कोलकात्याच्या साहा इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लीअर सायन्स या संस्थेतर्फे बीएस्सीचा पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे मार्गदर्शनपर संधी उपलब्ध आहेत.

योजनेचा उद्देश

‘अंडरग्रॅज्युएट असोसिएटशिप  इन फिजिक्स अॅण्ड बायोफिजिकल सायन्सेस’ या योजनेचा मुख्य उद्देश भौतिकशास्त्र व संबंधित विषयात बीएस्सी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक मार्गदर्शन करून त्यांना या क्षेत्रात संशोधनपर काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

शैक्षणिक अर्हता

अर्जदार विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयांसह बारावीची परीक्षा किमान ८५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अथवा बायोलॉजिकल सायन्सेस या विषयांसह बीएस्सी

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत प्रवेश घेतलेला असावा.

योजनेचा तपशील

‘असोसिएटशिप इन फिजिक्स अॅण्ड बायोलॉजिकल सायन्सेस’ या योजनेअंतर्गत निवड झालेल्या असोसिएट्सना, विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत ९० दिवसांच्या विशेष शैक्षणिक  मार्गदर्शनाव्यतिरिक्त  संशोधनपर प्रात्याक्षिकेही करायला मिळतील.

अधिक माहिती

योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी साहा इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लीअर फिजिक्सच्या  www.saha.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०१६ आहे.