सैन्यदलात कायदा पदवीधरांची अधिकारी पदावर नेमणुका होत असून त्या संबंधित अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्रताधारक उमेदवारांनी खाली नमूद केल्यानुसार अर्ज करावेत.

उपलब्ध जागा- एकूण उपलब्ध जागा १४ असून त्यापैकी ४ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.

आवश्यक पात्रता- अर्जदारांनी बारावीनंतरची ५ वर्षे कालावधीची अथवा पदवीनंतरची ३ वर्षे कालावधीची कायदा विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी झालेली असावी. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा- उमेदवारांचे वय २१ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्य दल निवड मंडळातर्फे निवड परीक्षा, मानसशास्त्रीय चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी व फायदे- निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला प्रशिक्षण तत्त्वावर नेमण्यात येईल. त्या दरम्यान त्यांना दरमहा २१ हजार रु. एकत्रित वेतन देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सैन्य दलाच्या कायदा शाखेत लेफ्टनंट म्हणून नेमण्यात येईल. त्यानंतर त्यांना नियमांनुसार प्रचलित वेतनश्रेणी, इतर भत्ते व लाभ आणि भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.

अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

अधिक माहिती

यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in> Registration या संकेतस्थळाला भेट द्यावी.