सायबर सुरक्षेचा एक भाग म्हणजे एथिकल हॅकिंग. एखाद्या कंपनीने ‘आयएसओ  २७००१’ने प्रमाणित केल्यानुसार सुरक्षा व्यवस्थेची मांडणी केली तरी ही व्यवस्था सुस्थापित आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एथिकल हॅकिंगचा उपयोग केला जातो. जर एखादी व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने आली, तर तिला संगणक व्यवस्थेमध्ये प्रवेश मिळवता येतो की नाही हे जाणून घेण्यासाठी एथिकल हॅकिंग केले जाते. याद्वारे सायबर सुरक्षेची चाचणी करता येते.

नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड  यांसारखे आíथक व्यवहार ज्या संगणकाद्वारे होतात, ते व्यवहार सुरक्षित आहेत ना, हे सातत्याने तपासणे आवश्यक असते  अन्यथा आíथक सायबर गुन्ह्य़ांची संख्या वाढू शकते आणि त्या व्यवस्थेला अथवा ग्राहकवर्गाला याचा मोठा फटका बसू शकतो.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

एथिकल हॅकिंग हे काही चमत्कृतीजन्य किंवा वलयांकित करिअर नाही. सायबर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात ठेवून, या क्षेत्रात खरोखरी तज्ज्ञ असलेल्या मंडळींची मोठी गरज भासते. १४-१५ अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक होणाऱ्या भारतातील आíथक सायबर गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी हुशार, अनुभवी हॅकर्सची साथ हवी आहे.

संगणकात ‘डिजिटल’ फॉर्ममध्ये महत्त्वाची माहिती साठवून ठेवली जाते. संगणकावर अथवा  इंटरनेटवर टाकलेली ही माहिती सुरक्षित नसते. सायबर भामटे इंटरनेटच्या माध्यमातून या माहितीची आणि कागदपत्रांचीही चोरी करतात. ही चोरी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून इंटरनेटच्या माध्यमातून शक्य होते. महत्त्वाची माहिती नष्ट  होऊ नये अथवा अन्य कुणाच्याही हाती लागू नये, याकरता सायबर गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी आज एथिकल हॅकरची गरज भासत आहे.

कोणी जर कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर त्याला आळा घालणे आणि संभाव्य धोके ओळखून अगोदरच खबरदारीचे उपाय योजणे हे एथिकल हॅकरचे प्रमुख काम आहे. संगणकप्रणाली सुरक्षित ठेवणे तसेच सायबर भामटय़ांनी केलेला बिघाड दुरुस्त करण्याची कामे ‘एथिकल हॅकर’ करतो. आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाच्या वाढत चाललेल्या वापराने हॅकिंगच्या शक्यतेतही वाढ होत आहे.

‘एथिकल हॅकिंग’चे प्रशिक्षण अनेक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. ‘सर्टफिाइड एथिकल हॅकर’च्या प्रमाणपत्रप्राप्त व्यक्तीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

संबंधित अभ्यासक्रम

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ.
  • मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉ अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी- नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सटिी भोपाळ आणि राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, केरवा डॅम रोड, भोपाळ- ४६२०४४.

वेबसाइट- www.nliu.ac.in

  • मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉज अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, अलाहाबाद- २११०१२.

मेल- anurika@iiita.ac.in

वेबसाइट- www.iiita.ac.in

  • एम एस इन सायबर लॉ अ‍ॅण्ड सिक्युरिटी- नालसार युनिव्हर्सटिी ऑफ लॉ, बरकतपुरा, हैदराबाद- २७.

मेल- admission@nalsar.org

वेबसाइट : www.nalsar.ac.in

  • डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी- गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सटिी, सेक्टर- १८, ए, डीएफएस- पोलीस भवन, गांधीनगर.

वेबसाइट- www.gfsu.edu.in

आवश्यक कौशल्ये

  • काम करण्याची प्रेरणा हवी.
  • झोकून काम करण्याची वृत्ती हवी.
  • नतिक दृष्टिकोन हवा.
  • संवाद साधण्याचे कौशल्य हवे.