* मी एमएस्सी बायोटेक केले आहे. मला इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स या क्षेत्रात करिअर करायचे आहे. तरी त्या संदर्भातील अभ्यासक्रम, संस्था आणि संधीची माहिती कुठे मिळेल?

चेतन पवार

जागतिकीकरणानंतर व्यापार /व्यवसाय /उद्योग यासाठी सर्व जग हे एकच कार्यक्षेत्र झाले आहे. प्रत्येक देश अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी स्पर्धेत उतरला आहे. या स्पर्धेतून बौद्धिक संपदेशी निगडित विविध पैलू असलेल्या समस्या आणि प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. भारतालाही हळद, बासमती तांदूळ या बाबतीत बौद्धिक संपदेची मोठी लढाई लढावी लागली. या क्षेत्रात उच्चस्तरीय ज्ञान प्राप्त केलेल्या उमेदवारांना देश-विदेशात करिअरच्या विविध संधी मिळू शकतात. पुढील संस्थांमध्ये या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

  • इन्स्टिटय़ूट ऑफ इंटलेक्चुल प्रॉपर्टी स्टडीज या संस्थेतील अभ्यासक्रम

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पेटंट लॉ अँड प्रॅक्टिस (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/कालावधी- एक वर्ष),

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मॅनेजमेंट (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/ कालावधी- एक वर्ष),
  • सर्टिफिकेट कोर्स इन ड्रग रेग्युलेटरी (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/कालावधी- सहा महिने),
  • सर्टिफिकेट कोर्स इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी (अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी/कालावधी- चार महिने),
  • पेटंट सर्चिग अँड ड्राफ्टिंग (कालावधी- १२ आठवडे/अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी),
  • अंडस्टँडिंग पेटंट (कालावधी- ४ आठवडे/अर्हता – कोणत्याही विषयातील बारावी),
  • कॉपी राइट फॉर एंटरटेनमेंट /मीडिया (कालावधी- ४ आठवडे/अर्हता – कोणत्याही विषयातील बारावी)

संपर्क – एसव्हीकेएम, एनएमआयएमस-आयआयपीएस, सातवा माळा, मिठीबाई कॅम्पस, व्ही.एल मेहता रोड, विलेपार्ले-पश्चिम, मुंबई- ४०० ०५६, दूरध्वनी-०२२-४२३५५५५५,

संकेत स्थळ – http://iips.nmims.edu

ईमेल – info.iips@nmims.edu

(२) शासकीय विधी महाविद्यालय मुंबई

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स लॉ (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/ कालावधी- एक वर्ष), संपर्क- शासकीय विधी महाविद्यालय, ए रोड, चर्चगेट  मुंबई-४०० ०२०, दूरध्वनी-०२२-२२८५ १३१५,

संकेत स्थळ – http://glcmumbai.com/

ईमेल iprglcmumbai@gmail.com

 

()ग्लोबल इन्स्टिटय़ूट ऑफ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स अँड पेटंट मॅनेजमेंट

(अर्हता- अभियांत्रिकी/विधी /विज्ञान या विषयातील पदवी /व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी/कालावधी- ९ महिने)

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ अँड प्रॅक्टिस (अर्हता- अभियांत्रिकी/विधी /विज्ञान या विषयातील पदवी /व्यवस्थापन कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी/कालावधी- ३ महिने) संपर्क- इलएलसीआयएनए हाऊस, ४२२, ओखला इंडस्ट्रिअल इस्टेट, फेज थ्री, नवी दिल्ली-११० ०२०, दूरध्वनी-०११-४१०८ ४८००, संकेतस्थळ- http://www.giipinfo.com/

ईमेल -giip.delhi@giipinfo.com

http://www.giipinfo.com/

() वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन

या संस्थेने दूरस्थ शिक्षणपद्धतीचे विविध अभ्यासक्रम सुरूकेले आहेत. यामध्ये जनरल कोर्स इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी, बेसिक्स ऑफ पेटंट्स ड्राफ्टिंग, कॉपी राइट्स अँड अदर राइट्स, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी-ट्रॅडिशनल नॉलेज अँड ट्रॅडिशनल कल्चरल एक्स्प्रेशन आदी विषयांचा समावेश आहे.

संपर्क: संकेतस्थळ- http://www.wipo.int/academy/en/courses/distance_learning/

 

() फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

ऑन लाइन सर्टिफिकेट कोर्स इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स अँड कॉम्पिटिटिव्ह लॉ (अर्हता- विधी विषयातील पदवी, कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी.

कालावधी- दोन महिने),

संपर्क- फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ

कॉमर्स अँड इंडस्ट्री, फेडरेशन हाऊस, तानसेन मार्ग,

न्यू दिल्ली- ११०० ०१,

दूरध्वनी- ०११-२३४८ ७४७७, संकेतस्थळ-  http://ficciclipr.ficciipcourse.in/

ईमेल ipcourse@ficci.com

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा  career.vruttant@expressindia.com