अभियांत्रिकी विद्याशाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जेईई मेन्स आणि जेईई अॅडव्हान्स्ड या प्रवेशपरीक्षेचे असलेले महत्त्व अधोरेखित करतानाच या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेच्या तयारीविषयक मार्गदर्शन करणारा लेख

३० एनआयटी, ४ आयआयटीज, डीए-आयआयसीटी आणि विविध राज्यांतील सरकारी तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रम यांचे अखिल भारतीय स्तरावरील १५ टक्के कोटय़ातील प्रवेश (उदा. व्हीजेटीआय, एमआयटी, व्हीआयटी, आयसीटी इत्यादी.) हे जेईई-मेन्सच्या परीक्षेतील गुणांवर होतात. जेईई परीक्षा २०१३-२०१६ दरम्यान दोन स्तरांत होत आहे- उदा. एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन्स आणि मे महिन्यात घेतली जाणारी जेईई अॅडव्हान्स्ड. देशस्तरावर सुमारे १३ लाख विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेला बसतात. त्यातील दोन लाख विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी निवडले जातात. १९ आयआयटीजचे प्रवेश हे जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांवर होतात.

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी दरवर्षी अभियांत्रिकीच्या एमएचटी-सीईटी, जेईई यांसारख्या प्रवेश परीक्षांना बसतात. त्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थी जेईई परीक्षेची जाणीवपूर्वक तयारी करतात तर इतर विद्यार्थी बारावीची बोर्ड परीक्षा आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करतात.

हे पाहता लक्षात येते की, अभियांत्रिकी विद्याशाखेला जाऊ इच्छिणारे महाराष्ट्रातील इनमिन ६ टक्के विद्यार्थी जेईईची काळजीपूर्वक तयारी करतात, त्याउलट आंध्र प्रदेशातील ७५ टक्के आणि दिल्ली आणि कोटामधील ९० टक्के विद्यार्थी जेईईच्या तयारीत व्यग्र असतात. असे असूनही २०१५ मध्ये आयआयटीत सर्वाधिक विद्यार्थी धाडणारे आंध्र प्रदेश आणि राजस्थाननंतर महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. म्हणूनच केवळ एमएचटी-सीईटीची तयारी करण्याऐवजी अभियांत्रिकीपूर्व अभ्यासाचा पाया पक्का करणाऱ्या जेईईच्या नियोजनबद्ध अभ्यासाबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

जेईई मेन्सला गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे मिळून ११० पाठ असतात, तर जेईई अॅडव्हान्स्डला सुमारे १०० पाठ असतात. या दोन्हीही परीक्षा बहुपर्यायी (मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स) आणि चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणे (निगेटिव्ह माìकग) अशा पद्धतीच्या असतात.

जेईई मेन्सचा पॅटर्न हा ९० प्रश्न, ३६० गुण आणि तीन तासांचा असा ठरलेला असतो. जेईई अॅडव्हान्स्डचा पॅटर्न हा परीक्षेपूर्वी उघड केला जात नाही आणि दरवर्षी त्यात बदल होत असतात. जेईई अॅडव्हान्स्डमधील प्रश्नांची काठिण्यपातळी ही जेईई-मेन्सच्या तुलनेत अर्थातच अधिक असते. जेईई मेन्समधून जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठीचा ‘कट ऑफ स्कोअर’ हा गेली तीन वष्रे ३६० गुणांपकी १०५-११५ गुण असा राहिला आहे. आयआयटी रँक अर्हता प्राप्त होण्यासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत ३५ टक्के गुण आवश्यक ठरतात.

अभ्यासपद्धती कशा असावी?

अकरावी-बारावीच्या पहिल्या १६ महिन्यांत, विद्यार्थ्यांने जेईईच्या अभ्यासक्रमातील ११० पाठांवरील मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा आणि त्या संकल्पना वेगवेगळ्या परिस्थितीत लागू करून त्यावर आधारित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. विद्यार्थ्यांनी जेईई-अॅडव्हान्स्डच्या काठिण्यपातळीचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, असे केल्याने विद्यार्थ्यांला जेईई मेन्सचे प्रश्न आपोआप सोडवता येतील. शेवटचे सहा ते आठ महिने जेईई परीक्षेच्या वेगवेगळ्या सराव प्रश्नपत्रिका सोडवून यातील प्रत्येक चाचणीतील आपल्या कामगिरीचे विश्लेषण करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांने जेईई परीक्षेत यश मिळवण्यासाठी शेवटच्या सहा महिन्यांत स्वत:चा असा व्यक्तिगत परीक्षेचा आराखडा बनवावा.

जेईईच्या अभ्यासाचे स्रोत

विद्यार्थी जेईईची तयारी प्रामुख्याने तीन स्रोतांद्वारे करू शकतात-

* शिकवणी वर्ग – विद्यार्थ्यांच्या शंकांचे लगेचच निरसन करणारे बुद्धिमान शिक्षक ज्या शिकवणी वर्गामध्ये असतात, जिथे अध्ययनाचा योग्य दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो आणि ज्या ठिकाणी अभ्यासाच्या वातावरणनिर्मितीसाठी उत्तम सहाध्यायी असतात, अशा शिकवणी वर्गाची मदत जेईईच्या तयारीसाठी होऊ शकेल. मात्र अशा शिकवणी वर्गाचे शुल्क प्रचंड असते आणि महाराष्ट्रात जेईई परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील मिळून १५ दर्जेदार संस्था आहेत.

* टपालाद्वारे / अभ्याससाहित्याद्वारे शिकवणी- ज्या विद्यार्थ्यांचा जेईई परीक्षा गांभीर्यपूर्वक देण्याचा निश्चय पक्का आहे आणि जो स्वअभ्यासाद्वारे जेईईची तयारी करू शकतो त्याला जेईई परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या पुस्तकसंपदेचा उपयोग करता येईल किंवा राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिकवणी वर्गात टपालाद्वारे अभ्यासक्रम करता येईल. सेन्गेज (Cengage), अरिहंत, जीआरबी, दिशा, जेपीएनपी, भारती भुवन आदींची जेईई पुस्तके संदर्भासाठी उपयोगात आणता येतील.

* ई-लर्निग – ऑनलाइनरीत्या अथवा टॅबलेटमध्ये अथवा पेन ड्राइव्ह अशा विविध इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेली व्हिडीओ लेक्चर्स, ई-स्टडी मटेरिअल, ई-टेस्ट अशा सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी करता येईल. हा गेल्या काही वर्षांत रुजत चाललेला अभ्यासाचा नवा ट्रेंड असून देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना देशातील कुठल्याही दर्जेदार संस्थांद्वारे आणि प्रशिक्षकांद्वारे

ई-लर्निगद्वारे मार्गदर्शन मिळू शकते.

जेईई परीक्षा गांभीर्यपूर्वक देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने अकरावी आणि बारावीत या परीक्षेसाठी दररोज ६ ते ८ तास नेमाने अभ्यास करणे आवश्यक ठरते. असा प्रश्न अनेकदा विचारला जातो की, जेईईच्या अभ्यासाठी टीनएजमधील दोन महत्त्वाच्या वर्षांतील मौजमजेचा त्याग करणं आवश्यक ठरतं का? हे लक्षात घ्यायला हवं की, चार वर्षांचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम हा एमएचटी-सीईटीवर नाही तर जेईई अभ्यासावर आधारित आहे. म्हणूनच अभियांत्रिकी शाखेला जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने अकरावी-बारावीत जेईईचा अभ्यास करायला हवा आणि या दोन वर्षांच्या कालावधीत अभ्यासेतर उपक्रम कमी करावेत. जेईईच्या अभ्यासाचा मार्ग तुम्हाला बरंच काही मिळवून देणारा ठरतो आणि या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकीच्या चार वर्षांचा पाया हा अधिक मजबूत होतो. विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय शिल्लक असतात- एक तर अकरावी-बारावीला मजा करून नंतर अभियांत्रिकीची चार वर्षे रडत-कण्हत काढायची किंवा अकरावी-बारावीला अत्यंत कठोर मेहनत घेऊन जेईईचा अभ्यास करत अभियांत्रिकीची चार वर्षे एन्जॉय करायची. हुशार विद्यार्थी यातील अचूक पर्याय निवडतील.

ज्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च प्रतीची तार्किक बुद्धिमत्ता आहे, अशाच विद्यार्थ्यांनी जेईईच्या अभ्यासाकडे वळावे. हा अभ्यास साधारण क्षमतेच्या मुलांना झेपतोच असे नाही. ही गोष्ट आपल्या पाल्याला जेईईच्या अभ्यासाला जुंपताना पालकांनी ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे.

जेईईची तयारी कधीपासून करावी?

जेईईची तयारी अकरावी-बारावी या दोन वर्षांच्या कालावधीत करता येईल. मात्र ११० पाठांवर आधारित प्रश्न सोडविण्याची क्षमता दोन वर्षांत प्राप्त करणे हा बहुतेक विद्यार्थ्यांसाठी तणावपूर्ण अनुभव असतो. म्हणून जेईई तयारीसाठी आठवी ते दहावीपासून तयारी करायला सुरुवात केली तर अकरावी-बारावीला जेईईच्या तयारीचा ताण येत नाही. आयआयटी फाऊंडेशनच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांने आठवी अथवा नववीच्या काळात किमान एक वर्ष तरी गुंतवणूक केली

तर तो विद्यार्थी शालेय स्तरावर अनुसरल्या जाणाऱ्या ‘घोका आणि ओका’ या अभ्यासपद्धतीतून बाहेर येईल आणि गणित आणि विज्ञान या विषयांच्या मूलभूत संकल्पनांबाबत त्यांची समज वाढेल. याची अतिशय मदत मुलांना अकरावी-बारावीच्या वर्षांत होते आणि मग एक ओझे म्हणून न पाहता मुलं त्यांचा अभ्यास एन्जॉय करतात. आज जो विद्यार्थी तणावाने पिचून निघतो आहे, त्यावर ही अभ्यासप्रक्रिया एन्जॉय करणे हा उतारा ठरू शकेल.

mdurgesh@yahoo.com