दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व  न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्वपरीक्षा- २०१६.

ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ जून २०१६ रोजी घेण्यात येईल. उपलब्ध पदसंख्या- १३१.

पात्रतेच्या अटी : * नवीन विधी पदवीधरांकरता- वयोमर्यादा २१ ते २५ वष्रे. अर्हता- विधी शाखेतील पदवी. प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण हवी. पदवी अंतिम वर्ष  परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावी.

  • वकील, अ‍ॅटर्नी किंवा अधिवक्ता यांच्याकरता- वयोमर्यादा २१ ते ३५ वष्रे. अर्हता- विधी शाखेतील पदवी. ३ वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव.
  • न्यायालयातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांकरता- वयोमर्यादा- २१ ते ४५ वष्रे. अर्हता- विधी शाखेतील पदवी. पदवीनंतर ३ वर्षांचा अनुभव. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिलक्षम. वयोमर्यादेसाठी

१ जुल २०१६ रोजीचे वय ग्राह्य़ धरण्यात येईल.

परीक्षेचे टप्पे –  पूर्व परीक्षा- १०० गुण. मुख्य परीक्षा-

२०० गुण आणि मुलाखत- ५० गुण. लेखी मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवड. प्रस्तुत पदावरील नियुक्ती तीन वर्षांच्या परिवीक्षाधीन असेल.

पूर्वपरीक्षेचे शुल्क – रु. ३७३ (मागासवर्गीय रु. २७३).

ऑनलाइन पद्धतीने अर्ज mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर १२ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत.

भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटरच्या रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबईचा शिक्षणक्रम.

डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटोप्स टेक्निक्स (डीएमआरआयटी) या पदव्युत्तर पदविकेच्या १० जागांसाठी प्रवेश.

  • प्रशिक्षण कालावधी- शैक्षणिक वर्ष (२०१६-१७)साठी दोन सत्रे. प्रत्येक सत्रअखेरीस परीक्षा होणार.
  • पात्रतेच्या अटी – केमिस्ट्री किंवा फिजिक्स किंवा लाइफ सायन्सेस किंवा न्यूक्लिअर मेडिसिनमधील विज्ञान शाखेची पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.
  • वयोमर्यादा – १ मे २०१६ रोजी ३५ वष्रेपर्यंत.
  • प्रवेश परीक्षा – कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) – १५० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची- केमिस्ट्री, फिजिक्स, गणित किंवा बायोलॉजी या विषयांवर बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. ९,३०० विद्यावेतन मिळेल. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज लिफाफ्यावर ‘डीएमआरआयटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट’ असे लिहून खालील पत्यावर १५ एप्रिल २०१६ पर्यंत पोहोचतील, असे खालील पत्त्यावर पाठवावेत. डेप्युटी एस्टाब्लिशमेन्ट ऑफिसर (आर.व्ही.), भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंट्रल, ट्रॉम्बे, मुंबई – ४०० ०८५.

राष्ट्रीय लघुउद्योग निगम लिमिटेडच्या देशभरातील आस्थापनांमध्ये सिस्टीम ऑपरेटर ग्रेड-कक च्या एकूण २० पदांची भरती.

  • पात्रता- पदवी उत्तीर्ण. मान्यताप्राप्त संस्थेचा १ वर्ष कालावधीचा संगणक कोर्स.ो कमाल वयोमर्यादा- २५ वष्रे (एससी/एसटी ३० वष्रे, इमाव २८ वष्रे).
  • निवड पद्धती- लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवडलेल्या उमेदवारांना संगणकावर ४० श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टायिपगची स्किल टेस्ट द्यावी लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज nsic.co.in या संकेतस्थळावर ९ एप्रिल पर्यंत करावेत.

इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम येथे पदांची भरती.

  • टेक्निकल असिस्टंट- इलेक्ट्रॉनिक्स (१४ पदे), मेकॅनिकल (१२ पदे) केमिकल/ इलेक्ट्रिकल (प्रत्येकी ३ पदे), सिव्हिल, इन्स्ट्रमेंटेशन, फोटोग्राफी (प्रत्येकी १ पद)- पात्रता- संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा प्रथम वर्गात उत्तीर्ण.
  • सायन्टिफिक असिस्टंट- केमिस्ट्री (३ पदे), अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टकिल्चर (१ पद)- पात्रता- संबंधित विषयात प्रथम वर्गातील पदवी. वयोमर्यादा- ११ एप्रिल २०१६ रोजी ३५ वर्षांपर्यंत (अजा/अज  – ४० वष्रे, इमाव ३८ वष्रे) परीक्षा शुल्क- रु. २५० (महिला/ अजा/अज/अपंग यांना फी माफ) दोन्ही पदांसाठी किमान वेतन रु. ४१,९००). अर्ज ऑनलाइन पद्धतीने vssc.gov.in या संकेतस्थळावर ११ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत.
  • टेक्निशियन – बी (६१ पदे) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (१९ पदे), फिटर (२१ पदे), मशिनिस्ट (६ पदे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन इ. पात्रता- दहावी उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय/एनटीसी/एनएसी उत्तीर्ण.
  • ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (७ पदे)- पात्रता- दहावी उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय/एनटीसी/एनएसी.
  • कुक (४ पदे) पात्रता-  दहावी उत्तीर्ण  ५ वर्षांचा अनुभव.   कॅटरिंग अटेंडंट- पात्रता दहावी उत्तीर्ण, वयोमर्यादा- कॅटरिंग अटेंडंटसाठी १८ ते २५ वष्रे इतर पदांसाठी १८ ते ३५ वष्रे (कमाल वयोमर्यादा अजा/अज- ५ वष्रे अणि इमाव- ३वष्रे शिथिलक्षम)- ऑनलाइन पद्धतीने अर्ज vssc.gov.in या संकेतस्थळावर ११ एप्रिल २०१६-१७ पर्यंत करावेत.

ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे  ट्रेड्समनच्या एकूण १३१ पदांची भरती.

मशिनिस्ट (४९ पदे), फिटर (जनरल) (२७ पदे), मोल्डर/ फौंड्री मॅन (१२ पदे), टर्नर (१२ पदे), एक्झामिनर (८ पदे), फिटर (टूल आणि गेज) (५ पदे), ग्राइंडर (५ पदे), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, मिलराईट, वेल्डर इ. पात्रता- दहावी उत्तीर्ण  संबंधित ट्रेडमधील एनसीव्हीटी (अप्रेन्टिस परीक्षा) उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८-३२ वष्रे. परीक्षा शुल्क – रु. ५०/- ‘एसबीआय’मार्फत. निवड पद्धती- (१) वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) लेखी परीक्षा- पार्ट ‘ए’. (२) सामान्य विज्ञान (१० गुण). (३) गणित (१० गुण); पार्ट ‘बी’ संबंधित ट्रेडवरील ८० गुणांसाठी ८० प्रश्न. एकूण १०० गुण. कालावधी दोन तास आणि (२) ट्रेड टेस्ट (प्रॅक्टिकल) फक्त कॉलिफाइंग नेचर मल्टी टािस्कग स्टाफ (४ पदे). पात्रता- दहावी उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८ ते २५ वष्रे (उच्चतम वयोमर्यादेत अजा/अज ५ वर्षांनी आणि इमाव ३ वर्षांनी शिथिलक्षम). ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.ofb.gov.in या संकेतस्थळावर ९ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरिंटेंडेंटच्या ४ जागा

अर्हता- पदवीधर. पदव्युत्तर पात्रताधारकांना प्राधान्य. अधिक तपशिलासाठी  आयआयटीच्या  http://www.iitb.ac.in/ en/ careers/ staff- recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई, मुंबई- ४०००७६ या पत्त्यावर ७ एप्रिलपर्यंत पाठवावेत.

वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत हातमाग विकास आयुक्तालय, मुंबई येथे साहाय्यक म्हणून संधी

अर्हता- पदवीधर. कार्यालयीन कामाचा २ वर्षांचा अनुभव. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २७ फेब्रुवारी- ४ मार्च २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अर्ज संचालक (पश्चिम क्षेत्र), वस्त्रोद्योग मंत्रालय, हातमाग विकास आयुक्तालय, १५-ए, मामा परमानंद मार्ग, मुंबई- ४००००४ या पत्त्यावर ७ एप्रिलपर्यंत पाठवावेत.

डीआरडीओमध्ये रिसर्च असोसिएशट्सच्या ४ जागा

अर्हता- इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अथवा भौतिकशास्त्र, जियोफिजिक्स यांसारख्या विषयातील पीएच.डी. वयोमर्यादा- ३५ वर्षे. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ मार्च २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अर्ज डायरेक्टर, सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टिम्स अ‍ॅण्ड सायन्सेस, आरसीआय कॅम्पस्, विज्ञानकांचा पोस्ट ऑफिस, हैदराबाद- ५०००६९ येथे ९ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

डीआरडीओमध्ये संशोधकांच्या १५८ जागा

अर्हता- इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयातील एमएस्सी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा- २८ वर्षे. अधिक तपशिलासाठी  rac.gov.in संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरे्शन ऑफ इंडियामध्ये अधिकारी साहाय्यक व्यवस्थापकांसाठी संधी

अर्हता- इंजिनीअरिंग, अर्थशास्त्र, वाणिज्य, विधी, विमा यांसारख्या विषयातील पदवीधर. वयोमर्यादा-

३० वर्षे. www.gicofindia.in वरील संकेतस्थळावर ११ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मॅनेजर, प्रोजेक्ट्सच्या ४ जागा

उमेदवारांनी इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ मार्च २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.seci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.  वरील संकेतस्थळावर १२ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.