संगणकाचा व्यवसायातील व्यापक वापर भारतात साधारण नव्वदच्या दशकात सुरू झाला. पण त्या वेळी कंपनीच्या विविध ठिकाणच्या ऑफिसमधील संगणक एकमेकाला जोडलेले नव्हते. त्यामुळे व्यवस्थापनाची वेगवेगळी कामे करणाऱ्या संगणक आज्ञावलीपण एकसंध नव्हत्या. आंतरजालक म्हणजेच इंटरनेटचा व्यावसायिक वापर हळूहळू दुग्गोचर होत होता. परंतु त्यानंतर २०१० च्या दशकात दूरसंचार क्षेत्रातील लक्षणीय प्रगतीमुळे दळणवळणाची जाळी निर्माण होऊन कंपनीच्या विविध ठिकाणच्या ऑफिसमधील संगणक एकमेकाला जोडले गेले आणि व्यवस्थापनाची वेगवेगळी कामे करणाऱ्या संगणक आज्ञावलीपण एकसंध होऊ  लागल्या. तसेच अतिवेगवान इंटरनेटमुळे तर संगणक आज्ञावलींच्या कामामध्ये कमालीची लवचीकता आली. उत्पादकता वाढविण्यासाठी ऑफिसमध्ये व ऑफिसबाहेर रात्रंदिवस काम करत, कधीही बंद न पडणाऱ्या अशा संगणक आज्ञावलींची मोठीच गरज निर्माण झाली. त्यामुळे संगणक, त्यांची एकमेकांशी जोडणी, विविध कार्ये करणाऱ्या एकसंध आज्ञावली याचबरोबर रात्रंदिवस काम करणाऱ्या व्यवस्थापनाच्या विविध विभागांच्या गरजा लक्षात घेणारा विभाग तयार झाला व त्याला ‘सिस्टिम्स व्यवस्थापन’ अशी संज्ञा मिळाली.

महत्त्वाची कार्ये  –

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
  • कंपनीतील सर्व संगणक, दूरसंचार जाळी (Network‘), सव्‍‌र्हर, प्रिंटर्स, राउटर व सर्व अनुषंगिक उपकरणे यांची देखभाल करणे.
  • वरील सर्व वस्तूंची क्षमता गरजेप्रमाणे आहे की नाही याची वेळोवेळी शहानिशा करणे व जास्त क्षमता लागत असल्यास त्याची पूर्तता करणे.
  • वरील सर्व वस्तूंचा त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत भविष्यात किती उपयोग करता येईल याचा अंदाज बांधणे व बदली वस्तूंची आगाऊ तरतूद करणे.
  • विविध व्यवस्थापन विभागांच्या गरजांप्रमाणे संगणक आज्ञावली विकसित करणे अथवा करवून घेणे. अशा संगणक आज्ञावली वापरण्याचे प्रशिक्षण व्यवस्थापन विभागांच्या कर्मचाऱ्यांना देणे.
  • कंपनीमध्ये असलेल्या संगणक व सर्व अनुषंगिक वस्तूंची आणि मालमत्तेची यादी अद्ययावत ठेवणे.
  • वापरातील सर्व संगणक व दूरसंचार जाळ्यांचे सायबर हल्ल्यापासून संरक्षण करण्याची योजना आखून अंमलबजावणी करणे.
  • कंपनीमधील कुठलीही माहिती व डेटाचा ऱ्हास टाळण्यासाठी स्वयंचलित साठवण आज्ञावली तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • कंपनीमधील संगणक व सर्व अनुषंगिक वस्तूंच्या वापरकर्त्यांच्या शंकानिरसनासाठी एक सेवा कक्ष उभारणे.
  • सर्वसाधारणपणे संस्थेमधील १०० कर्मचाऱ्यांमागे सिस्टिम्स व्यवस्थापनाचे २ ते ५ कर्मचारी/ अधिकारी असतात. परंतु, एखाद्या संगणक आज्ञावली विकसित करणाऱ्या कंपनीमध्ये हेच प्रमाण ७० ते ८० कर्मचारी/ अधिकाऱ्यांपर्यंत वाढू शकते.

शिक्षण –

या क्षेत्रात काम करण्यासाठी संगणक शास्त्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. बी.सी.ए. / बी.सी.एस. तसेच एम.सी.ए. / एम.सी.एस. / एम.एस.सी. (सी.एस.), बी.ई. (सी.एस.), बी.ई. (आय.टी.) अशा पदव्या/ पदव्युत्तर पदव्या भारतातील विविध महाविद्यालये व विद्यापीठे देतात. अर्थात या सर्व पदव्या / पदव्युत्तर पदव्या संगणक शास्त्रातील तांत्रिक पदव्या आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सिस्टीम व्यवस्थापन या विषयाचा अंतर्भाव असतो. तथापि एम.बी.ए. या पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी सिस्टिम्स व्यवस्थापन हा एक विशेष विषय सखोल पद्धतीने शिकविला जातो. एम.बी.ए.ला शिकवल्या जाणाऱ्या सिस्टिम्स व्यवस्थापन या विषयात विद्यार्थ्यांला संगणक आणि व्यावसायिक व्यवस्थापन याचे एकत्रित ज्ञान होते, जे नुसत्या तांत्रिक पदवी /पदव्युत्तर पदवीमध्ये होत नाही. एम.बी.ए.ला प्रवेश कसा दिला जातो याविषयीची माहिती अगोदरच्या लेखात येऊन गेली आहे.

माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र व दूरसंचार या विषयांची अगदी दररोज प्रगती होते आहे व त्यांचे एकीकरणही होते आहे. यासाठीच या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपले ज्ञानही अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. यासाठी, अनेक परदेशी संस्था व कंपन्यांचे विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

नोकरीच्या संधी

माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्राच्या विस्तारामुळे आणि डिजिटल इंडियाच्या शासकीय धोरणामुळे खासगी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, छोटय़ा, मध्यम, मोठय़ा अशा सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये सिस्टिम्स व्यवस्थापनाचे कर्मचारी / अधिकारी लागतात. यामध्ये कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था, माध्यमे – दूरदर्शन, वर्तमानपत्रे, सेवाक्षेत्रे अशा सर्वाचाच समावेश होत असल्याने नोकरीच्या विस्तृत संधी आहेत. याशिवाय, देशाच्या मोठय़ा शहरांमधील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये देशीविदेशी संगणक आज्ञावली विकसित करणाऱ्या व त्यांचे गुणवत्ता परीक्षण करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्येसुद्धा सिस्टिम्स व्यवस्थापन क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत.

व्यवस्थापन क्षेत्रातील इतर कुठल्याही अधिकाऱ्याला लागणारे उत्तम संवादकौशल्य, नेतृत्वगुण व व्यावसायिक निपुणता हेच गुण याही क्षेत्रात असावे लागतात. शिवाय महत्त्वाचे म्हणजे सिस्टीम्सचे ज्ञान, अद्ययावत माहिती, संगणक तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्राची माहिती आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी.

dr.jayant.panse@gmail.com