जन्म नोंदणीचे फायदे

शाळेत प्रवेश मिळविताना –

प्रत्येक व्यक्तीला शाळेत प्रवेश देताना जन्मतारीख, वय, जन्म ठिकाण नागरिकत्व ही माहिती असणे आवश्यक असते. जर वेळेवर जन्माची नोंद झाली असेल तर वरील दाखला आपल्याला मिळतो व शाळेत मुलांना प्रवेश घेताना अडचणी येत नाहीत.

नोकरीत प्रवेश घेताना –

नोकरीसाठी वयाची अट कायद्याने निश्चित व बंधनकारक केली आहे. नवीन नोकरीच्या वेळी व निवृत्ती घेताना वयाचा विचार केला जातो.

विमा उतरविताना –

जेव्हा वैयक्तिक किंवा सामूहिक विमा उतरविला जातो. तेव्हा जन्माचा दाखला आवश्यक असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे नेमके वय किती हे समजते.

राष्ट्रीयत्व ठरविताना –

जन्माची नोंद केल्यामुळे त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मठिकाण व राष्ट्रीयत्व ठरविले जाते. त्यावरून ती व्यक्ती कुठल्या देशाची नागरिक आहे हे सिद्ध होते.

मतदानाचा हक्क प्राप्त करून घेताना –

प्रत्येक नागरिकाला १८ वर्षांनंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. त्यामुळे त्याच्या जन्मतारखेवरून त्याला वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क प्राप्त होतो. त्याशिवाय त्याला मतदान करता येत नाही.

सैन्यात प्रवेश मिळविताना –

सैन्यात प्रवेश घेताना जन्मतारीख, वय, जन्मठिकाण, नागरिकत्व इ. बाबतीत माहिती व पुरावा लागतो. त्यावरून सैन्यात प्रवेश दिला जातो.

निरनिराळे परवाने म्हणजेच लायसन्स मिळविताना –

व्यापार, उदय़ोग, व्यवसाय, प्रवास यांचे निरनिराळे परवाो मिळविताना जन्माच्या दाखल्याची आवश्यकता असते. त्यावरून जन्मतारीख, वय, जन्मठिकाण, राष्ट्रीयत्व इ. बाबत माहिती मिळते. त्यामुळे जन्म दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

लग्नाचे वय

प्रत्येक व्यक्तीला विवाह करण्यासाठी कायद्यने वय निश्चित केलेले आहे. मुलाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल तर त्यांचा विवाह कायदेशीर मानला जातो आणि जन्मतारखेवरून त्यांचे वय निश्चित होते. त्यामुळे जन्माची नोंद होणे आवश्यक आहे.

पॅनकार्ड

पॅनकार्ड तयार करण्याकरिता जन्मतारखेची नोंद असणे आवश्यक असते. या दाखल्याचा उपयोग अशा प्रत्येक ठिकाणी होतो. जिथे वयाची अट घातलेली आहे. उदा. शाळा प्रवेश, आरटीओ, (व्हेईकल लायसन्स) वाहन परवाना, परदेशी जाण्याचा परवाना वगैरे.