* मी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे  शिकत आहे. मी बीएच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला एमपीएससी देता येईल का?

निखिल बी.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
nata exam 2024 nata exam for architecture admission
प्रवेशाची पायरी : आर्किटेक्चर प्रवेशासाठी नाटा परीक्षा

पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची परीक्षा देता येते. मात्र राज्य लोकसेवा आयोगाने निर्धारित केलेल्या तारखेपर्यंत अंतिम वर्षांचा निकाल लागणे आवश्यक आहे. शिवाय किमान गुणसुद्धा मिळवणे आवश्यक आहे.

 

* मी अमरावती विद्यापीठातून बी.ए. केले आहे. आता राज्यशास्त्रातून एमए करत आहे. याशिवाय मी एमपीएससीची तयारीही करत आहे. याव्यतिरिक्त मला काय करता येईल?

शाम तलोकर

एम.ए. आणि एमपीएससीची तयारी यासाठी तुम्हाला भरपूर वेळ देणे गरजेचे आहे. यात आणखी तिसऱ्या गोष्टीची भर घातल्यास या दोन्ही बाबींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येणार नाही. त्यामुळे तूर्तास तरी नवे काही करू नका.