मी बी. एस्सी. हॉर्टिकल्चर हा अभ्यासक्रम करत आहे. लॅण्डस्केपिंगमध्ये काय संधी आहे. त्यासाठी काही प्रशिक्षण आहे का?

चेतकसिंग पवार

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

लॅण्डस्केप डिझायनिंगमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतील.

(१) डिप्लोमा इन लॅण्डस्केप डिझाइन

कालावधी- एक वर्ष.  पत्ता- जगन्नाथ व्होकेशनल गायडन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, फग्र्युसन कॉलेज रोड, पुणे-४११००४, दूरध्वनी- ०२०-३०८६६१७१,

संकेतस्थळ- http://www.despune.org/jagannath-rathi-vocational-guidanceandtraining-institute

(२) डिप्लोमा इन लॅण्डस्केप डिझाइन, कालावधी- एक वर्ष,  संपर्क-मराठवाडा मित्र मंडळाचे स्कूल ऑफ इंटेरिअर डिझाइन, ३०२/ए, डेक्कन जिमखाना, पुणे-४११००४, दूरध्वनी-०२०-२५६७६६१७,

संकेतस्थळ www.mmsidpune.org

ईमेल- mmsd85@gmail.com

(३) सर्टिफिकेट कोर्स इन गार्डन हॉर्टिकल्चर अँड मेंटेनन्स अँड गार्डन डिझानइ अँड डेव्हलपमेंट, कालावधी-सहा महिने, संपर्क- बी.एन.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन, कर्वेनगर, कमिन्स इंजिनीअरिंग कॉलेज, कॅम्पस, पुणे-५२,

संकेतस्थळ-  http://bnca-landscape.blogspot.in

(४) अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा

इन हॉर्टिकल्चर इन लॅण्डस्केपिंग

संपर्क- एसीएस डिस्टन्स एज्युकेशन,

संकेतस्थळ-  http://www.acs.edu.au/courses/landscaping-courses.aspx

हा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येतो. तो केल्यानंतर

साइट डिझायनर, लॅण्डस्केप आर्किटेक्ट, ऑर्किटेक्ट डिझायनर, लॅण्डस्केप कन्सल्टंट यांसारख्या करिअर संधी मिळू शकतात. शहरांमध्ये मोठमोठय़ा सोसायटय़ा उभ्या राहत आहेत. स्मार्ट सिटीची निर्मिती होत आहे. अंतर्गत आणि बाह्य़ सजावटीकडे  दिवसेंदिवस ओढा वाढत आहे.

कॉर्पोरेटजगतातील इमारती, कार्यालये, त्यांच्या अवतीभवती असलेली जागा यांच्या सजावटीकडे विशेष लक्ष पुरवले जाते. या सर्व कार्यामध्ये लॅण्डस्केप डिझायनर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करणे आणि त्याचा सर्जनशीलरीत्या वापर करता येणे जमायला हवे.

मी पुणे विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ बॉयोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फर्मेटिक्समधून बायोटेक्नॉलॉजी या विषयात एमएस्सी केले आहे. मला शासकीय क्षेत्रात कोणत्या संधी मिळतील?

राजीव नागरे

हा अभ्यासक्रम केल्यावर लगेच या विषयाशी संबंधित शासकीय क्षेत्रात नोकरीची संधी मिळेल असे संभवत नाही. शासकीय जैव तंत्रज्ञानविषयक संशोधन प्रयोगशाळा, औषध निर्मिती कंपन्या, लस निर्मिती कंपन्या, शासकीय महाविद्यालये आदींमध्ये नोकरी मिळू शकते. जागा कमी व मागणी अधिक असल्याने या पदांच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवावे लागेल. समाजमाध्यमांच्या नेटवर्किंगमधून या विषयातील शासकीय नोकऱ्यांची माहिती मिळू शकेल. त्यासाठी हे नेटवर्किंग अधिक सशक्त करावे.

मी २०१४ मध्ये बी.कॉम. केले आहे. मला अकाउंटन्सीमधील उत्कृष्ट अभ्यासक्रम सुचवाल का? ज्यामुळे मला लगेच नोकरी मिळू शकेल.

आनंद मुथे

आनंद, तू पुढील अभ्यासक्रम करू शकतोस –

एम.कॉम., एमबीए इन फायनान्स, पीजीडीएम इन बँकिंग अँड फायनान्स, कॅपिटल मार्केट्स, वेल्थ मॅनेजमेंट, इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड फायनान्शिअल अकाउंटंट, चार्टर्ड अकांउंटंट, चार्टर्ड फायनान्शिअल प्रोफेशनल, कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट, अकाउंटिंग विथ कॉम्प्युटर, बुक कीपिंग, मॅनेजरिअल अकाउंटिंग, ऑडिटिंग, फायनान्शिअल अकाउंटिंग.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.