बिकानेर येथील स्वामी केशवानंद राजस्थान कृषी विद्यापीठात कृषी व्यवस्थापन क्षेत्रांतर्गत उपलब्ध असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
एमबीए- अ‍ॅग्री बिझनेस : दोन वर्षे कालावधीच्या या पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी कृषी अथवा विज्ञानासह कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय कॅट (कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) – २०१५ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘कॅट’मधील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल आणि त्याआधारे त्यांना एमबीए- कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
करिअर संधी- अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना कृषी, कृषी उद्योग, कृषी व्यवस्थापन, ग्रामीण व अन्न प्रक्रिया उद्योग यांसारख्या क्षेत्रांशिवाय विविध सहकारी संस्था, सरकारी विभाग, शैक्षणिक- संशोधन संस्था आदींमध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह डायरेक्टर, इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, स्वामी केशवानंद राजस्थान अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, बिकानेर, राजस्थान या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
ऑक्युपेशनल थेरपीविषयक सुधारित माहिती
२३ नोव्हेंबरच्या करिअर वृत्तान्तमध्ये ‘समांतर आरोग्यसेवा क्षेत्रातील करिअर संधी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात उल्लेख केलेल्या ऑक्युपेशनल थेरपी या क्षेत्राविषयीची सुधारित माहिती पुढीलप्रमाणे आहे-
ऑक्युपेशनल थेरपी हे करिअर क्षेत्र आरोग्यक्षेत्राशी संबंधित असून यातील पदवी अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा असून, पदव्युत्तर अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. या विषयाचा पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर यासंबंधित क्लिनिकल, शिक्षण क्षेत्रात ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून कार्यरत होता येते. लेखात उल्लेख केल्यानुसार परिचारिका अथवा ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ म्हणून काम करता येत नाही.

अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली बिकानेरच्या स्वामी केशवानंद कृषी विद्यापीठाची जाहिरात पाहावी अथवा विद्यापीठाच्या http://www.iabmbikaucr.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.