* सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च (एसएएमईईआर), मुंबई (भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयअंतर्गत एक रिसर्च आणि डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट) येथे ‘अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी’च्या एकूण ४२ पदांची भरती.

(इमाव – ११ पदे, अजा – ६, – अज – ३, खुला गट – २२)  ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –

(१) पवईसाठी – फिटर (४ पदे), मशिनिस्ट (४ पदे), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (१२ पदे), प्रोग्रॅिमग अँड सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (पीएएसएए) (६ पदे), टर्नर (२ पदे), वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉप्लेटर/ ड्राफ्ट्समन/मेकॅनिकल/आयटी अँड ईएसएम प्रत्येकी एक पद.

(२) खारघरसाठी – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (४ पदे), फिटर (२ पदे), पीएएसएए (३ पदे).

पात्रता –  पीएएसएएसाठी १२वी उत्तीर्ण. इतर पदांसाठी – १०वी उत्तीर्ण आयटीआयमधील संबंधित ट्रेडमधील पात्रता. उमेदवारांना १०वीला किमान ६०% गुण आवश्यक.

प्रशिक्षणा दरम्यान दरमहा स्टायपेंड रु. ७,०००/- पीएएसएए आणि वेल्डर ट्रेडसाठी आणि रु. ७,८७७/- इतर ट्रेड्ससाठी.

वॉकइन इंटरव्ह्यूसाठी पुढील तारखांना सकाळी ९.३०वाजता एसएएमईईआर, आयआयटी कॅम्पस (आयआयटी मेन गेट) हिल साइड, पवई, मुंबई – ४०००७६ या पत्त्यावर उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

(१) फिटर, टर्नर आणि वेल्डर – १८ ऑगस्ट २०१७

(२) मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर आणि ड्राफ्ट्समन – २१ऑगस्ट २०१७

(३) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २२ ऑगस्ट २०१७

(४) पीएएसएए, आयटी आणि ईएसएम – २३ ऑगस्ट २०१७

अर्जाचा नमुना http://www.sameer.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पूर्ण भरलेल्या अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १०वी/ १२वीची मार्कलिस्ट,  पात्रता परीक्षा पासिंग सर्टििफकेट,  पात्रता परीक्षेतील सर्व सेमिस्टर/वर्षांची मार्कलिस्ट,  अनुभव (असल्यास) त्याचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट साइज फोटोग्राफ, जातीचा दाखला.

उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत वॉक इन्सच्या वेळी आणणे आवश्यक.

* इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (आयएसआरओ) मध्ये एकूण १२८ वाहनचालकांची भरती.

१) लाइट व्हेहिकल ड्रायव्हर-ए (एकूण ५० पदे- यूआर- २७, इमाव- १५, अजा- ७, अज- १)

(तिरुअनंतपुरम्- १९ पदे, बंगलोर- १५ पदे, श्रीहरिकोटा- १० पदे, हैद्राबाद- ४ पदे, अहमदाबाद/नवी दिल्ली प्रत्येकी एक पद.)

२) हेवी व्हेहिकल ड्रायव्हर-ए (एकूण ७६ पदे- यूआर- ४७, इमाव- २१, अजा- ७, अज- १)

(तिरुअनंतपुरम् – ६० पदे, श्रीहरिकोटा- ८ पदे, बंगलोर- ५ पदे, अहमदाबाद- ३ पदे).

३) स्टाफ कार ड्रायव्हर-ए (२ पदे बेंगलूरुसाठी).

पात्रता- १०वी उत्तीर्ण.

पद क्र. १ व ३ साठी लाइट व्हेहिकल ड्रायिव्हग लायसन्स. ३ वर्षांचा अनुभव;

पद क्र. २ साठी हेवी व्हेहिकल ड्रायिव्हग लायसन्स. ५ वर्षांचा अनुभव.

सर्व पदांसाठी पब्लिक सव्‍‌र्हिस बॅजेस (सार्वजनिक सेवा बिल्ला) असणे आवश्यक. अनुभवाचे प्रमाणपत्र सरकारी/ अर्ध सरकारी/ रजिस्टर्ड कंपनी/ सोसायटी/ ट्रस्ट इत्यादींनी जारी केलेले असावे. सार्वजनिक सेवा बिल्ला अर्ज सादर करण्याच्या दिवसापर्यंत जारी केलेला असावा.

वयोमर्यादा- दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजी ३५ वर्षे (अजा/अज- ४० वर्षे, इमाव- ३८ वर्षे).

उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. अट- उमेदवार विविध पदांसाठी एकाच झोनसाठी किंवा विविध झोन्ससाठी अर्ज करू शकतात. परंतु एकाच पदासाठी विविध झोन्ससाठी अर्ज करू शकत नाहीत. प्रत्येक अर्जासोबत अर्जाचे शुल्क रु. १००/- भरणे आवश्यक (महिला, अजा/ अज/ माजी सैनिक यांना फी माफ). अर्जासोबत कोणतेही कागदपत्र पाठविणे आवश्यक नाही.

निवड पद्धती- लेखी परीक्षा दि. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदाबाद, बंगलोर, चेन्नई, देहरादून, गुवाहाटी, हैद्राबाद, कोलकाता, नवी दिल्ली आणि तिरुवअनंतपुरम् येथे घेतली जाईल. ज्यात इंग्रजी (१५ गुण), गणित (१५ गुण), सामान्य ज्ञान (२० गुण). यातून स्किल टेस्ट (चालक परीक्षा) साठी उमेदवार निवडले जातील.

अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन अर्ज http://www.isro.gov.in  वर दि. २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, देवनार, मुंबई येथे

१) स्टेनोग्राफर- ग्रेड १ (एकूण ४ पदे) वेतन रु. ३६,०००/- (इमाव- २ पदे, अज- २ पदे).

पात्रता- पदवी उत्तीर्ण. १०० श.प्र.मि. इंग्रजी शॉर्टहँड आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. टायिपग स्पीड.

२) स्टेनोग्राफर- ग्रेड ३ (१ पद जे इमावसाठी राखीव). पात्रता- पदवी. ८० श.प्र.मि. वेगाने इंग्रजी लघुलेखन ३० श.प्र.मि. इंग्रजी टायिपग.

३) डेटा एन्ट्री ऑपरेटर (१ पद अराखीव) वेतन रु. २७,५००/-.

पात्रता- पदवी उत्तीर्ण. १ वर्षांचा अनुभव.

४) सायकिअ‍ॅटिक सोशल वर्कर (१ पद अराखीव). वेतन रु. ४९,०००/-.

पात्रता- एमएसडब्ल्यू किमान ५५% गुणांसह. ३ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा- सर्व पदांसाठी ३२ वर्षे. ऑनलाइन अर्ज http://www.tiss.edu या संकेतस्थळावर दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

* सीमा शुल्क आयुक्त यांचे कार्यालय, पुणे येथे सीमा शुल्क मरिन विभागात ग्रुप ‘सी’च्या एकुण ४२ पदांची भरती. (फक्त पुरुष उमेदवारांसाठी)

१. सीमेन (९ पदे),  २. ग्रीसर (७ पदे),

३. सिनियर डेक हँड (२ पदे), ५. लाँच मेकॅनिक (४ पदे), तांडेल (४ पदे), ६. खुकानी (२ पदे),

७) इंजिन ड्रायव्हर (२ पदे) इ.

पात्रता : सीमेन /ग्रीसर – १०वी उत्तीर्ण ३वर्षांचा अनुभव. (समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक बोटीवरील कामाचा) मरीन मर्कन्टाइल डिपार्टमेंटचे प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य.

पद क्र. ३ ते ७ साठी ८वी उत्तीर्ण. ५/७/१० वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा –

(१) व (२) साठी १८ ते २५वर्षे.

(३) ते (६) साठी १८ ते ३०वर्षे.

(७) साठी १८ ते ३५ वर्षे.

जाहिरात आणि अर्जाचा नमुना http://www.punecustoms.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध.

पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील अर्ज ‘जॉइंट कमिशन (पी अँड व्ही) कस्टम्स’ आयसीई हाऊस, ४१/ए, ससून रोड, पुणे – ४११ ००१ या पत्त्यावर दि. २१ ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. संपर्कासाठी दूरध्वनी – ०२०-२६११९६३१.