का? कुठे? कसे?

सध्या वॉट्स अ‍ॅपवर ‘जिफ्  इमेज’ची चलती आहे. वॉट्स अ‍ॅप वापरणाऱ्यांना या जिफ्  इमेजची चांगलीच माहिती असेल. दिवाळीत या जिफ इमेज म्हणजे चलचित्रांच्या स्वरूपातील छायाचित्र शुभेच्छांच्या स्वरूपात तुमच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर किंवा पर्सनल चॅटवर येतील. पण नेमक्या या जिफ्  इमेज तयार कशा होतात याचं गुपित तुम्ही जाणून घ्यायलाच हवं

* जिफ् इमेज म्हणजे ग्राफिक इंटरचेंज फॉरमॅट ज्याचा शोध स्टीव्ह व्हाइट यांनी लावला

*  जिफ् इमेज तयार करण्यासाठी तुम्हाला विविध संकेतस्थळांचा उपयोग करता येऊ शकतो.

*  तुम्ही फोटोशॉप या सोफ्टवेअरमध्ये जिफ्  इमेज तयार करू शकता.

यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे करावे लागेल.

* तुम्हाला ज्या छायाचित्रांचे जिफ्  तयार करायचे असेल ते संगणकातील एका फोल्डरमध्ये घ्या.

* फोटोशॉपमध्ये फाइल-लोड

फाइल इंटु स्टॅक यावर क्लिक करा.

* यानंतर सर्व छायाचित्रे तुम्हाला फोटोशॉपमध्ये दिसतील.

* त्यानंतर विंडो या बटनावर क्लिक करा. त्यात टाइमलाइन हा पर्याय स्वीकारा.

* हा पर्याय ओपन झाल्यावर क्रिएट फ्रेम अ‍ॅनिमेशनवर क्लिक करा.

* तुमच्या स्क्रीनवर फोटोच्या कोपऱ्यात एक चौकोनी आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून न्यू लेयर विजिबल टु ऑल फ्रेम्सवर क्लिक करा.

* त्यानंतर पुन्हा तेच बटण दाबून क्रिएट इच न्यू लेयर फॉर इच न्यू फ्रेम हा पर्याय स्वीकारा.

* त्यानंतर खाली असलेल्या टुलबारवरून तुम्हाला ते चलचित्र किती वेळा हलवायचे आहे ते निवडा.

* तिथेच वेळेचाही पर्याय असेल ती वेळ निवडा.

* तुमचे अ‍ॅनिमेटेड जिफ्  तयार झाले असेल.

*  ही प्रक्रिया कठीण असल्याने तुमच्यासाठी विविध संकेतस्थळे तसेच अ‍ॅप्सचा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर तुम्ही काही सेकंदांत तुमच्या शुभेच्छा छायाचित्रांचे जिफ्  तयार करू शकता.