, नेताजी सुभाष रोड, फिर्ली प्लेस, कोलकाता- ७००००१ या पत्त्यावर २४ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर (ऑपरेशन)च्या १२ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल, मेटॅलर्जी अथवा प्रॉडक्शन इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा सात वर्षांचा अनुभव असावा.
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या http://www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

उत्तर-पूर्व रेल्वेमध्ये स्काऊट- गाईड्ससाठी ८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रताधारक असावेत. त्यांनी स्काऊट, गाईडस्मध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २९ वर्षे.
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ सप्टेंबरच्या अंकातील उत्तर- पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी. उत्तर पूर्व रेल्वेच्या http:\\www.rrcald.org अथवा http://www.indianrailways.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २८ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबाद येथे टेक्निकल सुपरवायझरच्या १४ जागा
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील प्रकाशित झालेली सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबादची जाहिरात पाहावी. अथवा मिलच्या http:\\ spmhoshangabad.spmil.com (Job opportunities) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबाद (म. प्र.), ४६१००५ या पत्त्यावर  २८ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

पूर्व रेल्वेमध्ये आयटीआय अ‍ॅप्रेन्टिशिपच्या ७५० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी संबंधित विषयातील कौशल्यविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २४ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज वर्कशॉप पर्सोनेल ऑफिसर, ईस्टर्न रेल्वे, पोस्ट ऑफिस कांचापारा, जि. २४ परगाना (उत्तर), प. बंगाल- ७४३१४५ च्या पत्त्यावर २८ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ३१ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २४ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा मध्य रेल्वेच्या http://www.rrccr.com अथवा http://www.rrccr.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज मध्य रेल्वे रिक्रुटमेंट सेल, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, वाडीबंदर, पी.डी’मेलो मार्ग, मुंबई- ४०००१० या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.