* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत विभागप्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी-शासकीय तंत्रनिकेतनच्या ६ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२१०२२२२ यावर संपर्क साधा. किंवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://mahaupsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१६.

* गोवा शिपियार्ड प्रशिक्षणार्थी स्ट्रक्चरल फिटरच्या ६ जागा- वयोमर्यादा ३३ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकातील गोवा शिपयार्डची जाहिरात पहावी अथवा http://www.goashipyard.com अथवा http://www.goashipyard.co.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१६.

* संरक्षण मंत्रालयात चंदीगड इथे कुशल कामगारांच्या १७ जागा-
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व संबंधित तांत्रिक विषयातील पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा http://www.ofbindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पूर्ण भरलेले अर्ज सीनिअर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स केबल फॅक्टरी,
१८३ इंडस्ट्रियल एरिया फेज- १, चंदीगड- १६०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१६.

* डिफेन्स बायो-इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इलेक्ट्रो मेडिकल लेबॉरेटरी, बंगलोर येथे ज्युनिअर रिसर्च फेलोच्या २ जागा
अर्जदार पदवीधर इंजिनीअर असावेत व त्यांनी ‘नेट’, ‘गेट’ यांसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्टच्या अंकातील जाहिरात पहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स बायो- इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इलेक्ट्रोमेडिकल लेबॉरेटरी, डीआरडीओ, सी.व्ही.रमण नगर, बंगलोर- ५६००९३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१६.

* इंस्ट्रमेंटेशन लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)च्या ८ जागा-
उमेदवारांनी मेकॅनिकल अथवा इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा प्रथमश्रेणीसह अथवा याच विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील इंस्ट्रमेंटेशन लिमिटेडची जाहिरात पहावी अथवा http://www.iipgt.com अथवा http://www.iikota.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज इंस्ट्रमेंटेशन लिमिटेड, काझीकोड (वेस्ट) पलक्कड, केरळ- ६७८६२३ या पत्त्यावर २० ऑगस्ट २०१६पर्यंत पाठवावेत.

* भविष्य निर्वाह निधी संघटनेत असिस्टंट इंजिनीअरिंग (सिव्हिल) च्या १३ जागा-
अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जुलै २०१६ च्या अंकातील भविष्य निर्वाह निधी संघटनेची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रिजनल प्रॉव्हिडंड कमिश्नर (एचआरएम), भविष्य निधी भवन, १४, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१६.
* छात्र सैनिकांसाठी सैन्यदलात ५५ जागा-
उमेदवार पदवीधर व छात्रसेनेचे सी प्रमाणपत्रधारक असून शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकातील सैन्यदलाची जाहिरात पहावी अथवा http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६.
* फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये खेळाडूंसाठी मुंबई येथे ७ जागा-
उमेदवार पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, फुटबॉल व हॉकी यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६च्या अंकातील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ९७११, प्लॉट नं. २, कर्मयोग बिल्डिंग, कार्टर रोड नं. ३, बोरिवली (पूर्व) मुंबई- ४०००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६.
* सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरंस एस्टॅब्लिशमेंट- खडकी, पुणे येथे कर्मचाऱ्यांच्या ३ जागा-
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ जुलै २०१६च्या अंकातील संरक्षण उत्पादन विभागाची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरंस एस्टॅब्लिशमेंट (आर्यामेंट), खडकी, पुणे ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६.

* एअरपोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्र व गोवा येथे कार्यालयीन सहाय्यकाच्या ४ जागा-
उमेदवार पदवीधर व टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ जुलै २०१६ च्या अंकातील एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा http:\\www.aai.aero.creers-employment news Recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीयपद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६.
* सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (आर्यामेंट) खडकी- पुणे येथे लघुलेखक म्हणून संधी- उमेदवार बारावी उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी ट्रान्सक्रिप्शनची ५० शब्द प्रतिमिनिट तर हिंदी ट्रान्सक्रिप्शनची ६५ शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ जुलै २०१६ च्या अंकातील संरक्षण उत्पादन विभाग, पुणेची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (आर्यामेंट), खडकी- पुणे ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६
* अ‍ॅग्रीकल्चर सायन्स फाऊंडेशन हुळकोट्टी (जि. गडग), कर्नाटक येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी– अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ जुलै २०१६ च्या अंकातील अ‍ॅग्रीकल्चर सायन्स फाऊंडेशनची जाहिरात पहावी अथवा फाउंडेशनच्या http://www.khpkuk.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूण भरलेले अर्ज अ‍ॅग्रीकल्चरल सायन्स फाऊंडेशन, हुळकोट्टी ५८२२०५ (जि. गडग) कर्नाटक या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६.
* आर. ए. पोद्दार आयुर्वेद संशोधन संस्था, मुंबई येथे सीनिअर कंसलटन्ट पॅथॉलॉजी पदासाठी थेट मुलाखत :
अर्जदार पॅथॉलॉजीमधील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा व त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा.
अधिक माहिती व तपशिलासाठी आर. ए. पोद्दार आयुर्वेद संशोधन संस्थेच्या http://www.ccras.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- आर. ओ. (साइंटिस्ट- ३) इंचार्ज, राजा रामदेव आनंदीलाल, पोद्दार सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर कॅन्सर, पोद्दार मेडिकल कॅम्पस, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- ४०००१८ येथे २४ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वा.

* महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात सदस्य (न्यायिक) व सदस्य (प्रशासकीय) पदाच्या मुंबई व नागपूर येथे ३ जागा– अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची जाहिरात पहावी अथवा shwetanrbari.khade@nic.in या ई-मेलवर संपर्क साधावा.
तपशीलवार अर्ज कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. ३८, सामान्य प्रशासन विभाग, तिसरा मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१६.

* महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – ‘उप प्रादेशिक अधिकारी गट-अ’ पदांची भरती. रिक्त पदांची संख्या – १३. पात्रता – (१) अभियांत्रिकी शाखेतील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण अथवा पर्यावरण विज्ञानमधील पदव्युत्तर पदवी. (२) अर्हता धारण केल्यानंतर तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा. कमाल वयोमर्यादा – ३८ वष्रे (खुला प्रवर्ग); ४३ वष्रे (मागासवर्गीय). परीक्षा शुल्क – रु. ४००/- सर्व प्रवर्गाकरिता. निवडीचे निकष – (१) ऑनलाईन/लेखी परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची – एकूण – ८० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास एक गुण. कालावधी – ७५ मिनिटे. (२)मुलाखत – २० गुण. लेखी परीक्षा – पार्ट-१ – सामान्यज्ञान, कलचाचणी आणि इंग्रजी भाषा आकलन – ३० गुण. पार्ट-२ – विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील मूलभूत कौशल्य – २० गुण. पार्ट-३ – पर्यावरण संबंधी कायदे, हवा, पाणी आणि कचरा व्यवस्थापन – पर्यावरण समस्या – ३० गुण. ऑनलाइन अर्ज http://www.mpcb.gov.in किंवा MKCL यांच्या http://oasis.mkcl.org/mpcb 2014 या संकेत स्थळावर २१ ऑगस्ट २०१६ पर्यंत करावेत. वरील पदभरतीकरिता मंडळाकडून डिसेंबर २०१४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाइन अर्ज स्वीकृत झालेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये.

* जिल्हा स्तरावरील लिपिक टंकलेखक, तलाठी पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा निवड समितीकडून जाहिराती प्रसिद्ध – (१) ठाणे जिल्हा निवड समितीची जाहिरात (तलाठी – १४ पदे) लोकसत्ता ६.८.२०१६. (२) रत्नागिरी जिल्हा (लिपिक टंकलेखक – १६ पदे, तलाठी – २३ पदे). (३) जळगाव जिल्हा – (लिपिक टंकलेखक/कनिष्ठ लिपिक – १५ पदे, तलाठी ५० पदे). पात्रता – (अ) लिपिक टंकलेखक – (१) १० वी उत्तीर्ण, (२) ३० श.प्र.मि. मराठी आणि ४० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखनाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (ब) तलाठी – पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा – ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रे) परीक्षा शुल्क – रु. ३००/- (मागासवर्गीय रु. १५०/-) अधिक बँक प्रोसेसिंग चार्जेस. ऑनलाइन पद्धतीने अर्ज (१) ठाणे जिल्ह्य़ासाठी – <http://thanecollector.maharecruitment.co.in (दि. १८/२० ऑगस्ट २०१६र्प्यत/ परीक्षा दि. ११ सप्टेंबर २०१६) (२) रत्नागिरी जिल्हा – http://www.ratnagiri.nic.in ( २२/२३ ऑगस्ट २०१६ ). (३) जळगाव जिल्हा – http://www.jalgaon.gov.in/www.jalgaon.nic.in (२० ऑगस्ट २०१६पर्यंत) आपल्या जिल्ह्य़ासाठीची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात पाहावी.
* माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (जाहिरात क्र. ५०/२०१६) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन) च्या ४ पदांची भरती. वेतन – ग्रेड ई-१ १६,४०० रुपये -४०,५०० रु. एकूण वेतन – सीटीसी ७.१९ लाख. पात्रता – एम्बीए किंवा एच्आर्/ एच्आर्डी/ पर्सोनेस मॅनेजमेंट/ लेबर लॉज/ इंडस्ट्रियल रिलेशन्स/ सोशल वर्क इ. मधील दोन वर्षांची पदवी/पदविका. पात्रतेच्या परीक्षेत किमान ६० गुण आवश्यक. कमाल वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१६ रोजी २८ वष्रे. निवड पद्धती – (१) ऑनलाईन लेखी परीक्षा (अ) संबंधित विषयावर आधारित -१०० गुण, (ब) सामान्य कला चाचणी – सामान्य ज्ञान, कारणे, इंग्रजी, सांख्यिकीय क्षमता – ७० गुण. (२) मुलाखत – ३० गुण. अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांतील गुणवत्तेनुसार. अर्ज कसा करावा – ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://www.mazdock.com या संकेतस्थळावर १ सप्टेंबर २०१६ पर्यंत करावेत. परीक्षा शुल्क – ३४० रुपये. स्टेट बँक मार्फत. ऑनलाईन अर्जाची पिंट्रआऊट आणि चलनाची एम्डीएल् – प्रत सोबत सीएम् (एच्आर्-सीआर्), एक्झिक्युटीव्ह रिव्रुटमेंट सेक्शन, दुसरा मजला, माझगाव डॉक हाऊस, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, डॉकयार्ड रोड, मुंबई – ४०००१० या पत्त्यावर १६ सप्टेंबर २०१६ पर्यंत पोहोचेल अशी पाठवा.