मी बी.एस्सी. हॉर्टकिल्चरच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. या क्षेत्रात कुठल्या संधी उपलब्ध आहेत?

प्रथमेश भावे

तुला फ्लोरिकल्चरिस्ट (पुष्पनिर्मिती आणि संबंधित बाबी), पोमॉलॉजिस्ट (फलोत्पादन आणि आनुषंगिक बाबी), ओलेरिकल्चरिस्ट (भाजीपाला उत्पादन आणि संबंधित क्षेत्र) अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करता येऊ शकेल. ही अर्हता प्राप्त असलेल्या व्यक्तींना कृषी व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, टी/कॉफी गार्डन इस्टेट व्यवस्थापक, अन्न प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञ, कृषी अधिकारी, वनाधिकारी म्हणूनही करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बँकेतील विस्तार अधिकारी, राज्य सेवा आणि केंद्रीय नागरी सेवेतील विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.

मी बारावी कॉम्प्युटर सायन्स विषय घेऊन करत आहे. मला भारतीय नौदल, हवाई दल किंवा लष्करी सेवेमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे लागेलनागरी सेवेत काम करण्यासाठी कोणत्या विद्याशाखेतील पदवी घेणे फायदेशीर ठरेल?

ईश्वर प्रजापती

नॅशनल  डिफेन्स अकॅडेमीची परीक्षा देऊन बारावीच्या अर्हतेवर सन्यदलात प्रवेश करता येतो. पदवीधरांसाठी लष्करातील विविध पदांकरता सामायिक संरक्षण लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते. बारावी या अर्हतेवर आधारित एअरमन या पदासाठीही प्रयत्न करता येऊ शकतात. १०+२ टेक्निकल एन्ट्री स्कीमद्वारे चार वष्रे कालावधीच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. नागरी सेवा परीक्षेसाठी कोणत्याही विषयातील पदवी ही किमान अर्हता आहे. ज्या विषयात रूची आणि गती असेल त्या विषयात पदवी घेणे उचित ठरेल.

मी बारावीत विज्ञान शाखेमध्ये शिकत असून  अभियांत्रिकी वगळता अन्य तांत्रिक संधींबाबत मार्गदर्शन करावे तसेच संबंधित विविध प्रवेश परीक्षांची माहिती द्यावी.

प्रवीण आगलावे

जर बारावीमध्ये जीवशास्त्र घेतले असल्यास अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, औषधनिर्माणशास्त्र, जैवतंत्रज्ञान आदी क्षेत्रांत करिअर करता येईल. गणित विषय घेतला असल्यास गणितज्ज्ञ, सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून करिअर करता येईल. विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी करून संशोधन क्षेत्रातही करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. पदवी परीक्षेनंतर राज्य व नागरी सेवा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा, बँकिंग क्षेत्रातील परीक्षा देता येतात.

मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.एस्सी.ची पदवी घेतली आहे. मला कृषी-एमपीएससी देता येईल का? मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. कृषी एमपीएससी इंग्रजी भाषेत असते.

अर्चना राजमाने

जर तू मुक्त विद्यापीठातून कृषी विषयात पदवी घेतली असशील तर तुला कृषी एमपीएससी देता येईल. या परीक्षेसाठी मराठी अथवा इंग्रजी माध्यमामुळे कोणताही फरक पडत नाही, ही बाब ध्यानात घ्यावी.

   मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला रॉकेट इंजिनीअर व्हायचे आहे. त्यासाठी मार्गदर्शन करावे.

तुषार जाधव

एरोस्पेस इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम करून या क्षेत्रात प्रवेश करता येऊ शकतो. त्यासाठी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय घेणे आवश्यक आहे. जेइइ मेन परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संबंधित शाखेत प्रवेश मिळवता येतो. जेइइ अ‍ॅडव्हान्स्ड  या परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्येही या शाखेत प्रवेश मिळू शकतो. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी संस्थेतील या विषयाच्या प्रवेशासाठीही जेइइ- अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेतील गुण ग्रा धरले जातात.

मी गोव्यातून हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. सध्या मी ुमन रिसोर्स या विषयात एमबीए करत आहे. हॉटेल मॅनेजमेंटनंतर एमबीए केल्यावर कोणत्या संधी उपलब्ध आहेत? मला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राशी संबधित अध्यापनाच्या क्षेत्रात जायचे असल्यास त्यासाठी कोणती प्रक्रिया अनुसरावी लागते?

निनाद प्रमोद, भोर

एमबीएनंतर हॉटेल उद्योगाशी संबंधित मनुष्यबळ विकास, नियुक्ती, आस्थापनांविषयक विविध कामे, व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील समन्वयक अशा विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील अध्यापन क्षेत्रात येण्यासाठी याच विषयातील पदव्युत्तर पदवी घेतल्यास उत्तम. हॉटेल मॅनेजमेंट शिकवणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या अध्यापक नियुक्तीच्या जाहिराती वेळोवेळी प्रकाशित होतात. त्यावर लक्ष ठेवून अर्ज करावा.

मी ऑटोमोबाइल इंजिनीअिरगच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला ऑटोमोबाइल डिझायिनगमध्ये रस आहे. मी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची निवड करावी की पदवीस्तरीय अभ्यासक्रमाची? यासाठी मी माझा पोर्टफोलिओ कसा सक्षम करू?

सिद्धेश महाजन

तू सध्या ऑटोमोबाइल अभियांत्रिकीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. या विषयातील पदवी घेतल्यावर तुला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन किंवा आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याकरता प्रयत्न करता येतील. या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. त्यामध्ये तुमच्या डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूडची चाचपणी केली जाते.

मी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षांला शिकत असून गणित विषय घेतला आहे. मला कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, पुणे येथे अभियांत्रिकी  किंवा आयआयटीमध्ये गणितात एम.एस्सी. करायचे आहे. दोन्हीपकी कोणती संस्था उत्कृष्ट आहे?

दत्ता शिनाळकर

दोन्ही संस्था दर्जेदार आहेत. मात्र, अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी तुला परत मागे जावे लागेल. दोन वर्षे बी.एस्सी. केल्यानंतर तसे करणे म्हणजे वेळ, वष्रे, परिश्रम आणि इतर साधनसामग्री आणि पसा वाया दवडणे ठरेल. तेव्हा एमएस्सी करणे योग्य ठरेल.

माझा मुलगा यंदा पाचवीत शिकत आहे. पुढील शिक्षण मोफत होण्यासाठी एखादी परीक्षा असल्यास माहिती द्यावी.

राजेश काळगुंडे, जिंतूर, परभणी

केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रात अशी ३२ विद्यालये आहेत. या विद्यालयांतील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ- www.nvshq.org

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)