शाळा व संस्था/रचना व कार्यपद्धती अधिकारी/ अधिव्याख्याता/ जिल्हा महिला बालविकास अधिकारी/ अधीक्षक/ सांख्यिकी अधिकारी गट -ब, महिला व बालविकास विभाग या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. अलीकडेच १४७ जागांसाठीची ही परीक्षा पार पडली. या परीक्षेला कला, वाणिज्य, कृषी, कायदा, समाजकार्य, मानसशास्त्र, गृहविज्ञान किंवा पोषाहार यांमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतो.

परीक्षेचे टप्पे

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना

१. चाळणी परीक्षा – २०० गुण

२. मुलाखत – ५० गुण

अंतिम गुणवत्ता यादी ही चाळणी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असते.

चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आकृतिबंध पाहिल्यास संबंधित पदांच्या जबाबदारीनुसार व कामाच्या स्वरूपानुसार त्याची रचना केल्याचे आपल्यास दिसून येते. या चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमाची आयोगाने एकूण १३ घटकांत विभागणी केली असून सर्व घटकांवर समान प्रश्न विचारले जातील असे गृहीत धरल्यास प्रत्येक घटकावर किमान ७ ते ८ प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकांमध्ये विविध उपघटकही नमूद केले आहेत. त्यांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक घटकाच्या तयारीसाठी उमेदवारांनी वेळ द्यावा.

आयोगाने याआधी घेतलेल्या परीक्षांतील बरेच प्रश्न हे महिला व बालविकास अधिकारी परीक्षेच्या आयोगाने नमूद केलेल्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांवर विचारलेले आढळतात. तसेच या अभ्यासक्रमातील बराचसा भाग हा राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर ३ शी खूपच मिळताजुळता आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय सूक्ष्म विश्लेषण, मुद्देसूद व सखोल अभ्यास, प्रश्नपत्रिकांचा सराव व वेळेचे योग्य नियोजन केल्यास ही यशाची चतु:सूत्री ठरू शकते.

1-page

अभ्यासक्रमाचे विश्लेषण व संदर्भ साहित्यसूची 

* सामान्य अध्ययन – चालू घडामोडी

या घटकात जागतिक, देशातील, महाराष्ट्रातील चालू घडामोडी (राजकीय, औद्योगिक, सामाजिक, आíथक, शैक्षणिक, भौतिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक) यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. याच्या जोडीला महिला व बालकांच्या संबंधित घटना, धोरणे, शासन निर्णय यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरेल.

संदर्भसूची: मासिके- लोकराज्य, योजना.

करंट ग्राफ वार्षकिी, एखादे आघाडीचे दैनिक.

* बुद्धिमापन चाचणी/अंकगणित (शालान्त स्तर)

या घटकावर ८ ते १० प्रश्न विचारले जाऊ शकतात. आयोगाच्या अलीकडील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करता संबंधित घटकावरील काठिण्य पातळी वाढलेली दिसून येते. तोच प्रवाह येथे कायम राहण्याची शक्यता आहे.

संदर्भसूची: क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड- आर. एस. अगरवाल), रिझनिंग- आर. एस. अगरवाल.

* व्याकरण – (शालान्त स्तर)

या घटकात मराठी आणि इंग्रजी भाषेवरील प्रत्येकी एक उतारा प्रत्येकी ३ ते ४ प्रश्नांसाठी असेल. उर्वरित प्रश्न मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर असतील.

संदर्भसूची: मराठी भाषा- सुगम मराठी व्याकरण व लेखन- मो. रा. वाळिंबे.

इंग्रजी भाषा – इंग्रजी व्याकरण- बाळासाहेब शिंदे.

* भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र – (शालान्त स्तर)

या घटकात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या घटकांवर प्रश्न असतील तसेच बालकांचे आरोग्य व पोषण आहारसंबंधित प्रश्न विचारले जातील.

संदर्भसूची: आठवी, नववी, दहावीची पुस्तके.

* समाजशास्त्र व मानसशास्त्र – या घटकात समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि

शास्त्रज्ञ तसेच मानसशास्त्रातील संकल्पना यांवर प्रश्न विचारले जातील.

संदर्भसूची: समाजशास्त्र- अकरावी आणि बारावीची पुस्तके. मानसशास्त्र- अकरावी, बारावीची पुस्तके.

. माहिती व संज्ञापनशास्त्र – या घटकात इंटरनेट व इ-मेलचे मूलभूत आधार व अर्थ, फायदे-तोटे, जागतिकीकरण व जनसंप्रेषण माध्यमे यांचा अभ्यास क्रमप्राप्त ठरेल.संदर्भसूची: संगणक व माहिती तंत्रज्ञान- अभिजीत बोबडे.

. समाजकार्य – व्यावसायिक समाजकार्य व महाराष्ट्रातील समाजसुधारक यांचा अभ्यास. संदर्भसूची: परिवर्तनाची वाटचाल- सामाजिक न्याय मंत्रालय. व्यावसायिक समाजकार्य- के. सागर पल्बिकेशन.

. भारतीय संविधान – राज्यघटना आणि पंचायतराज यांचा अभ्यास.संदर्भसूची: संदर्भसूची- अकरावी, बारावी राज्यशास्त्राची पुस्तके, इंडियन पॉलिटी-एम. लक्ष्मीकांत.

. मानवी हक्क – मानवी हक्क आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, महिला धोरण व बालधोरण यांचा अभ्यास. संदर्भसूची: राज्यशासनाच्या वेबसाइट.

१०. महिला व बालक विकास – महिला व बालकांच्या संदर्भातील शासननिर्णय व राज्य व केंद्र शासनांच्या योजनांचा अभ्यास. संदर्भसूची: महिला व बालविकास भाग १ व २- के. सागर पब्लिकेशन.

११. महिला व बालविषयक कायदे – संदर्भसूची: राज्य व केंद्र शासनाच्या वेबसाइट.

१२. गृहविज्ञान – संदर्भसूची: अन्नशास्त्र अकरावी, पोषण व आहारशास्त्र- डॉ. इंदिरा खडसे.

१३. बालविकास व महिला विकास – संदर्भसूची : बालविकास बारावी, बालविकास- डॉ. इंदिरा खडसे.