• मी २०१६१७ मध्ये बी. (इलेक्ट्रॉनिक्स) पूर्ण केले. आता मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. मला मुक्त विद्यापीठाचा एम. अभ्यासक्रम करायचा आहे. ते शक्य आहे का? त्यासाठी मी कधी अर्ज करू?
    • राहुल दवरे

तू पदवी प्राप्त केली असल्याने तू एमपीएससी/यूपीएससी/ बँक/रेल्वे/कम्बाईंड डिफेन्स सव्‍‌र्हिस/स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी पात्र आहेस. त्यासाठी आता नव्याने एमए करण्याची

गरज आहे असे वाटत नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ वा यशंवराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अक्षरश: शेकडो अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते कुणालाही करता येतात. हे अभ्यासक्रम कशासाठी करायचे याची स्पष्टता तुझ्या मनात असेल तर तू एम.ए करायला हरकत नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळा वेळोवेळी घोषित केल्या जातात, त्यासाठी या मुक्तविद्यापीठांची संकेतस्थळे पाहावीत.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ- http://ycmou.digitaluniversity.ac/ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ-http://www.ignou.ac.in/ )

  • मी भूगोल विषय घेऊन बी. केले आहे, तर मला एमसीए करता येईल का? मी राज्यशास्त्र घेऊन एम.एस्सी केले तर ही पदवी मान्य केली जाते का?
    • शुभम साळुंके

तुझ्या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत. एमसीए करण्यासाठी बीसीए हा अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तू हा अभ्यासक्रम करू शकत नाहीस. राज्यशास्त्र हा विषय घेऊन तू पदवी घेतली तर ही पदवी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी ग्राह्य़ धरली जाते. भूगोल विषयात एम.ए / एमएस्सी केल्यास पुढील करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात- अध्यापनाच्या क्षेत्राव्यतिरिक्त सव्‍‌र्हेअर, रिमोट सेिन्सग, डेमोग्राफर्स, काटरेग्राफर्स, पर्यटन क्षेत्र, वनक्षेत्रसंवर्धन, मायनिंग आणि एक्स्प्लोरेशन, पर्यावरण, आयात निर्यात कंपन्या, जीआयएस अ‍ॅनालिस्ट, ट्रान्स्पोर्टेशन मॅनेजमेंट, अर्बन प्लॅनर, कम्युनिटी डेव्हपमेंट आदींमध्ये नोकरी मिळू शकते. भूगोल विषयातील स्पेशलायझेशन केल्यास करिअरच्या संधी आणखी वाढतात. उदा. इकॉनॉमिक जिऑग्राफी, कल्चरल जिऑग्राफी, पोलिटिकल जिऑग्राफी, टुरिझम जिऑग्राफी इ.

 

  • मला, एमपीएससी आणि यूपीएससी अभ्यासक्रमाविषयी माहिती द्यावी.

मंगेश बी. बोंद्रे

मंगेश संघ लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा आयोगाची परीक्षा तीनस्तरीय आहे. प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत. प्राथमिक परीक्षेचा अभ्यासक्रम हा सर्वसाधारणत: पाचवी ते पदवीपर्यंतच्या विविध विषयांवर आधारित असतो. त्यामुळे आपल्या संकल्पना स्वयंस्पष्ट असल्यास या परीक्षा कठीण जात नाहीत. त्यामुळे बहुतेक सर्व यशस्वी उमेदवार एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके अभ्यासावित असा सल्ला देतात. तो योग्य आहे. शिवाय सामान्य ज्ञान अथवा अध्ययनाची तयारीही दररोजच करावी लागते. त्यासाठी नियमित वृत्तपत्राचे वाचन, भारत वार्षिकी अशा पुस्तकांचे अध्ययन, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली, कुरुक्षेत्र योजना आदी अधिकृत माहिती देणाऱ्या नियतकालिकांचे वाचन व माहितीचे विश्लेषण आवश्यक ठरते. दूरदर्शनवरील विविध चर्चात्मक कार्यक्रमसुद्धा आपल्या ज्ञानाचा आवाका आणि वैचारिक व्यापकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा खूप विस्तृत असून तो यूपीएससी (http://www.upsc.gov.in/) आणि एमपीएससीच्या (mpsc.gov.in/) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)