नागपूरच्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्स या विशेष अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या ६० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक अथवा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तम टक्केवारीसह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अभ्यासक्रमाचा कालावधी : या अभ्यासक्रमाचा कालावधी
२६ आठवडय़ांचा असेल. अभ्यासक्रमादरम्यान गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासस्थानाची सोय करून देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून ९०० रु.चा ‘एनपीटीआय’च्या नावे असणारा व नागपूर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी नॅशनल पॉवर
ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूरच्या http://www.nptinagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील, कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज दि प्रिन्सिपल-डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, ‘व्हीएनआयटी’समोर, गोपाळनगर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर ४४००२२ या पत्त्यावर १३ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.