*  भारतीय वायू सेनेच्या देशभरातील मेंटेनन्स कमांड युनिट्समध्ये ग्रुप सी पदांची भरती.

(धोबी, एमटीएस्, सफाईवाला, मेस स्टाफ, स्टोअर किपर, एलडीसी, कुक इ.)

महाराष्ट्रातील पुढील आस्थापनांमध्ये भरती.

१) वायुसेना नगर, नागपूर (४ पदे),

२) चंदननगर, पुणे (४ पदे), ३) ओझर, नाशिक (९ पदे), ४) देवळाली साऊथ, नाशिक (१५ पदे), ५) सीएस्आय् एअरपोर्ट, मुंबई (३ पदे).

पात्रता – (१) धोबी, एमटीएस्, मेस स्टाफ, कुकसाठी १० वी उत्तीर्ण. एक वर्षांचा अनुभव.

(२) लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) – १२वी  इंग्रजी टायिपग ३५ श.प्र.मि./ िहदी टायिपग ३० श.प्र.मि. (३) स्टोअर किपर – १२वी अनुभव असणे गरजेचे.

वयोमर्यादा – १८ ते २५वष्रे. (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे)

निवड पद्धती –  लेखी परीक्षा – सामान्य बुद्धिमत्ता, न्यूमरिकल अ‍ॅप्टिट्यूड, इंग्रजी, सामान्यज्ञान यांवर आधारित स्किल टेस्ट. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १८ मार्च २०१७ च्या अंकात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०१७

*  केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरएफ) सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनो)

पदांच्या २१९ जागा (जनरल – ७५, इमाव – ८०, अजा – ४२, अज – २२)

पात्रता – १२वी उत्तीर्ण  स्टेनोग्राफी (शॉर्टहँड) स्पीड – ८० श.प्र.मि.

उंची – पुरुष – १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.), महिला – १५५ सें.मी. (अज – १५०सें.मी.). पुरुष – छाती – ७७-८२ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

वयोमर्यादा – दि. २५ एप्रिल २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे (अजा/अज – ३०वष्रे, इमाव – २८ वष्रे)

परीक्षा शुल्क – रु. १००/- (महिला/अजा/ अज यांना फी माफ).

लेखी परीक्षा दि. १६ जुल २०१७ रोजी कॉम्प्युटरवर.

स्कीलटेस्ट – १० मिनिटांचे डिक्टेशन ८० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड आणि ट्रान्स्क्रीपमेंटसाठी वेळ ५० मि. इंग्रजी टायिपगसाठी / ६५मि. िहदी टायिपगसाठी. ऑनलाइन अर्ज http://www.crpfindia.com

या संकेतस्थळावर दि. २७ मार्च २०१७ ते २५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.