अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ फेब्रुवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.recpdcl.in किंवा www.recindia.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आरईसी पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लि. १०१६- १०२३, दहावा मजला, देविका टॉवर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली ११००१९ या पत्त्यावर २६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

सरकारी टांकसाळ, कोलकोता येथे कनिष्ठ कार्यालयीन साहाय्यकाच्या ११ जागा

उमेदवारांनी पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक तपशिलासाठी  igu kolkata.spmcil.com या संकेतस्थळावर  Job opportunity या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे राज्यातील विद्यार्थ्यांना संधी

अधिक तपशिलासाठी  www.spiaurangabad.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे २८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये यूपीएससी-एमपीएससी स्पर्धा मार्गदर्शन.

या मार्गदर्शन केंद्रात यूपीएससी-एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येकी ३० अशा एकूण ६० जागा उपलब्ध आहेत. अधिक तपशिलासाठी  campus.unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

राष्ट्रपती भवन कार्यालयात माळीकाम करणाऱ्यांच्या ५८ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा- २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ फेब्रुवारी २०१६च्या अंकातील जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि डेप्युटी सेक्रेटरी (एस्टॅब्लिशमेंट), राष्ट्रपती सचिवालय, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली- ११०००४ या पत्त्यावर २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

एनटीपीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रशिक्षणार्थी- मानव संसाधनाच्या २५ जागा

उमेदवार पदवीधर असावेत. त्यांनी पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, ुमन रिसोर्सेसमधील पदव्युत्तर पदवी वा एमबीए पात्रता किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा- २९ वर्षे.

अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ फेब्रुवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.ntpccarrers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटय़ूट, बंगळुरू येथे साहाय्यकांच्या १६ जागा

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची २५ शब्द प्रतिमिनीट पात्रता असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ फेब्रुवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.cpri.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापक (राजभाषा) पदाच्या १२ जागा

उमेदवारांनी हिंदीतील पदव्युत्तर पदवी किमान प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी पदवी परीक्षेसाठी इंग्रजी हा एक आवश्यक विषय घेतलेला असावा अथवा हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी घेतलेली असावी. त्यानंतर इंग्रजीमधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. इंग्रजी- हिंदी- इंग्रजी भाषांतर पदविका प्राप्त उमेदवारांना प्राधान्य.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० जानेवारी- ५ फेब्रुवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अथवा http://www.recindia.gov.in kcarrersl tab <<Jobs या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

नॅशनल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक येथे कनिष्ठ कारकुनांच्या ६ जागा

उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० जानेवारी- ५ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सिनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक- ७३५००६, ओडिशा या पत्त्यावर २ मार्च २०१६ पर्यंत अर्ज करावा.

स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती

केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रुप ‘बी’ आणि ‘सी’ पदांची भरती करण्यासाठी १९७७ साली स्टाफ सिलेक्शन कमिशनची नेमणूक करण्यात आली. सुरुवातीला वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात असत. गेल्या काही वर्षांपासून समान पात्रतेचे निकष असलेल्या पदांसाठी एकत्रित करून दरवर्षी परीक्षा घेतल्या जात आहेत- उदा. (१) दहावी उत्तीर्ण किमान पात्रतेचे निकष असलेली मल्टिटािस्कग (नॉन टेक्निकल) स्टाफ परीक्षा. (२) बारावी उत्तीर्ण किमान पात्रतेचे निकष असलेली कम्बाइण्ड हायर सेकंडरी (१० + २) लेव्हल परीक्षा ज्याद्वारे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या पदांची भरती होते. (३) किमान पदवी उत्तीर्ण पात्रतेचे निकष असलेली कम्बाइण्ड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा. (४) किमान पदविका अथवा पदवीधारक अभियंत्यांसाठी ज्युनिअर इंजिनीअर परीक्षा इत्यादी.

१३ फेब्रुवारी २०१६ च्या ‘एम्प्लॉयमेंट  न्यूज’च्या अंकात ‘कम्बाइण्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन २०१६ (टायर-क)’  (सी.जी.एल.-२०१६) जाहीर झाली आहे. ही जाहिरात स्टाफ सिलेक्शनच्या www.ssc.nic.in या संकेतस्थळावर Notices पाहता येईल. या परीक्षेद्वारे कम्बाइण्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन २०१६ (टायर- II )  साठी उमेदवार निवडले जातील. या परीक्षेद्वारे खालील महत्त्वाच्या पदांची भरती केली जाते-

  • असिस्टंट (इन्टेलिजन्स ब्युरो आणि केंद्र सरकारचे विविध विभाग) म्
  • इन्स्पेक्टर (इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साइज, कस्टम्स, पोस्ट, एन.सी.बी.)
  • सब इन्स्पेक्टर (सी.बी.आय/ एन.आय.ए./ एन.सी.बी.)
  • असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट)
  • डिव्हिजनल अकाऊंटंट (सी. अ‍ॅण्ड ए.जी. खाते म्हणजेच कॅग)
  • स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड कक
  • ऑडिटर
  • अकाऊंटंट / ज्युनिअर अकाऊंटंट
  • टॅक्स असिस्टंट
  • असिस्टंट ऑडिट ऑफिसर
  • कम्पायलर
  • सीनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट.

वरील सर्व पदांसाठी मुलाखत असणार नाही.

शैक्षणिक पात्रता- ‘असिस्टंट ऑडिट ऑफिसर’ पदांसाठी  इष्ट- पात्रता – सी.ए./ आयसीडब्ल्यूए/  सीएस / एम.बी.ए. (फायनान्स)/ एम.कॉम.

कम्पायलर पदांसाठी- स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथ्स किंवा इकोनॉमिक्स विषयांसह पदवी.

स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड II – स्टॅटिस्टिक्समधील पदवी अथवा बारावीला गणितात किमान ६० टक्के गुण आणि कोणत्याही विषयातील पदवी.

इतर पदांसाठी – कोणत्याही शाखेची पदवी.

पदवी परीक्षेच्या अंतिम परीक्षेला बसणारे उमेदवार सी.जी.एल. (टायर I) परीक्षेस पात्र आहेत.

वयोमर्यादा :

१ ऑगस्ट २०१६ रोजी. असिस्टंट सेक्शन ऑफिसर /असिस्टंट ऑडिट ऑफिसर /असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर/ सब इन्स्पेक्टर सी.बी.आय. आणि सब इन्स्पेक्टर एन.आय.ए. या पदांसाठी ३० वर्षांपर्यंत.

स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर पदासाठी ३२ वर्षांपर्यंत. इन्टेलिजन्स ब्युरोमधील असिस्टंट पदांसाठी- २१ ते २७ वर्षे.

सब इन्स्पेक्टर सी.बी.एन.साठी १८ ते २५ वर्षे. इतर पदांसाठी- १८ ते २७ वर्षे. इतर मागास वर्गासाठी ३ वर्षांनी आणि एस.सी./एस.टी.साठी ५ वर्षांनी उच्च वयोमर्यादा शिथिलक्षम.

परित्यक्त्या / विधवा महिला खुला प्रवर्ग वयोमर्यादा ३५ वर्षांपर्यंत, इ.मा.व.साठी ३८ वर्षांपर्यंत आणि एस.सी./ एस.टी.साठी वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत.

केंद्र सरकारमधील कर्मचारी ज्यांची किमान

३ वर्षांची सलग नोकरी झाली आहे अशांना (अ) ग्रुप ‘बी’साठी खुला प्रवर्ग, इ.मा.व. आणि एस.सी./एस.टी. यांना अनुक्रमे ५ वष्रे, ८ वर्षे आणि १० वर्षांनी उच्च वयोमर्यादा शिथिल. (ब) ग्रुप ‘सी’साठी खुला प्रवर्ग, इ.मा.व. एस.सी./एस.टी. यांना उच्चतम वयोमर्यादा अनुक्रमे ४० वर्षे, ४३ वर्षे व ४५ वर्षांपर्यंत.

  • अपंग उमेदवारांसाठी खुला प्रवर्ग, इ.मा.व. एस.सी./एस.टी. यांना उच्चतम वयोमर्यादा १०, १३ आणि १५ वर्षांनी शिथिलक्षम.
  • परीक्षा शुल्क रु. १०० मात्र. कोणत्याही प्रवर्गातील महिला, एस.सी./एस.टी. अपंग, माजी सनिक यांना शुल्कमाफ आहे.

इन्स्पेक्टर (सेंट्रल एक्साइज, प्रिव्हेन्टिव्ह ऑफिसर, एक्झामिनर), इन्स्पेक्टर /सब-इन्स्पेक्टर (सेन्ट्रल ब्युरो अॉफ नार्कोटिक्स), सब इन्स्पेक्टर (सीबीआय/एनआयए) या पदांसाठी शारीरिक पात्रतेच्या अटी असून उमेदवारांनी आपली पात्रता पूर्ततेची खात्री करूनच अर्ज करावेत.

पदांसाठीचा पसंतीक्रम :  पदांचा पसंतीक्रम उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावा. ज्या पदासाठी उमेदवाराने आपला पसंतीक्रम लिहिला नसेल त्या पदांसाठी त्याचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

परीक्षा पद्धती : टायर- I आणि टायर- II ची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. टायर- III मध्ये कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट- असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी आणि टॅक्स असिस्टंटच्या पदासाठी संगणकावर ८००० की डिप्रेशन्स प्रति तास या गतीने टायिपग टेस्ट द्यावी लागेल.

टायर- I कालावधी २ तास. एकूण २०० गुण. प्रत्येकी ५० गुणांसाठी एकूण ५० प्रश्न खालील विषयांवर आधारित विचारले जातील- सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, अंकगणित, इंग्रजी भाषेचे आकलन. परीक्षा : ८ मे / २२ मे २०१६.

टायर- II कालावधी प्रत्येकी दोन तास. पेपर- I गणितातील नपुण्य १०० प्रश्न- २०० गुणांसाठी. पेपर- II इंग्रजी भाषेचे आकलन – २०० प्रश्न २०० गुणांसाठी. पेपर  III स्टॅटिस्टिक्स – १०० प्रश्न २०० गुणांसाठी (फक्त स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आणि कम्पायलर या पदासाठी). पेपर- IV – सामान्य अध्ययन (वित्त आणि अर्थशास्त्र) कालावधी दोन तास. एकूण गुण २००. (फक्त असिस्टंट ऑडिट ऑफिसर पदासाठी)

पेपर I आणि पेपर II सर्व पदांसाठी आवश्यक.

टायर – II परीक्षा – १३, १४ ऑगस्ट २०१६ रोजी होईल.

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या  sscregistration.nic.in किंवा    ssconline2.gov.in या संकेतस्थळावर करावेत.

अर्ज करण्याची मुदत- ऑनलाइन अर्ज नोंदणी पार्ट – I १० मार्च २०१६ पर्यंत. पार्ट – II नोंदणी १४ मार्च २०१६ पर्यंत.

सुहास पाटील