विमाक्षेत्रातील अत्यंत मानाचे पद म्हणजे ‘अ‍ॅक्चुअरी’ (Actuary), म्हणजे असा गणितज्ञ जो विमा पॉलिसीची किंमत, प्रीमिअमचा दर, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापन, लाभांशाची तजवीज याविषयी भकिते करतो. त्यानुसार कंपनीला विमा प्रीमिअमचा दर ठरवण्यास माहितीपूर्वक निर्णय घेण्यास सल्ला देतो. थोडक्यात अ‍ॅक्चुअरी शास्त्र पारंगत व्यावसायिक हा जोखीम आणि आर्थिक अनिश्चितता याचा अभ्यासक असतो. त्यामुळे भविष्यातील होऊ घातलेल्या आर्थिक संकल्पांना पूरक अशी जोखीम व्यवस्थापनाची फार मोठी जबाबदारी अ‍ॅक्चुअरी पार पाडत असतो.

*    पात्रता-  बारावी पास विद्यार्थी ACET  म्हणजेच या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा देऊ शकतो. त्यामध्ये सांख्यिकी, गणितविषयक परीक्षा उत्र्तीण होऊन अ‍ॅक्चुअरी सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्राथमिक अर्हता प्राप्त करून घेऊ शकतो. अ‍ॅक्चुअरीज इंडिया या संस्थेची सभासदत्वाची परीक्षा आणि अनुभव यांच्या जोरावर विद्यार्थी अ‍ॅक्चुअरी सायन्स या शाखेचा पदवीधर होऊ शकतो. डॉक्टर, अभियंते, सनदी लेखापाल, अशा उच्चशिक्षित व्यावसायिकाप्रमाणे अ‍ॅक्चुअरीअल सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत नोकरी न करण्याचे बंधन नाही. त्यामुळे नोकरी करतानाच अभ्यासक्रमाशी निगडित परीक्षा देत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. डॉक्टर, अभियंते, संगणकशास्त्रज्ञ, सीए/सीएस झालेले विद्यार्थीही हा अभ्यासक्रम करू शकतात.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
journalism fellowships scholarships in journalism fellowship for the future of journalism
स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

अ‍ॅक्चुअरीअल अभ्यासक्रम देणाऱ्या शिक्षणसंस्था –

*   बीएससी अ‍ॅक्चुरिअल सायन्स – बारावीनंतर प्रवेश, कालावधी ३ वर्षे पूर्णवेळ.

DS Actuarial Education Services (DS ACT ED) in Actuarial Science.*   एमबीए (अ‍ॅक्चुरिअल सायन्स) कालावधी २ वर्षे.

SVKM’s NMIMS University Vile Parle (West)

पदव्युत्तर अभ्यासक्रम Statistics / Maths / Engineering / Economics /Computer Science  कमीत कमी ४०% गुण आवश्यक

*    डिप्लोमा इन अ‍ॅक्चुरिअल सायन्स डीएस अ‍ॅक्चुरिअल एज्युकेशन सव्‍‌र्हिसेस, मुंबई.

१ वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम.  कुठल्याही विषयातील पदवी आवश्यक.

*   इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्चुअरिज ऑफ इंडिया

लेखिका सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.

भक्ती रसाळ fplanner2016@gmail.com