केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातंर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या खालील अभ्यासक्रम प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
अभ्यासक्रम व उपलब्ध जागा– थर्मल पॉवर प्लन्ट इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध जागा ८०.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी मेकॅनिकल अथवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार
राखीव आहेत.
निवड पद्धती- अर्जदारांच्या पदविका परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीनुसार त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
निवास व्यवस्था- अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांपैकी गरजू विद्यार्थ्यांना निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जदारांनी आपल्या प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ४०० रु. चा एनपीटीआय बद्रपूर यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट- नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nptidelhi.net, http://www.npti.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, अथवा दूरध्वनी क्र. ०११-२६९४०७२२ वर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज प्रोग्रॅम डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बद्रपूर, नवी दिल्ली- ११० ०४४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१६ आहे.