प्रश्न : माझी मुलगी दहावी झाली आहे. तिला संशोधक व्हायचे असून तिला युद्धसाहित्यात रस आहे. पगार व आयआयटीबद्दल माहिती द्यावी. यासाठी किती वेळ लागेल.
– स्वप्निल देशपांडे
संशोधक होण्यासाठी आधी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. त्यानंतर नेमके संशोधन कोणत्या शाखेत करावयाचे आहे, हे निश्चित करावे लागेल. १२ वी नंतर बी.एस्सी., एम.एस्सी. आणि पीएचडी या मार्गाने संशोधन कार्याकडे वळता येते. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (संपर्क – http://www.iiseradmission.in) या संस्थेच्या बी.एस-एम.एस या पाच वष्रे कालावधीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन संशोधन कार्य करता येणे शक्य आहे. आयआयटीमधील प्रवेशासाठी सध्या तरी खएए-टअकअ आणि खएए-अऊश्अठउएऊ या दोन परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पदवी अभ्यासक्रम केल्यावर पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेद्वारे चांगल्या संस्थेत संशोधन कार्य करण्यासाठी संधी मिळू शकते. सन्य दलास प्रतिभावंत संशोधकांची कायम गरज भासते. त्यामुळे बी.ई. अथवा पीएचडी करून ती सन्यदलाच्या विविध प्रकारच्या अस्त्र-शस्त्र आणि युद्धविषयक उपकरणाच्या निर्मितीसाठी ऊफऊड-डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश मिळवू शकतो. संशोधकांना उत्तम वेतनश्रेणी दिली जाते. तूर्तास अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलेले उत्तम.

प्रश्न- एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त माझ्या मुलीसाठी जीवशास्त्र विषयाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची यादी हवी आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया काय आहे?
– शिरीष ठोंबरे
जीवशास्त्र विषय घेऊन १२ वी झालेले विद्यार्थी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बी.एस्सी. (जेनेटिक्स), बी.एस्सी. इन एक्स-रे टेक्निशियन, बी.एस्सी. इन ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच थेरपी, बी.एस्सी. इन ऑप्थलमिक टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. इन मेंटल रिहॅबिलिटेशन, बी.एस्सी. इन रेडिओग्रॅफी, बी.एस्सी. इन रिस्पेरेटरी थेरपी टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ नेचरोपथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स, डेंटल हायजेनिस्ट, डेंटल मेकॅनिस्ट असे अनेक अभ्यासक्रम करू शकतात. काही शैक्षणिक संस्था या अभ्यासक्रमांना थेट १२ वीच्या गुणांवर प्रवेश देतात तर काही संस्था चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश देतात.

प्रश्न : मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी. आणि एनव्हायर्न्मेंटल सायन्समध्ये एम.एस्सी. केले आहे. मला थेट एमबीबीएससाठी प्रवेश मिळू शकेल काय?
– हिरेंद्र शेळके
आपल्या देशात सध्या तरी एमबीबीएसला थेट प्रवेश दिला जात नाही. प्रवेशासाठी १२ वी (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र) या शैक्षणिक अर्हतेवर आधारित CET किंवा NEET परीक्षेद्वारेच प्रवेश दिला जातो. आपण वयोमर्यादा ओलांडली नसल्यास ही परीक्षा देऊ शकता. तथापि आपण बी.एस्सी. आणि एम.एस्सीसाठी पाच वर्षांचा कालावधी व्यतीत केला आहे. एमबीबीएससाठी आणखी साडेपाच वर्षांचा कालावधी व्यतीत करावा लागेल. ही बाब लक्षात घ्यावी.

प्रश्न- विज्ञान विषयात मी १२ वी केले आहे. मला ऑनलाइन कोस्रेस करता येतील का? मला परदेशी ऑनलाइन कोस्रेसची माहिती द्यावी. परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तींची माहिती द्यावी.
– सागर सोनवणे
इंटरनेटवर सध्या शेकडो ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे आपणास नेमका कोणता विषय आणि कशासाठी करायचा आहे, हे आधी ठरवावे लागेल. हे अभ्यासक्रम साधारणत: कौशल्यवृद्धीसाठीचे असतात. मात्र त्यांचा उपयोग करिअर करण्यासाठी होईल याची काही शाश्वती देता येत नाही. परदेशी ऑनलाइन अभ्यासक्रमांविषयीसुद्धा हेच सांगता येईल.

प्रश्न : मी दहावीची परीक्षा दिली आहे. मला चित्रकलेमध्ये आवड आहे. दहावीनंतर या क्षेत्रात कोणती संधी व कोर्स आहेत?
– कल्याणी सवर
चित्रकलेत करिअर करण्यासाठी आपण बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन पेंटिग्ज हा अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरेल. गुणवत्ता आणि दर्जा या बळावर या क्षेत्रात विविधांगी संधी मिळू शकतात. त्यासाठी परिश्रम, नावीन्याचा ध्यास आणि संयम याची आवश्यकता आहे.

प्रश्न : माझ्या मुलीने मार्च २०१६ मध्ये १० वीची परीक्षा दिली आहे. तिला अप्लाइड आर्ट्समध्ये पदवी घ्यायची आहे. त्यातील विविध विषय कोणते आहेत. तिला प्रवेश कसा घेता येईल. त्यासाठी उएळ आहे का? तिला १२ वीपर्यंत वाणिज्य शाखेचा अभ्यास करता येईल का? या अभ्यासक्रमानंतर करिअरच्या संधी कोणत्या आहेत.
– उत्तरा जोग
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समार्फत बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (इन पेंटिंग्ज, स्कल्पचर, मेटल वर्क, सिरॅमिक्स, टेक्सटाइल डिझाइन, इंटेरिअर डेकोरेशन) असे अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमांना कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलीने १२ वी पर्यंत वाणिज्य शाखा घ्यायला हरकत नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र अप्लाइड आर्ट्स अ‍ॅण्ड क्रॉफ्ट्स कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन (एमएच-एएसी-सीईटी) द्यावी लागेल. प्रतिभावंत कलावंताच्या कामास सध्या चांगले मूल्य मिळते. मनापासून आवड असल्यास या क्षेत्रात मोठे यशस्वी करिअर करता येणे शक्य आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मार्फतच आर्ट टीचर डिप्लोमा हा १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या संस्थेचा बीएफए अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन वा आयआयटीमधील डिझाइन संस्थेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.

प्रश्न : मी २०११ साली बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम केला. आता मी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रणालीचा एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम करीत आहे. मी ॅअळए परीक्षा देण्यासाठी पात्र आहे का?
– स्वाती पाटील
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त संस्थेतील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना ATE परीक्षा देता येते. आपला अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे किंवा नाही याची कृपया खातरजमा करून घ्यावी.
सुरेश वांदिले
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)