कायदा क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची आणि कायद्याशी संबंधित विविध क्षेत्रांतील करिअर संधींची ओळख करून घेऊयात..

स्पेशलायझेशनचे विविध पर्याय : एलएल.एम

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

सध्या मुंबई विद्यापीठात एलएल.एम  हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या सहा स्पेशलायझेशनमध्ये उपलब्ध आहे. पदव्युत्तर  स्पेशलायझेशनमध्ये तुम्हाला संशोधन प्रबंधही सादर करावा लागतो.

पदव्युत्तर स्पेशलायझेशनच्या विविध पर्यायांपैकी प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. मात्र, पर्याय निवडताना स्वत:चा कल समजून घेणे महत्त्वाचे. कोणत्याही घटकविषयाची संपूर्ण माहिती करून घेणे, आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे व केवळ परीक्षेपुरता अभ्यास मर्यादित न ठेवता विषय मुळापासून समजून घेत अभ्यास करणे असा दृष्टिकोन ठेवल्यास या करिअरमध्ये यशस्वी होणे अवघड नाही. स्पेशलायझेशन पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अथवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.

स्पेशलायझेशनची क्षेत्रे

सिव्हिल/क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिटय़ुशनल लॉ, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, ह्य़ुमन राइटस् लॉ, फॅमिली लॉ, टॅक्सेशन लॉ, कॉर्पोरेट लॉ, बिझनेस लॉ, इंटरनॅशनल लॉ, लेबर लॉ, रिअल इस्टेट लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी/पेटन्ट लॉ.

परदेशात शिक्षण

पदव्युत्तर स्पेशलायझेशनसाठी परदेशातही वर्षभराचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परदेशात सॉलीसिटर, बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठीही जाता येते. कायदा विषयात एम.एस., पीएच.डी., पोस्ट डॉक्टरेटही करता येते. मात्र, परदेशात या अभ्यासक्रमाचे शुल्क काही लाखांच्या घरात असते.

पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

कायदा विषयातील पदव्युत्तर पदविका हा एक वर्षांचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम विविध संस्था तसेच विद्यापीठांमधून नियमित अथवा दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार तो पूर्ण करता येतो. विषय खालीलप्रमाणे- पी. जी. डिप्लोमा इन क्रिमिनल लॉ, पी. जी. डिप्लोमा इन सिक्युरिटीज लॉ, पी. जी. डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अ‍ॅण्ड पेटन्ट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन सायबर लॉ, पी. जी. डिप्लोमा इन मीडिया लॉ, पी. जी. डिप्लोमा इन ह्य़ुमन राइट्स लॉ, पी. जी. डिप्लोमा इन मेडिको लीगल अ‍ॅण्ड एथिक्स, पी. जी. डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, पी. जी. डिप्लोमा इन लेबर लॉज अ‍ॅण्ड लेबर वेल्फेअर, पी. जी. डिप्लोमा इन एन्व्हायरॉन्मेंट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन चाइल्ड राइटस् लॉ, पी. जी. डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेन्ट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन अल्टरनेट डिस्प्युट रिझोल्यूशन लॉ, पी. जी. डिप्लोमा इन अ‍ॅडमिन लॉ अ‍ॅण्ड पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, पी. जी. डिप्लोमा इन कॉम्पिटिशन पॉलिसी अ‍ॅण्ड लॉ, पी. जी. डिप्लोमा इन टुरिझम व एन्व्हायरॉन्मेंट लॉ, पी. जी. डिप्लोमा इन बिझनेस लॉ, पी. जी. डिप्लोमा इन न्यूक्लीअर लॉ, पी. जी. डिप्लोमा इन अर्बन एन्व्हायरॉन्मेंट मॅनेजमेंट, पी. जी.  डिप्लोमा इन फोरेन्सिक सायन्स अ‍ॅण्ड रिलेटेड लॉ, पोस्ट डिप्लोमा इन डिजिटल अ‍ॅण्ड फोरेन्सिक रिलेटेड लॉ, मास्टर ऑफ बिझनेस लॉ/ एमबी.ए.(लॉ).

इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ यांच्यातर्फे एक वर्ष मुदतीचे खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत- पी. जी. डिप्लोमा इन लीगल प्रोसेस आऊटसोìसग, पी. जी. डिप्लोमा इन क्रिमिनल जस्टीस, पी. जी. डिप्लोमा इन पॅरालीगल प्रॅक्टिसेस, पी. जी. डिप्लोमा इन अ‍ॅन्टिह्य़ुमन ट्रॅफिकिंग, पी. जी. डिप्लोमा इन को-ऑप. लॉ अ‍ॅण्ड बिझनेस लॉज्.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पुढील अभ्यासक्रम सहा महिने मुदतीचे आहेत. सर्टििफकेट  इन  इंटरनॅशनल ह्य़ुमेटेरियन लॉ, सर्टििफकेट इन अ‍ॅन्टिह्य़ुमन ट्रॅफिकिंग, सर्टििफकेट प्रोगाम इन राइट टू इन्फम्रेशन अ‍ॅक्ट, सर्टििफकेट प्रोग्राम इन कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट.

क्रिमिनल सायकोलॉजी :

क्रिमिनल सायकोलॉजी ही एक मानसशास्त्र विषयातील शाखा आहे.  गुन्हा कोणत्या मानसिकतेतून घडला आहे, हे जाणून घेणे गुन्हे तपासासाठी उपयोगी ठरते. या विषयातील तज्ज्ञ गुन्हे तपासात योगदान देतात. याअंतर्गत गुन्हेगार किंवा गुन्हय़ांनी पीडित व्यक्तीचे समुपदेशनही  केले जाते. जागतिकीकरण, झपाटय़ाने होणारे शहरीकरण, वाढते वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव, वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा विचार केल्यास वकिलांना मानसशास्त्राचा अभ्यास करण्यास तसेच त्यात काम करण्यास मोठा वाव आहे.

करिअर क्षेत्रे

कायदा विषयातील पदवीधर आपले करिअर  सिव्हिल, क्रिमिनल, कामगार, कंपनीविषयक कायदे, करविषयक प्रकरणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार, ग्राहक हक्क संबंधांवर कायदे, को-ऑप. सोसायटी, ट्रस्ट कायदे, वन व पर्यावरणविषयक कायदे, कौटुंबिक कायदे, मेडिको लीगल कायदे, परिवहन अपघात ट्रायब्युनल्स, पेटंट्स मिळवून देणारे व हक्क अबाधित राखणारे अशी अनेक क्षेत्रे कायदा पदवीधरांना खुणावत आहेत. खालील क्षेत्रांतही वकील अथवा सल्लागार म्हणून काम करता येते-

डिपार्टमेंट ऑफ आर्मी / नेव्ही एअर फोर्स, पोलीस सेवा, सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ता, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ, क्रिमिनोलॉजिस्ट, कायद्यासंबंधित लिखाण करणारा लेखक, बँकर, पेटन्ट अ‍ॅटर्नी, सायबर लॉ व्यावसायिक, आर्ब्रिटेटर, ज्युडिशियल सेवा, कायदेविषयक पत्रकार, कायदेविषयक व्यवस्थापक, अ‍ॅडव्होकेट.

कार्यानुभव

वैद्यक अथवा फार्मसीसारख्या अभ्यासक्रमांना जशी अधिकृत इंटर्नशिप असते, तशी एलएल.बी. अभ्यासक्रमाला नसते. एलएल.बी. अथवा एलएल.एम.नंतर (इंटर्नशिप) उमेदवाराने अनुभवी वकिलांच्या हाताखाली अथवा एखाद्या सल्लागार कंपनीमध्ये काही महिने अथवा काही वष्रे काम करून, कामाचे स्वरूप समजून घेणे उपयोगी पडते. केस समजून घेतल्यानंतर कायद्याच्या भाषेत मुद्देसूद लिखाणाची व उत्तरे देण्याच्या सवयीची आवश्यकता असते. त्यालाच ‘लीगल ड्रािफ्टग’ करणे असे म्हटले जाते. केससाठी आवश्यक असलेला पुरावा गोळा करणे, एखाद्या केससंबंधी वेगवेगळ्या कोर्टातील निर्णयांचा योग्य त्या ठिकाणी संदर्भ देत उपयोग करणे, लॉ लायब्ररीमधून योग्य तो केससंबंधी अभ्यास करून संदर्भासाठी योग्य ती माहिती गोळा करणे, काही महत्त्वाच्या केसेस ऐकण्यासाठी प्रत्यक्षात कोर्टात हजर राहणे व नंतर त्यावर आपल्या भाषेत टिपण तयार करणे, वेगवेगळ्या कोर्टातील केस फायलिंग करण्याच्या पद्धती समजून घेणे, कोर्टात न्यायाधीशांसमोर आपली केस चांगल्या प्रकारे मांडणे, हे करीत असताना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आपला संबंध पोलीस स्थानक, रुग्णालय, फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज तसेच इतर शासकीय व  स्वयंसेवी घटकांशी संबंध येत असतो. या संस्थांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती घेणे तसेच संवाद प्रस्थापित करणे, जनसंपर्क राखणे यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. संगणक साक्षरता महत्त्वाची ठरते, तसेच मराठी, िहदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे या व्यवसायासाठी आवश्यक आहे.

बार कौन्सिलकडे नोंदणी 

एलएल.बी. अथवा एलएल.एम.नंतर (इंटर्नशिप) स्टेट बार कौन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक असते. हल्ली नोंदणीसाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतर बार कौन्सिलच्या नियमानुसार योग्य ती कागदपत्रे योग्य त्या वेळेत व रीतसर शुल्क भरून नोंदणी करता येते व मगचआपण वकील (अ‍ॅडव्होकेट) म्हणून प्रॅक्टिस करू शकतो.

वैयक्तिक स्वरूपात काम करणाऱ्या वकिलांना त्यांच्या गरजांनरूप सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी  संघटित संस्था वा प्रतिष्ठाने उपलब्ध आहेत.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्याशी आपल्या कायद्याच्या ज्ञानाची सांगड घालून ई-लीगल कन्सल्टन्सी, ऑनलाइन निवारण, मिस्ड कॉल, लीगल टोल फ्री नंबर, वन िरग टू कनेक्ट, लीगल डॉट कॉम यांसारख्या स्टार्ट अप कंपन्या तरुण वकिलांना सुरू करता येतील.  ई-व्यवहारातील फसवणुकीविरोधात कुठली कायदेशीर पावले कशी उचलता येतील, याचे मार्गदर्शन करणारी कंपनी उभारता येऊ शकते.

लीगल प्रोसेस आऊटसोìसग  

एखाद्या उत्पादनाचे किंवा प्रक्रियेचे मालकी हक्क घेण्यासाठी जागतिक पेटंट घेणे किंवा ट्रेडमार्क, कॉपीराइटस्, जागतिक हक्क घेणे हे व्यावसायिकदृष्टय़ा अत्यावश्यक आहे. पेटंटसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सध्या बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कायदेविषयक संस्था तांत्रिक कायदेविषयक सल्ला देण्यापूर्वी मूळ केसचा ड्राफ्ट तयार करण्याचे काम भारतासारख्या देशाकडून करून घेतात, त्यामुळे त्यांचा वेळ व पसा वाचतो. भारतीय कायद्याच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय कायदे व मानवी अधिकार यांसारख्या विषयाचा पदवी व पदव्युत्तर कायद्याच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव असल्यामुळे तसेच आपल्याकडील कायदेतज्ज्ञांचे इंग्रजीसारख्या परदेशी भाषेचे उत्तम ज्ञान यांसारख्या कारणांमुळे भारतीय कायदेतज्ज्ञांना भरपूर संधी उपलब्ध आहेत.

देशांतर्गत प्रमुख व अव्वल कायदा सल्लागार कंपन्यांमध्ये तसेच न्यायाधीश म्हणून स्वत:च्या क्षमतेनुसार, अनुभवानुसार  कनिष्ठ न्यायालयापासून सत्र, जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत  वाटचाल करता येऊ शकते.  वकील म्हणून किमान तीन ते सात वर्षांचा अनुभव न्यायाधीश होण्यासाठी  आवश्यक ठरतो.

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व विविध स्तरांवर न्यायाधीश निवड पात्रता परीक्षा इत्यादी बहुविध पर्याय उपलब्ध असल्याने त्या दृष्टीनेही कायदा  अभ्यासक्रमाकडे वळण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकतो.

कुठल्याही क्षेत्रातील कामाच्या संधी सरकारी किंवा खासगी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि स्वयंसेवी संस्था या चार पर्यायांमध्ये प्रामुख्याने उपलब्ध असतात.  स्पेशलायझन आणि त्यातील करिअरची नेमकी निवड करताना प्रत्येक पर्यायाची बलस्थाने आणि मर्यादांचा साकल्याने जरूर विचार करावा.    (उत्तरार्ध)

सन्यदलात कायदा  पदवीधरांसाठी संधी

सन्यदलात कायदा पदवीधरांच्या अधिकारी पदावर नेमणुका होत असतात. ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’ तसेच सर्व राष्ट्रीय व राज्य स्तरावरील इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांमध्ये  सर्वसाधारणपणे दर तीन ते चार वर्षांनी सन्यदलातील कायदा विभागाचा आढावा घेऊन उपलब्ध जागा भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात.

आवश्यक पात्रता : अर्जदारांनी बारावीनंतर पाच वष्रे कालावधीची अथवा पदवीनंतर ३ वष्रे कालावधीची कायदा विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी झालेली असावी. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : वय २१ ते २७ च्या दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपकी अर्हताप्राप्त उमेदवारांना सन्यदल निवड मंडळातर्फे निवड परीक्षा, मानसशास्त्रीय चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येते.

वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला प्रशिक्षण तत्त्वावर नेमण्यात येते. त्यावेळी त्यांना वेतनही मिळते. प्रशिक्षण कालावधी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सन्यदलाच्या कायदा शाखेत लेफ्टनंट म्हणून नेमले जाते. त्यानंतर नियमानुसार प्रचलित वेतनश्रेणी, इतर भत्ते व लाभ आणि भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतात. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

careershedge@gmail.com