भारतीय नौदलाच्या केरळच्या इझीमला येथील इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडेमीत एज्युकेशन आणि लॉजिस्टिक बॅचमध्ये जानेवारी २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.

एज्युकेशन बॅच :

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

पात्रता- एम.एस्सी/एमए/एमसीए/बी.ई.  (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा – २१-२५ वष्रे.

लॉजिस्टिक बॅच :

पात्रता- बी.ई. (कोणतीही शाखा)/ एमसीए/ एमबीए किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण किंवा बी.एस्सी./ बीकॉम किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण. दोन वर्षांचा पूर्ण वेळ फायनान्स/ लॉजिस्टिक/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी/ पदविका उत्तीर्ण.

वयोमर्यादा : १९ १/२ – २५ वष्रे. टेिनगदरम्यान पूर्ण वेतनासह सब-लेफ्टनंट पदावर तनाती.

अर्जप्रक्रिया

अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.joinindiannavy.gov.in – ऑफिसर्स एंट्री- अ‍ॅप्लाय ऑनलाइन येथे  ९ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाच्या िपट्रआऊटची फायनल रिसिट आवश्यक त्या कागदपत्रांसह खालील पत्त्यावर १९ एप्रिल २०१६ पर्यंत पोहोचतील, असे साध्या टपालाने पाठवावेत. पत्ता- पोस्ट बॉक्स नं. ४, आर. के. पुरम, मेन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११००६६.

 

युवा विकास अभ्यासक्रम

केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हल्पमेंट, श्री पेरुंबुदूर येथे उपलब्ध असणाऱ्या दोन वर्षीय कालावधीच्या खालील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

उपलब्ध अभ्यासक्रम : 

एम.एस्सी. काऊंसिलिंग सायकॉलॉजी

एमए- जेंडर स्टडीज

एमए- सोशल इनोव्हेशन अ‍ॅण्ड एंटरप्रेन्युअरशिप

एमए- डेव्हलपमेंट पॉलिसी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस

एमए- लोकल गव्हर्नमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट

एमए- सोशल वर्क (यूथ अ‍ॅण्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट) या विषयांचा समावेश आहे.

शैक्षणिक अर्हता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ४५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

प्रवेश पद्धती : अर्जदारांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव गटांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

अर्जासह पाठवायचे शुल्क : प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी २०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी १०० रु.) भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी इन्स्टिटय़ूटच्या www.rgniyd.gov.in अथवा www.atdcindia.co.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत :  भरलेले व आवश्यक अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह  असिस्टंट रजिस्ट्रार, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट, पेन्नलूर, श्रीपेरुंबुदूर-६०२१०५, तामिळनाडू या पत्त्यावर १५ एप्रिल २०१६ पर्यंत पोहोचतील  अशा बेताने पाठवावेत.

 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील एमएस- पीएच.डी

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपड येथे एमएस- पीएच.डी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे-उपलब्ध विषय- संशोधनपर एमएस, थेट पीएच.डी, नियमित पीएच.डी व बा स्वरूपात पीएच.डी करण्याच्या संधी जैववैद्यक अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे, मेकॅनिकल अ‍ॅण्ड मटेरियल इंजिनीअरिंग, गणित, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये उपलब्ध आहेत.

शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी वर नमूद केलेल्या विषयांमध्ये बीई, बीटेक, एमई, एमटेक, एमए, एमएस्सी अथवा बीई- बीटेक, बीएम-एमएस  संयुक्त अभ्यासक्रम यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी अथवा ते या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. अर्जदारांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना संशोधनपर क्षेत्रात काम करण्यात रुची असावी.

निवड प्रक्रिया- अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. त्यांच्या शैक्षणिक पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित विषयातील एमएस वा पीएच.डी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहिती- अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपडची जाहिरात पाहावी अथवा आयआयटीच्या www.iitrpr.ac.in/admissions या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत- प्रवेश अर्ज रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी,  रूपनगर, रोपड, पंजाब- १४०००१ या पत्त्यावर १५ एप्रिल २०१६पर्यंत पाठवावा.