अर्जदार केमिकल, पेट्रोकेमिकल, केमिकल टेक्नॉलॉजीमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा ८ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ४५ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते ३० ऑक्टोबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली गेल इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा ‘गेल’च्या http://www.gailonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (एचआरडी), गेल (इंडिया) लिमिटेड, गेल भवन, १६, भिकाजी कामा प्लेस, आर. के. पुरम, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर १२ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

ईस्टर्न कोलफिल्डस लि.मध्ये ओव्हरसिअर (सिव्हिल)च्या ४८ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील ईस्टर्न कोलफिल्डस्ची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज चीफ मॅनेजर (पी/आरईसीटी), ईस्टर्न कोलफिल्डस् लि. पर्सोनेल डिपार्टमेंट, रिक्रुटमेंट सेल, हेडक्वार्टर्स, सँक्टोरिया पोस्ट ऑफिस, पोस्ट दिशेरगड, जि. बर्दद्वान, प. बंगाल- ७१३३३३ या पत्त्यावर १२ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल मेटॅलर्जिकल लेबॉरेटरी- जमशेदपूर येथे सायंटिस्टच्या ११ जागा
उमेदवार मेटॅलर्जी, मटेरियल वा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील एमटेक वा पीएच.डी. पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. वयोमर्यादा ३७ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल मेटॅलर्जीकल लेबॉरेटरीची जाहिरात पाहावी. http://www.nmlindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत
अर्ज करावेत.

सैनिक शाळा, महू येथे वाहनचालकांच्या ६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व वाहनचालकाचा (अवजड वाहने) परवानाधारक   असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
अर्जाच्या नमुन्यासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील सैनिक शाळा, महूची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील अर्ज प्रिसायडिंग ऑफिसर अ‍ॅप्लिकेशन रिक्रुटिंग बोर्ड, दि इन्फ्रंट्री स्कूल, महू (जि. इंदूर), मध्य प्रदेश या पत्त्यावर १३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

विमान वाहतूक मंत्रालयात साहाय्यक संचालकांच्या ११ जागा
उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अथवा विमान वाहतूक विषयातील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या  २४ ते ३० ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

आयुध निर्माणी- गाझियाबाद येथे कनिष्ठ कारकुनांच्या ८ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१५च्या अंकातील आयुध निर्माणी गाझियाबादची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या ofm.gov.in RecuritmentLink‘ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज पाठवावेत.

नौदलाचा दक्षिण विभाग, कोची येथे सायंटिफिक असिस्टंटच्या २३ जागा
उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अथवा इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांसह बीएस्सी असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील नौदल मुख्यालय, कोचीची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि फ्लॅग ऑफिसर- कमांडिंग इन चीफ, हेडक्वार्टर्स सदर्न कमांड, कोची- ६८२००४ या पत्त्यावर १४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

पश्चिम रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाइडस्साठी १२ जागा
उमेदवार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी स्काऊट व गाईड्स क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ ऑक्टोबर २०१५ च्या अंकातील पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर पर्सोनेल ऑफिसर (आर अ‍ॅण्ड डी), पश्चिम रेल्वे, मुख्यालय, तिसरा मजला, जुनी इमारत, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर १६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तंत्र अधिकाऱ्यांच्या ५७ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या विषयातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित विषयातील कामाचा किमान ४ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.npcilcareers.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत
अर्ज करावेत.