प्रत्येक भारतीयाला शिक्षणाचा अधिकार आहे. कमीत कमी बालवाडी व प्राथमिक वर्गाना, शिक्षण विनामूल्य असावे; प्राथमिक शिक्षण हे गरजेचे आहे. अभियांत्रिकी व पदवीपर्यंतचे शिक्षण साधारणपणे सर्वाना उपलब्ध असावे आणि उच्चशिक्षण मात्र प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार असावे. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी असावी.

शिक्षण अधिकाराअंतर्गत उपक्रम

  • संवेदनशील परिस्थितीतील आणि वंचित बालकांची सर्वसमावेशक काळजी घेणे, त्यांना शिक्षण पुरवणे.
  • बिकट परिस्थितीत राहणाऱ्या तसेच अल्पसंख्याक वर्गातील सर्व बालकांना, विशेषत: मुलींना, चांगल्या दर्जाचे शिक्षण सक्तीने व फुकट मिळेल तसेच ही मुले-मुली हे शिक्षण पूर्ण करतील हे पाहणे.
  • जीवनविषयक कौशल्यांसंबंधीचे कार्यक्रमांचा लाभ मिळून सर्व तरुण आणि प्रौढांच्या शिक्षणविषयक गरजा भागवल्या जातील हे पाहणे.
  • विशेषत: मुलींच्या बाबतीत प्रौढ साक्षरतेच्या प्रमाणात ५० टक्के सुधारणा घडवणे. तसेच समानतेच्या तत्त्वानुसार सर्व प्रौढांना मूलभूत व निरंतर शिक्षण मिळवून देणे.
  • प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात आढळणारा लैंगिक भेदभाव नष्ट करणे तर शिक्षणात स्त्री-पुरुष समानता आणणे. मुलींना दर्जेदार, संपूर्ण आणि समान मूलभूत शिक्षण मिळेल यावर लक्ष केंद्रित करणे.
  • शिक्षणाच्या दर्जाशी संबंधित सर्व बाबींमध्ये सुधारणा करणे आणि गुणवत्ता सर्वांपर्यंत पोहोचेल हे पाहणे, ज्यायोगे सर्वाची होणारी शैक्षणिक प्रगती-विशेषत: साक्षरता, अंकओळख आणि जीवनविषयक कौशल्ये त्यांच्या जीवनात उपयोगी ठरतील.