महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्याच्या विविध मंत्रालय व विभागांमध्ये अधिकारी पदावर नेमणूक करण्यासाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत-

  • जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गट अ- उपलब्ध जागांची संख्या १५. यापैकी ६ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी असून ३ जागा अनुसूचित जातीच्या, १ जागा अनुसूचित जमातीच्या, १ जागा विमुक्त जमातीच्या, १ जागा विशेष प्रवर्गासाठी, तर ३ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अह्णअंतर्गत संधी-

  • विभाग प्रमुख ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझम- उपलब्ध जागांची संख्या ३. यापैकी २ जागा खुल्या वर्ग गटातील उमेदवारांसाठी असून १ जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे.
  • विभाग प्रमुख- उपयोजित यंत्रशास्त्र- उपलब्ध जागांची संख्या १०. यापैकी ४ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी असून २ जागा अनुसूचित जातीच्या, तर प्रत्येकी १ जागा अनुसूचित जमातीच्या व विमुक्त जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी. आयोगाच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२७९५९०० अथवा २२६७०२१० वर संपर्क साधावा अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१७ आहे.