महाराष्ट्र शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या दुग्धशाळा विज्ञान संस्था- आरे, गोरेगाव, मुंबई येथे दुग्धतंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी ते खुल्या वर्गगटातील असल्यास १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांची बारावीच्या परीक्षेतील पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व गणित विषयातील गुणांची टक्केवारी किमान ५०% असायला हवी.
  • विशेष सूचना- राखीव वर्गगटातील विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या टक्केवारीची वरील अट ५% नी शिथिलक्षम आहे.
  • जागांची संख्या व तपशील- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ४० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
  • अर्ज व माहितीपत्रक- अर्ज व माहितीपत्रक खुल्या वर्गगटातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रु. (राखीव वर्गगटातील विद्यार्थ्यांसाठी १५० रु.) रोखीने भरल्यास दुग्धशाळा विज्ञान संस्था- गोरेगाव, मुंबई शिवाय पशु वैद्यकीय महाविद्यालय परभणी, उदगीर (जि. लातूर) व शिरवळ (जि. सातारा) येथे उपलब्ध आहे. अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी ते खुल्या वर्गगटातील असल्यास ३५० रु. (राखीव वर्गगटातील असल्यास २०० रु) इंडियन पोस्टल ऑर्डरने विनंती अर्जासह संबंधित संस्थेच्या कार्यालयात पाठविणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दुग्धशाळा विज्ञान संस्था- मुंबईच्या दूरध्वनी क्र. ०२२- २९२७२५२२ अथवा principaldsi@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा अथवा प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासन, दुग्धव्यवसाय विकास विभागाची जाहिरात पहावी.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्राचार्य, दुग्धशाळा विज्ञान संस्था- आरे गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६५ या पत्त्यावर ३ जुलै २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

राज्यातील विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना दुग्धतंत्रज्ञान विषयातील पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.   दत्तात्रय आंबुलकर

Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी