पुणे येथील ‘बार्टी’ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च फेलोशिप २०१७ साठी देण्यात येणाऱ्या संशोधनपर शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध फेलोशिप्सची संख्या व तपशील- योजनेअंतर्गत उपलब्ध फेलोशिप्सची संख्या १०४.

यांपैकी ५०% फेलोशिप्स अनुसूचित जातीच्या तर ३% फेलोशिप्स अनुसूचित जातीतील अपंग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

आवश्यक पात्रता- अर्जदार अनुसूचित जातीचे व महाराष्ट्रातील रहिवासी असावेत. जे उमेदवार योजनेअंतर्गत एमफिल करण्यासाठी अर्ज करणार असतील त्यांची एमफिलसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर २०१६ नंतरची व जे उमेदवार संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करणार असतील त्यांची पीएचडीसाठीची नोंदणी १ जानेवारी २०१६ नंतरची असायला हवी.

विशेष सूचना- ज्या उमेदवारांची वर नमूद केल्याप्रमाणे नोंदणी झाली नसेल अशांनी संबंधित विषयातील एमफिल वा पीईटी, एसईटी, एनईटी व जीएटीई यांसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी.

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय १५ जुलै २०१७ रोजी ५५ वर्षांहून अधिक नसावे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क-

अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा ‘बार्टी’च्या  http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील http://barti.in/notice-board.php  या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घ्यावी.

ल्ल  अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांवर असणारे अर्ज महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, ‘बार्टी’,  २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे- ४११००१ या पत्त्यावर  १५ जुलै २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.