आजच्या लेखामध्ये आपण ‘भूगोला’चा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास आणि जैवविविधता व पर्यावरण इत्यादी अभ्यासक्रमामध्ये नमूद विषयासोबत कसा संबंध येतो, याची चर्चा करणार आहोत. यामुळे अभ्यासाचे नियोजन हे अधिक नेमकेपणे करता येऊन विषयाची र्सवकष तयारी करता येते. भूगोल या विषयातील ‘पर्यावरण भूगोल’ हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासताना मुखत्वे पर्यावरण परिस्थितिकी,  प्रदेशनिहाय जैवविविधता त्याचे प्रमाण, त्याच्याशी संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े, हरितग्रह परिणाम आणि जागतिक तापमानवाढ यासाठी कारणीभूत असणारे नसíगक व मानवी घटक लक्षात घ्यायला हवेत. वाढते शहरीकरण यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, वनाचा होणारा ऱ्हास तसेच या कारणास्तव निर्माण झालेल्या समस्या आणि एकूणच याचा होणारा एकत्रित परिणाम, याचा जगाच्या व भारताच्या भूगोलसंबंधी विचार करावा लागतोआणि याच्याशी संबंधित माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्वाचे ठरते. याचा अभ्यास कसा करावा याची माहितीपूर्ण चर्चा आपण याआधीच्या लेखात सविस्तरपणे केलेली आहे. सामान्य अध्ययनमधील बहुतांश घटकांचा परस्परपूरक संबंध येतो. त्यावेळी या घटकांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो, ज्यामुळे कमीत कमी वेळामध्ये हे घटक अभ्यासता येऊ शकतात.

सामान्य अध्ययनमधील पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकाअंतर्गत देशाच्या विविध भागात घेतली जाणारी महत्त्वाची पिके व पीक पद्धती, शेती उत्पादन, प्राणीसंगोपन अर्थशास्त्र, सिंचनाचे प्रकार आणि दळणवळण इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे. यासाठी आपणाला आर्थिक भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो. या सर्व घटकांचा सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने अभ्यास करावा लागतो. तसेच याच्या मूलभूत माहितीची तोंडओळख करून घ्यावी लागते. अर्थात यामुळे या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्यासाठी मदत होते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुतांशी भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित असतात.

याच्या मूलभूत माहितीचा अभ्यास सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल विषयातील आर्थिक भूगोलामध्ये झालेला असतो. तसेच या माहितीचा वापर करून पेपर तीनमधील प्रश्न अधिक समर्पकरीत्या सोडवता येऊ शकतात. पण अशा प्रकारे माहितीचा वापर करताना आर्थिक पलूंचा विशेषकरून अधिक विचार करणे, पेपर  तीनमध्ये  अभिप्रेत असते याचे भान ठेवावे लागते. थोडक्यात, जरी मूलभूत महितीची परिभाषा एकसारखी असली तरी उत्तरे लिहिताना पेपरनिहाय लागणाऱ्या दृष्टिकोनाचा अचूकपणे वापर करावा लागतो.

सध्या जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, शहरीकरण, उपलब्ध नसíगक साधनसंपत्तीमध्ये होणारी घट, सतत वाढणारी लोकसंख्या आणि या सगळ्यासाठी कारणीभूत असणारे नसíगक आणि मानवनिर्मित घटक यासंबंधी सतत काही घटना घडत असतात. याची माहिती आपणाला परीक्षेच्या दृष्टीने नोटस स्वरूपात संकलित करावी लागते. या माहितीचा उपयोग सामान्य अध्ययनमधील संबंधित विषयाचा सखोल आणि सर्वकष पद्धतीने तयारी करण्यासाठी   करता येऊ शकतो. या घटकाचा समावेश हा ‘सामान्य अध्ययन पेपर तीन’मधील – ‘जैवविविधता आणि पर्यावरण अंतर्गत नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन’ आदी घटकांच्या अभ्यासक्रमात केलेला आहे. हे घटक पर्यावरण भूगोल या घटकाशी च्याशी संबंधित आहेत.

पेपर तीनमध्ये या घटकाचा अभ्यास करताना मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टीवर कोणते परिणाम झालेले आहेत, तसेच यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केल्या गेलेल्या आहेत याची माहिती असणे अपरिहार्य ठरते. यामध्ये मुखत्वे भारत सरकारने आखलेल्या उपाययोजना, नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, यासाठी पारित करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे याचबरोबर यामध्ये भारताची अधिकृतपणे नेमकी भूमिका काय आहे याची सविस्तर माहिती ठेवावी लागते. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना आणि कायदे याची माहिती असणे गरजेचे आहे. अशा माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजना, कायदे यासारख्या स्रोताचा उपयोग करता येऊ शकतो. या घटकाचा पारंपरिक अभ्यास ‘पर्यावरण भूगोला’मध्ये झाल्यामुळे  याच्याशी घडणाऱ्या चालू घडमोडीची समज अधिक योग्यरीत्या करता येते.

उपरोक्त नमूद केलेल्या घटकासाठी सामान्य अध्ययनमधील पेपरनुसार जो दृष्टिकोन वापरावा लागतो त्यामध्ये भिन्नता येते. त्यामुळे सर्वप्रथम याच्या प्राथमिक माहितीचा अभ्यास करून घ्यावा लागतो, ज्यासाठी आपणाला आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल हे  विषय अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर सामान्य अध्ययनमधील पेपर तीनमधील उपरोक्त नमूद घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा चालू घडामोडीशी अधिक संबंधित असतात.

जरी असे असले तरी विषयाच्या पारंपरिक ज्ञानाची सखोल माहिती असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे लिहिता येत नाहीत. सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल या विषयामुळे पर्यावरण आणि आर्थिक भूगोलाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास झालेला असतो. म्हणूनच संबंधित घटकाचा चालू घडामोडीसोबत समावेश करून र्सवकष पद्धतीने परीक्षाभिमुख तयारी करता येऊ शकते.