आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणाऱ्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम या विषयाची आपण थोडक्यात उकल करून घेऊ या. यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि याच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी केली जाते. मवाळ  कालखंड, (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२०-१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील इतर प्रवाह ज्यामध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ, इत्यादीचा समावेश होतो. याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद िहद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, िहदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानमधील प्रजेच्या चळवळी, खालच्या जातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाईसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७ च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, वावेल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. हा विषय आपणाला पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयार करावा लागत असल्यामुळे या विषयाची सखोल आणि व्यापक पलूंचा विचार करून तयारी करावी लागते. कारण या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहता हा विषय सर्वागीण पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे, जे खालील गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्न विश्लेषणावरून समजून येते.

या विषयावर २०११ ते २०१६ मध्ये एकूण ३३ प्रश्न विचारण्यात आलेले होते. आत्ता आपण या विषयावर गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची विश्लेषणात्मक पद्धतीने थोडक्यात चर्चा करणार आहोत, ज्यामुळे या विषयाची परीक्षाभिमुख तयारी आणि नियोजन आपणाला अधिक उपयुक्त पद्धतीने करण्यास मदत होईल.

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?
  • २०११ मध्ये, ‘१९४२ च्या चलेजाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही?’ असा प्रश्न विचारला गेला. त्यासाठी पुढील पर्याय दिले गेले, ‘ही एक िहसक चळवळ होती’, ‘याचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते’, ‘ही एक उत्स्फूर्त चळवळ होती’ आणि ‘कामगारांना आकर्षति करून घेता आले नाही’  यातील अचूक निरीक्षण ओळखून योग्य पर्याय निवडायचा होता.
  • २०१२ मध्ये, ‘भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते?’ आणि यासाठी ‘ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आíथक पिळवणूक उघड केली’, ‘प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला’ आणि ‘काही करण्यापूर्वी सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गरजेवर भर दिला’ अशी तीन विधाने देण्यात आलेली होती. यापकी योग्य विधान/ विधाने कोणती हे निवडायचे होते.
  • २०१३ मध्ये, ‘ईलबर्ट बिल कशाशी संबंधित होते?’ ‘भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे र्निबध लादणे’, ‘भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे आणि मासिकावर र्निबध लादणे’, ‘युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांना घातलेली अपात्रता काढून टाकणे’
  • आणि ‘आयात केलेल्या सुती कपडय़ावरील कर काढून टाकणे’ असे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय कोणता असे विचारण्यात आलेले होते.
  • २०१४ मध्ये, ‘१९२९ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्वपूर्ण मानले जाते?’ हा प्रश्न विचारला गेला. त्यासाठी ‘स्व-सरकार मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्टय़ आहे ही घोषणा केली’, ‘पूर्ण स्वराज मिळविणे हा काँग्रेसचा उद्देश आहे याची घोषणा केली’, ‘असहकार चळवळ सुरू करण्यात आली’ आणि ‘लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला’ असे चार पर्याय देण्यात आलेले होते आणि यातील योग्य पर्याय निवडायचा होता.
  • २०१५ मध्ये, ‘खालीलपकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला?’ हा प्रश्न आणि यासाठी ‘स्वदेशी चळवळ’, ‘चलेजाव चळवळ’, ‘असहकार चळवळ’ आणि ‘सविनय कायदेभंग चळवळ’ हे चार पर्याय देण्यात आलेले होते व यातून योग्य पर्याय निवडायचा होता.
  • २०१६ मध्ये, ‘माँन्टेग्यु चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता?’ या प्रश्नासाठी ‘सामाजिक सुधारणा’, ‘शैक्षणिक सुधारणा’, ‘पोलीस प्रशासनातील सुधारणा’ आणि ‘घटनात्मक सुधारणा’ असे चार पर्याय देण्यात आलेले होते आणि यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

उपरोक्त प्रश्नांवरून या विषयावर नेमक्या कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याचे आकलन करता येऊ शकते व या विषयाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी यासाठी मदत होते. या विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन तसेच व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी इत्यादी पलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गरजेचे आहे. तसे पाहता हा विषय पारंपरिक स्वरूपाचा आहे, म्हणून या विषयाचा सखोल आणि सर्वागीण माहितीचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे.

या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, पण सर्वप्रथम या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे आणि त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपिन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फार इंडिपेंड्स’, बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, सुमित सरकार लिखित ‘आधुनिक भारत’ इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत आणि या संदर्भग्रंथांवर आधारित स्वतच्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून हा विषय कमीत कमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकतो.