*   ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (जीएटीई- २०१८) मानवी संशोधन आणि विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने वित्तपुरवठा करण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी/ सायन्समधील पदव्युत्तर आणि डॉक्टोरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश (जीएटीई स्कोअरनुसार). गेट- २०१८ स्कोअर निकाल जाहीर होईल त्या दिवसापासून ३ वर्षांसाठी वैध राहील.

पात्रता- बीई/ बीटेक इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरल पदवी, एमएस्सी इ. अंतिम वर्षांचे उमेदवारसुद्धा गेट- २०१८ साठी पात्र आहेत.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
AAP Demand for action against officials who not provide information on website about proposals approved during cabinet meeting
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आयत्या वेळी मंजूर झालेल्या प्रस्तावांची माहिती गुलदस्त्यात… ‘आप’ने केली ‘ही’ मागणी

अर्जाचे शुल्क- रु. १,५००/- (महिला/ अजा/ अज/ विकलांग यांच्यासाठी रु. ७५०/-).

गेट स्कोअर पीएसयूमध्ये नोकरी देण्यासाठी वापरला जातो. http://www.gate.iitg.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. १ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत. परीक्षा दि. ३, ४, १० आणि ११ फेब्रुवारी, २०१८ रोजी होईल. उमेदवारांना सायन्स आणि इंजिनीअरिंगच्या वेगवेगळ्या २३ विषयांवर गेट- २०१८ परीक्षा देता येईल.

*   विद्युत निरीक्षक (सचिव, अनुज्ञापक मंडळ व उद्वाहन निरीक्षक), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विद्युत पर्यवेक्षक/ विद्युत तारतंत्री परीक्षा जाहीर.

विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा दि. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी व तोंडी परीक्षा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर केंद्रातून घेण्यात येतील. विद्युत तारतंत्री (वायरमन) परीक्षा दि. १५ नोव्हेंबर २०१७ पासून मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती केंद्रांतून घेण्यात येतील.

दोन्ही परीक्षेकरिता अर्ज नमुना ‘१२ म’, ‘सी’ व ‘ई’ यामध्ये तसेच दोन्ही परीक्षांच्या पुनर्प्रवेशाकरिता अर्ज नमुना ‘१२ म’ व ‘डी’ यामध्ये सुवाच्य अक्षरात/ टंकलिखित पूर्ण भरून संबंधित जिल्ह्य़ाचे विद्युत निरीक्षक यांच्याकडे सादर करावेत.

परीक्षा शुल्क- रु. ५००/-. संबंधित विद्युत निरीक्षक कार्यालयात रोख रकमेत भरणा करून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडावी. अर्जदारास त्याच्या रहिवासी जिह्य़ाच्या मंडळ कार्यालयाअंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रातूनच परीक्षेस बसणे अनिवार्य आहे.

उमेदवारांनी अर्जासोबत स्वयंसाक्षांकित केलेली पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

विद्युत तारतंत्री परीक्षेसाठी- (१) महाराष्ट्र राज्यातील अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र, (२) अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत, (३) निवासी पुरावा (आधारकार्ड/ व्होटिंग कार्ड/ पासपोर्ट यांपकी कोणतेही एक), (४) ३ रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो, (५) अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ ७ १२ सें.मी. आकाराचे दोन लिफाफे.

विद्युत पर्यवेक्षक परीक्षेसाठी- वरील यादीतील अनुक्रमांक (१) ते (५) व्यतिरिक्त पुढील कागदपत्रे जोडावीत. (१) तारतंत्री परवाना व प्रमाणपत्राची छायाप्रत, (२) एसएससी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र, (३) विद्युत अभियांत्रिकी पदवी/ पदविका याखेरीज इतर शाखेमधील अभियांत्रिकी पदवी/ पदविका प्रमाणपत्र आणि विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील किमान एक वर्षांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.

पूर्ण भरलेला अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१७. अर्ज मंजूर/ नामंजूर/ त्रुटींची यादी मंडल व विभागीय कार्यालयात प्रसिद्ध करावयाच्या दि. १२ ऑक्टोबर २०१७ अर्जामध्ये त्रुटी असल्यास पूर्तता करावयाचा अंतिम दि. २१ ऑक्टोबर २०१७.

वरील परीक्षा केवळ मराठी/ हिंदी/ इंग्रजी या भाषांतून घेण्यात येईल.