भारतीय अवकाश संशोधन हा घटक पेपर १ मधील दूरसंवेदन आणि पेपर ४ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या विषयाला स्पर्धा परीक्षेतील दोन किंवा फार तर तीन गुणांचा चालू घडामोंडीवर आधारित घटक म्हणून ऐनवेळच्या पाठांतरापुरतेच महत्त्व दिले जाते. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीमध्ये काही अंशी हा दृष्टिकोन व्यवहार्य ठरतोही. मात्र बहुविधानी प्रश्नांमध्ये यातील काही संकल्पनात्मक मुद्दा विचारण्यात आला तर हा दृष्टिकोन अपुरा पडतो. त्यामुळे या घटकातील काही ठळक मूलभूत संकल्पना समजून घेतल्यास त्याचा बोनस मिळण्याची शक्यता गृहीत धरायला हवी. त्या दृष्टीने याबाबत पुढील लेखांमध्ये अवकाश संशोधनाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पनांबाबत चर्चा करण्यात येत आहे.

इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेले उपग्रह आणि क्षेपणास्त्र यांचा तथ्यात्मक अभ्यास ज्या त्या वेळी चालू घडामोडीमध्ये कव्हर होतो. मात्र यातील संबंधित संकल्पना किंवा ठळक ऐतिहासिक महत्त्वाच्या घडामोडी विचारल्यास त्या प्रत्येकाला माहीत असतीलच असे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये याच नव्हे तर इतर कोणत्याही मुद्दय़ांबाबत असे संबंधित महत्त्वाचे मुद्दे समजून घेतलेला उमेदवार आणि वरवरची माहिती असलेला उमेदवार यांच्यामध्ये असलेला फरक दिसून येतो तो गुणवत्ता यादीतील क्रमांकावरून. उपग्रहांचे आणि क्षेपणास्त्रांचे प्रकार व त्यांची वैशिष्टय़े यांची परीक्षोपयोगी माहिती पुढीलप्रमाणे  –

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

दळणवळण उपग्रह 

एशिया पॉसिफिक क्षेत्रामध्ये भारतीय दळणवळण उपग्रहांचे जाळे सर्वात मोठे राष्ट्रीय दळणवळण जाळे आहे. ईन्सॉट आणि जीसॉट श्रेणीतील हे उपग्रह भूस्थिर कक्षेमध्ये (३६,००० किमी ) स्थापित करण्यात आले आहेत. सन १९८३ मध्ये ईन्सॉट १ इ उपग्रह प्रक्षेपणापासून हे दळणवळण उपग्रह प्रक्षेपित करण्यात येत आहेत. सध्या ईन्सॉट 3A, BC, 4A, 4B, 4CR  आणि GSAT ६,७,८,९,१०, १२,१४,१५,१६,१७ आणि १८ असे १५ दळणवळण उपग्रह कार्यरत आहेत.

यांचा वापर दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रक्षेपण, उपग्रह बातमी संकलन, समाजमाध्यमे, हवामान अंदाज, आपत्ती अंदाज / इशारे आणि शोध व बचत कार्ये या बाबींमध्ये करण्यात येतो. टेली एज्युकेशन, टेली मेडिसीन, बिझनेस टू पर्सनल कम्युनिकेशन, विकासविषयक दळणवळण प्रणाली, ई गव्हर्नन्स, ई बिझनेस, ऊळऌ सेवा, व्हिलेज रिसोर्स सेंटर्स यांचा विकास व उपयोजन यांसाठीही यांचा वापर होतो.

 दिशादर्शक उपग्रह :

हवाई वाहतूक नियंत्रण तसेच स्थितीदर्शक कालसुसंबद्ध माहितीच्या माध्यमातून दिशा निर्देशन यासाठी इस्त्रोचे दिशादर्शक उपग्रह (Navigation Sattelight) कार्यरत आहेत. GSAT 8  U 10 या उपग्रहांच्या मदतीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाबरोबर  GAGAN (GPS Aided Geo Augmented Navigation ) प्रणाली हवाई वाहतूक नियंत्रणासाठी विकसित करण्यात आली आहे. सन २०१७ मध्ये या श्रेणीतील  GSAT9, GASAT17 व GSAT19 असे तीन उपग्रह अनुक्रमे ५ मे, २९ जून व ५ जून रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहेत. हे सर्व उपग्रह भूस्थिर कक्षेमध्ये स्थापित करण्यात आले आहेत.

IRNSS 1A, 1B, 1C, 1D, 1E, 1F U 1G अशा सात उपग्रहांची NavIC (Navigation with Indian Constellation ) प्रणाली स्थापन करण्यात आली आहे. ठं५कउ प्रणालीच्या माध्यमातून वाहनांचे स्थिती दर्शन, वाहतूक व्यावस्थापन, मोबाइलवर वाहतूकविषयक मदत, पर्वतारोहक व प्रवाशांना हवामान तसेच इतर मदत व मार्गदर्शन, वाहनचालकांना नकाशावर आधारित सूचना (voice navigation) अशा सेवा उपलब्ध करून देण्यात येतात.

लघू उपग्रह –

भूप्रतिमा आणि वैज्ञानिक संशोधनासाठी कमी कार्य कालावधीचे लहान उपग्रह बनविण्यासाठी लघु उपग्रह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कटर-1(Indian Mini Satellite) हा पहिला लघू उपग्रह विविध तंत्रज्ञानाच्या लघू प्रतिकृती (Miniaturization) वापरून विकसित करण्यात आला. या मालिकेतील दुसरा उपग्रह युथसॉट हा आहे. कटर-2 मालिकेतील पहिला उपग्रह रअफअछ हा दूरसंवेदनासाठी प्रक्षेपित करण्यात आला आहे.