बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पात्रताधारक चार्टर्ड अकाऊंटंटसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

जागांची संख्या व तपशील- उपलब्ध जागांची संख्या १००. यापैकी १५ जागा अनुसूचित जातीच्या, ७ जागा अनुसूचित जमातीच्या, तर २७ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असून ५१ जागा खुल्या वर्गगटांतील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व पात्रताधारक चार्डर्ड अकाऊंटंट असावेत व त्यांना वरील पात्रतेनंतर संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असायला हवा.

वयोगट- अर्जदारांचे वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.

वेतनश्रेणी व फायदे- निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून दरमहा ३१७०५- ११४५/ १- ३२८५० – १३१०/ १०- ४५९५० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.

वरील वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित वेतनश्रेणीतील इतर भत्ते व फायदेपण देय असतील.

अधिक माहिती व तपशील- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली बँक ऑफ महाराष्ट्रची जाहिरात पाहावी अथवा बँक ऑफ महाराष्ट्रच्या http://www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावरील करिअर- करंट ओपनिंग या मेन्यूत जाऊन माहिती घ्यावी. किंवा http://www.bankofmaharashtra.in/downdocs/RECRUITMENT_CIVIL_ELECTRCIAL_FIRE_ENGINEERS.pdf  या लिंकवर ही माहिती मिळेल.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१७ आहे. पात्रताधारक चार्टर्ड अकाऊंटंट उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी ही संधी उपयुक्त ठरेल.