मुहम्मद अलवींच्या ग़ज़्‍ाला-कविता ‘सहले मुम्तना’ या सदरात मोडतात. सहजपणे आकलन होणारे हे काव्य, भाष्य मात्र सखोल असतं. अलवींची कविता असो वा ग़ज़्‍ाल तिचं स्वतंत्र विश्व आहे. त्यातील प्रतीके, रूपके उर्दू काव्यपरंपरेस नवीन आहेत. ते ग़ज़्‍ालचेही शायर आहेत अन् नज्मचेही. त्यांच्या शेरात कवितेची अर्थगर्भता भिनली असते अन् कवितेत शेराची सूत्रबद्ध सखोलता!

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईच्या नेहरू सेंटरचा हॉल खचाखच भरला होता. उर्दू मुशायरा प्रारंभ होण्याची वाट सारे पाहत होतो. मुशायऱ्यात मज़्‍ारूह, कैफी, जाफरींसह निदा फाजलींसारखे मातब्बर शायर सहभागी होते. आपल्या अन्य ग़ज़्‍ालांसह शायरांना ग़ालिबच्या ‘जमीन’वरही ग़ज़्‍ाल पेश करायची होती. साऱ्यांनाच बऱ्यापकी दाद मिळत गेली. पण एका शायराने ग़ालिबच्या रंगात गज़्‍ाला पेश केल्या अन् उत्थापन देत श्रोत्यांनी त्याच्यावर सलग वन्स मोरची बरसात केली. अहमदाबादच्या या शायराचं नाव आहे मुहम्मद अलवी. अलवीचे याच संदर्भातले शेर मुलाहिजा हो-
(*नक्श *फरयादी है किसकी शोखी-ए-तहरीर का- गालिब)
गर को लिखते हो खत और वो भी *फर्जी नाम से
*आश्ना हूँ मैं तुम्हारी *शोखी-ए-*तहरीर का

मैंने सोचा था कि मिल जाये तो *आवेजां करूं
गिर गई दीवार घर की, क्या करूं तस्वीर का

आणखी *जमीनी शेर पाहा-
(इब्ने मरियम.. मेरे दिल की दवा करें कोई गालिब)
नयी नज्में कहा करें कोई
कुछ न समझे, खुदा कर कोई

जंगलों में भी राह जाती है
शहर में क्यों फिरा करे कोई

छीन लो हक बचाव करने का
मार दो गर * गिला करे कोई
मुहम्मद अलवींचा जन्म एप्रिल १९२७ ला अहमदाबाद येथे झाला. निदा म्हणतात, ‘हे तेच अहमदाबाद शहर आहे जेथे काही वर्षांपूर्वी एका सडकेच्या मध्यात, उर्दूच्या प्रथम साहिबे दीवान (ग़ज़्‍ाल संग्रहकार) वली दकनवीची कबर सापडली. शाहजहाँच्या काळातील वली व आजचे मुहम्मद अलवी या दोघांचा नातेसंबंध शाह आलमच्या काळातील एक संत बाबा वजीहुद्दीन गुजराती यांच्याशी जाऊन मिळतो. अलवी त्यांच्या दग्र्याचे उत्तराधिकारींपकी आहेत. अलवींमध्ये एकाच वेळी अनेक अलवी समाविष्ट आहेत. सूफी, शराबी, पिता, नवरा, उद्योजक, एकांतप्रिय, जुगारी अन् मफल भरविणारा मित्र इत्यादी आपल्यातील हा विरोधाभास असलेलं व्यक्तिमत्त्व अलवी स्वीकार करतात-

हम भी गालिब से कम नहीं
तुम न मानो तो क्या करे कोई
अलवींची शायरी वाचताना ती परंपरेहून पृथक सुबोध कवितेजवळ जाणारी, कधी तरल, कधी खटय़ाळ स्वरूपाची जाणवते.

फिर फूलों ने * चाक-चाक की
फिर कलियों ने सी ली खुशबू
ख्वाबों का इक शहर है जिसमें
तरह-तरह के डर रहते है

सोते-सोते अचानक गली डर गयी
दोपहर *चील की चीख से भर गयी

वो तो ख्वाबों में भी खुशबू की तरह आता रहा
फूल की मािनद उसको हम मगर देखा किये

हा अलवींच्या ग़ज़्‍ालचा तरल रंग होय.

पुराने वक्त का सिक्का हूँ मुझ को फेंक न दे
बुरे दिनों में ये *मुमकिन है मैं भी चल जाऊँ

तारीफ सुनके दोस्त से अलवी तू खुश न हो
उसको तेरी बुराइयाँ करते हुए भी देख

इन्हीं लोगों से मिलकर खुश हुआ था
इन्हीं लोगों से डरता फिर रहा हूँ

चलो गाली देकर ही याद कर लो
हमारी भी कोई पहचान जो है
अलवींच्या ग़ज़्‍ाला-कविता ‘सहले मुम्तना’ या सदरात मोडतात. सहजपणे आकलन होणारे हे काव्य, भाष्य मात्र सखोल करतं. त्याचमुळे श्रोते, वाचक व समीक्षकही अलवींच्या काव्याचे चाहते आहेत. एक उच्च पदस्थ महाभाग मला म्हणाला, ‘अलवी नज्मचा शायर आहे ग़ज़्‍ालचा नव्हे.’ याला ग़ज़्‍ाल अलीकडे नज्मच्या जवळ जात आहे हे ज्ञातच नव्हते. याउलट डॉ. नारंग शम्सुर्रहमान फारुकीसारखे दिग्गज समीक्षक अलवींचे शेरच उद्धृत करतात. निदा फाजलींच्या मते अलवी हे शब्दांचे चित्रकार आहेत. होय खरे आहे, पण थोडी दुरुस्ती करू इच्छितो ते पोटर्र्ेट नव्हे तर लॅण्डस्केप आर्टस्टि आहेत व त्याचा आपल्या जीवनाशी बराचसा संबंधही ते चित्रित करतात, प्रतीकात्मक रंगात.
बाहर गली में खिल गई कलियाँ गुलाब की
झोंका हवा का आते ही कमरा महक गया

गाँव देखा तो मुंह बिगाडम और
धूल उडाता गुजर गया रस्ता

सुबह-दम कुछ भी न था गम के सिवा
रात सब खुशियाँ चुरा कर ले गयी

दूर तक बेकार-सी इक दोपहर
इक *परिन्दा *बेसबब उडता हुआ
अलवींच्या शायरीतला खटय़ाळ उपरोध
अनुभवा- नवकाव्याच्या संदर्भात-
अजब अंजान लफ्जों से भरी है
*लुगत है या हमारी शायरी है

अलवी अनेक विचित्र प्रश्न शेरात उपस्थित करतात.
अपना घर आने से पहले
इतनी गलियाँ क्यूँ आती हैं
ग़ज़्‍ालविधेबाबत अलवी म्हणतात-

एक आँख से कानी है
ग़ज़्‍ाल अदब की रानी है
गाऊन ग़ज़्‍ाल ऐकविण्याच्या आग्रहास ते उत्तर देतात-
ग़ज़्‍ाल कही है कोई भांग तो नहीं पी है
मुशायरे में *तरन्नुम से क्यूँ सुनाऊँ मैं?
मित्राच्या संदर्भातले हे शेर प्रतीकात्मक संदर्भात वाचा-
अपने से बढ के तुझ पे मुझे *एतमाद था
अफसोस तू भी मेरी *हिफाजत न कर सका

उसने मुझे *तबाह किया इस के बावजूद
दोचार दिन भी उस से मं नफरत न कर सका

फिर उसके पाऊँ मेरा इन्तजार करते हुए
फिर उस मकान का दरवाजा अधखुला देखूँ
मुहम्मद अलवींचे चार ग़ज़्‍ाल-काव्यसंग्रह आहेत. (१) खाली मकान (१९६३), (२) आखरी दिन की तलाश (१९६८), (३) तिसरी किताब (१९७८), (४) चौथा आस्मान (१९९१) व कुल्लियात म्हणजे समग्र काव्य- रात इधर उधर रोशन (१९९५)
अलवींची कविता असो वा ग़ज़्‍ाल तिचं स्वतंत्र विश्व आहे. त्यातील प्रतीके, रूपके उर्दू काव्यपरंपरेस नवीन आहेत. ते ग़ज़्‍ालचेही शायर आहेत अन् नज्मचेही. त्यांच्या शेरात कवितेची अर्थगर्भता भिनली असते अन् कवितेत शेराची सूत्रबद्ध सखोलता. पण मोठा कॅनव्हास हा कवी कधी वापरत नाही. मानवी जीवनाचे छोटे छोटे अनुभव-जाणिवा, कल्पना-संवेदना तो चित्रबद्ध करतो, सुबोध शब्द कुंचल्यांनी. त्यांच्या काही कविताच इथे नमूद करतो ना, मग तुम्हीच काय ते ठरवा-

० नया साल दिन, महिने और मौसम
सब पुराना माल लेकर फिर
नया साल आ गया.

० अफवाहें
अफवाहें के पाँव नहीं होते
अफवाहें फिर भी चलती है
दौडती है, घर-घर जाती है
और इक़ इक़ घर में
खुशियों को ढूँढ ढूँढकर
खा जाती है.

० खुदा
घर की बेकार चीजों में रख्खी लाल टेन
कभी ऐसा होता हैं
बिजली चली जाय तो
ढूँढ कर उसको लाते है
बडे ही जतन से जलाते है
और बिजली आते ही
बेकार चीजों में फेंक आते है

० जनमदिन
साल में एक बार आता है
आते ही मुझसे कहता है
कैसे हो.. अच्छे तो हो?
लाओ इस बात पे केक खिलांओ
रात के खाने में क्या है?
फिर इधर उधर की बातें करता रहता है
फिर घडी देख के कहता है
अच्छा तो मैं चलता हूँ प्यारे अब
एक साल बाद आऊँगा
केक बना के रखना
साथ में मछली भी खाऊँगा
उसे मिलकर थोडी देर मजा आता है
लेकिन फिर मं सोचता हूँ
खास मजा तो तब आयेगा
जब वो आकर
मुझ को ढूँढता रह जायेगा
या कवितांवरून अलवींच्या काव्य-प्रकृतीचा वेगळेपणा सहज जाणवतो. अलवी हे जदीद उर्दू शायरीतील कदाचित एकमेव शायर असावेत, ज्यांच्या काव्याला सर्वाधिक उर्दू समीक्षकांनी वाखाणले.
शेवटी अलवींची ‘तख्लीक’ म्हणजे सृजन या शीर्षकाची लहानशी मोहक कविता मराठीत देतो.
एक गंजलेल्या तोफेच्या तोंडावर
इवल्याशा चिमणीने घरटं बांधलंय
———————————–
(जमिनी – रदीफ काफिया व छंद
हिफाजत – रक्षण, फर्जी – कल्पित, बनावट
तबाह – नष्ट, आश्ना- परिचित , आवेजां-टांगणं
गिला – तक्रार, िनदा, चाक-चाक – फाडणे
चील – घार, मुमकिन – संभवत, कदाचित
परिन्दा – पक्षी , बेसबब – अकारण
लफ्ज – शब्द, लुगत – शब्दकोष,
तरन्नुम – आलाप, लय,
सूर, एतमाद – विश्वास, भरवसा
पकरे- तस्वीर, चित्राचा आकार
शोखी – खटय़ाळपणा, सुंदरता, चंचलता,
तहरीर – अक्षरांचे वळण, नक्श – खूण, नक्षी चित्र, चिन्ह
फरयादी – फिर्यादी, तक्रार करणारा, परहन – पोशाख, वस्त्र)
dr.rampandit@gmail.com