अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वायरमन, एक्झामिनर ग्राइंडर यांसारख्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील आयुध निर्माणी, चंदिगढची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स केबल फॅक्टरी, चंदिगढ- १६०००२ या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलात इन्स्पेक्टर-ओव्हरसिअरच्या १०१ जागा
अर्जदार सिव्हिल अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असून त्यांना संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय राखीव पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील अर्ज डीआयजीपी डायरेक्टोरेट जनरल, सीआरपीएफ, ब्लॉक नं. १, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

एनटीपीसीमध्ये ऑपरेशन्स अ‍ॅण्ड मेंटेनन्स इंजिनीअर्सच्या १६ जागा
उमेदवार मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ४७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या http://www.uptc.co.in किंवा http://www.ntpccareers.net या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर १६ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, भोपाळ येथे पर्यवेक्षकांच्या ६ जागा
उमेदवार इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा वर्षभराचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिकल्सची जाहिरात पाहावी अथवा बीएचईएलच्या http://www.bhelbpl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि, पोस्ट ऑफिस बॉक्स नं. ३५, पिपलानी, पोस्ट ऑफिस पिपलानी बीएचईएल, भोपाळ (म. प्र.) या पत्त्यावर १६ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

जहाज वाहतूक मंत्रालयात नॉटिकल सव्‍‌र्हेअरच्या १५ जागा
उमेदवार जहाज वाहतूक क्षेत्रातील उच्च पात्रताधारक असावेत. त्यांना जहाज वाहतूक क्षेत्रातील अधिकारी पदावर काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ५० वर्षे. अधिक माहितीसाठी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

गन अ‍ॅण्ड शेल फॅक्टरी, कोलकाता येथे कुशल कामगारांच्या ९ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मशिनिस्ट, फिटर अथवा एक्झामिनर यासारखी पात्रता प्राप्त केलेले असावेत.
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील गन अ‍ॅण्ड शेल फॅक्टरी, कोलकाताची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर जनरल मॅनेजर, गन अ‍ॅण्ड शेल फॅक्टरी, कोसिपोर, कोलकाता- ७००००२ या पत्त्यावर १७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कंझव्‍‌र्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी, लखनऊ येथे ज्युनिअर रिसर्च फेलोच्या १० जागा
उमेदवारांनी फिजिकल, केमिकल, अर्थ, पर्यावरण विज्ञान, पुरातत्त्व संवर्धन अथवा आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. सीएसआयआर-युजीसीची नेट/ जीएटीई यासारखी पात्रताधारकांना प्राधान्य. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कंझर्वेशनची जाहिरात पाहावी अथवा लेबॉरेटरीच्या http://www.nrle.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कंझर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी ई/३, अलिगंज, लखनऊ २२६०२४ (उ.प्र.) या पत्त्यावर १८ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात फलोत्पादन अधिकाऱ्यांच्या १० जागा
उमेदवार कृषी, फलोत्पादन, अन्न प्रक्रिया, कृषी अभियांत्रिकी यासारख्या विषयातील पदवी घेतलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज मॅनेजिंग डायरेक्टर, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, प्लॉट नं. ८५, सेक्टर १८, इन्स्टिटय़ूशनल एरिया, गुडगाव- १२२०१५ (हरियाणा) या पत्त्यावर १९ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.