आजच्या लेखात आपण पोलीस उपनिरीक्षक पद, त्याचे कार्य, निवडप्रक्रिया व अभ्यासपद्धती यांची माहिती घेऊ या. पोलीस उपनिरीक्षक हे अराजपत्रित गट ‘ब’ पद असून त्यांची नियुक्ती राज्य सरकारच्या पोलीस दलाच्या राज्यातील कोणत्याही कार्यालयात होते, तसेच ज्येष्ठता व पात्रतेनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यावरील पदांकरता पदोन्नती होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था यांच्या रक्षणाची जबाबदारी या पदांवर असते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट ‘अ’ राजपत्रित) या पदासाठी राज्यसेवा परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक (गट ‘ब’ अराजपत्रित) पदासाठी स्वतंत्र परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबवली जाते.

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…
uture of 574 candidates in Talathi recruitment is uncertain
तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

परीक्षेचे टप्पे

  • पूर्वपरीक्षा (१०० गुण)
  • मुख्य परीक्षा (२०० गुण)
  • शारीरिक चाचणी ( १०० गुण)
  • मुलाखत (४० गुण)

पूर्वपरीक्षेत किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतात. अन्य साहाय्यक किंवा विक्रीकर निरीक्षक परीक्षेपेक्षा  या परीक्षेसाठी शारीरिक पात्रतेची अट आवश्यक ठरते.

अंतिम निकालांच्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांची विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरतात.

पहिला टप्पा – पूर्वपरीक्षा

पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा आता नव्या आकृतिबंधानुसार पार पडत आहेत. खुल्या प्रवर्गातून मुख्य परीक्षेसाठी निवडल्या गेलेल्या शेवटच्या उमेदवाराला पूर्वपरीक्षेत १०० पकी ४४ गुण मिळाले होते. इतर संवर्गातील यशस्वी विद्यार्थ्यांचे गुण थोडय़ाफार फरकाने असेच होते. म्हणजेच पूर्वपरीक्षेचे स्वरूप बदललेले असून या परीक्षेची काठीण्यपातळी वाढल्याचे लक्षात येते.
Untitled-14

पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

  • नागरिकशास्त्र- राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व ग्रामीण प्रशासन.
  • आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इ.
  • अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बॅकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इ. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इ.
  • सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.

पूर्वपरीक्षेचे विश्लेषण

२०१४च्या पूर्वपरीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितावर केवळ १० प्रश्न होते तर गतवर्षीच्या परीक्षेत एकूण २८ प्रश्न बहुविधानात्मक पर्यायांचे होते.

पूर्वपरीक्षेच्या नव्या आकृतिबंधातील बहुविधानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता असते. जास्त प्रश्न सोडवताना किंवा घाईगडबडीत हे प्रश्न हमखास चुकण्याची शक्यता असते, म्हणूनच सखोल अभ्यास व अशा प्रश्नांचा सराव आवश्यक ठरतो.

अभ्यासाचे नियोजन

  • विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम विषयवार अभ्यासक्रम स्वत: लिहून काढावा व त्यानंतर प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाखाली मागील तीन वर्षांच्या परीक्षांत आलेले त्या संबंधित सर्व प्रश्न उत्तरांसहित लिहून काढावे, यामुळे अभ्यासाची दिशा अधिक नेमकी होईल.
  • एका वेळेस दोन विषय व ठरावीक दिवस ठेवावेत.
  • रोज संध्याकाळी वर्तमानपत्राचे वाचन करून टिपणं काढावीत.
  • दररोज दुपारच्या वेळेत बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवावेत.
  • दोन अभ्यासांच्या सेक्शन दरम्यानच्या वेळेत MCG सोडवावेत.
  • दर शनिवारी, सोमवार ते शुक्रवारी केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी.
  • दर रविवारी फक्त त्या दिवशीच्या आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांच्या पुरवण्या व विशेष लेखांचे आणि स्पर्धा परीक्षा मासिकांचे वाचन करावे.

संदर्भसाहित्य सूची

  • चालू घडामोडी- लोकराज्य, योजना, करंट ग्राफ.
  • नागरिकशास्त्र-‘एनसीईआरटी’ची राज्यशास्त्रावरील पुस्तके, भारतीय राज्यघटना- डी.डी. बसू (मराठी), भारत की राज्यव्यवस्था- एम. लक्ष्मीकांत (िहदी/इंग्रजी)
  • इतिहास- ‘एनसीईआरटी’ची सातवी ते बारावीची पुस्तके, राज्य परीक्षा मंडळाची पाचवी, आठवी व अकरावीची पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर, बेल्हेकर (मराठी)
  • भूगोल- ‘एनसीईआरटी’ची सहावी ते बारावीची पुस्तके, महाराष्ट्राचा भूगोल – सवदी, इंडिया इयर बुकमधील पाठ.
  • अर्थव्यवस्था- ‘एनसीईआरटी’चे अकरावीचे पुस्तक, भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, ‘इंडिया इयर बुक’मधील पाठ.
  • विज्ञान- ‘एनसीईआरटी’ची सहावी ते बारावीची पुस्तके, राज्य परीक्षा मंडळाची आठवीते बारावी पुस्तके.
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित- स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी, Quantitative Aptitude- आर. एस. अग्रवाल.
  • सराव- एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन बोर्डच्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाटा मॅकग्राहितचे विषयानुरूप प्रश्नसंच.

Untitled-15

पुढील लेखात आपण पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा आणि त्या अनुषंगाने अभ्यास यासंबंधी माहिती घेऊ.