बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलामध्ये अग्निशामक पदाची भरती.
एकूण पदे – ७७४ (अजा – ९८, अज -६१, विजा (अ) – २१ भज (ब) – १२, भज (क) – २६, भज (ड) – १४, इमाव -१७०, विमाप्र – १३, खुला – ३५९) वेतन – पे बँड – १. ५,२०० – २०,२०० ग्रेड पे १,९५० अनुज्ञेय भत्ते एकूण वेतन रु. २०,५००/-
पात्रता – (१) १२ वी किमान ५०टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण; (२) १० वी किंवा १२ वी १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण; (३) शारीरिक मापदंड – (अ) उंची – पुरुष १७२ सें.मी., महिला – १६२ सें.मी., (ब) छाती – पुरुष ८१ – ८६ सें.मी., (क) वजन – ५० कि.ग्रॅ., (ड) दृष्टी – चष्मा किंवा तत्सम साधनाशिवाय नेहमीची (सामान्य); (५) वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१६ रोजी २०-२५ वष्रे (मागासवर्गीय – २०-३० वष्रे); (५) जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणाऱ्यांना प्राधान्य.
निवडीचे निकष – (१) मदानी चाचणी – १२० गुण (२) प्रमाणपत्र चाचणी – १०० गुण, एकूण – २२० गुण. मदानी चाचणी आणि प्रमाणपत्र चाचणीत मिळालेले गुण (शैक्षणिक अर्हतेचे गुण वगळून) अशा एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यातून निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीस पाठविले जाईल. वैद्यकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ३,०००/- पाठय़वेतन दिले जाईल.
अर्ज कसा करावा – अर्ज विहित नमुन्यातील स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टीने पूर्ण भरलेले असावेत. विस्तृत माहिती आणि अर्जाचा नमुना http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका, बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्र, बोरिवली अग्निशमन केंद्र, डॉन बॉस्को हायस्कूलजवळ, गोराई रोड, मुंबई-४०० ०९१. वेळ – सकाळी ८ वाजता.
अर्जासोबत सादर करायाची प्रमाणपत्रे – जन्म दाखला/जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र, संबंधित गुणपत्रिका, व्यावसायिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र, क्रीडा व इतर प्रमाणपत्र, चालक परवाना, जाती प्रमाणपत्र, असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र इ. यांच्या मूळ व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतींसह भरतीसाठी नेमलेल्या दिवशी हजर राहावे.
भरतीचे वेळापत्रक – दि. ४ ऑगस्ट २०१६च्या पेपरमधील जाहिरातीत १२वीतील टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहावयाचे वेळापत्रक दिले आहे. खुला प्रवर्ग सोडून पुढील सर्व प्रवर्गाना
(३ ते४) ५०टक्के किंवा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांसाठी
(३) अजा – २३ ऑगस्ट (४) अज – २४ ऑगस्ट (५) विजा (अ) २५ ऑगस्ट (६) भज (ब) २६ ऑगस्ट भज (क) २७ ऑगस्ट (८) भज (ड) २९ ऑगस्ट (९) वि.मा.प्र. – ३० ऑगस्ट (७) इमाव १२ वीला (५०टक्के ते ५०.९९टक्के गुण) – २ सप्टेंबर (११) इमाव – १२ वीला ६०टक्के किंवा अधिक गुण – ३१ ऑगस्ट. उमेदवारांना टक्केवारीनुसार ज्या दिनांकाला बोलाविण्यात आलेले आहे त्याच दिनांकाला हजर राहणे आवश्यक आहे. इतर दिवशी हजर राहिल्यास त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
मदानी चाचणी – पुरुष (अ) ३ मिनिटांमध्ये ८०० मीटर्स धावणे (पात्रता फेरी) (ब) १९ फूट उंचीवरून जंपिंग शीटमध्ये उडी मारणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील. (क) जमिनीपासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४ फूटवरील उंचीच्या) अ‍ॅल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे (आरंभ रेषेपासून शिडी २० फूट अंतरावर असेल) (ड) ५० कि.ग्रॅ. वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर अंतर धावणे. (क) आणि (ड) साठी (१) २० सेकंदांपेक्षा कमी – ४० गुण (२) २०.१ सेकंद ते ३० सेकंद – २५ गुण (३) ३०.१ सेकंद ते ४० सेकंद – १० गुण (४) ४० सेकंदांपेक्षा जास्त – शून्य गुण (इ) २० फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे (रस्सीवर चढते वेळी फक्त हाताचा वापर करणे. पायाचा वापर करता येणार नाही केल्यास शून्य गुण मिळतील. (१) रस्सी पूर्ण चढल्यास – ३० गुण, (२) १५ फूट चढल्यास – २० गुण (३) १/२ चढल्यास (१० फुट) – १० गुण (४) अध्र्यापेक्षा (१० फुटांपेक्षा) कमी अंतर चढल्यास शून्य गुण (ई) २० पुलअप्स काढणे. प्रत्येक पुलअपला १/२ गुण देण्यात येईल. (एकूण १० गुण)
(८)मदानी चाचणी – महिला –
(अ) ४ मिनिटांमध्ये ८०० मीटर्स धावणे (पात्रता फेरी)
(ब) १९ फूट उंचीवरून जंपिंग शिटमध्ये उडी मारणारी उमेदवार पुढील चाचणीस पात्र
(क) जमिनीपासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४ फूट वरील उंचीच्या) अ‍ॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (आरंभ रेषेपासून शिडी २० फूट अंतरावर असेल) (१) ३० सेकंद किंवा ३० सेकंदांपेक्षा कमी – ४० गुण (२) ३०.१ सेकंद किंवा ४० सेकंदांपर्यंत – ३० गुण (३) ४०.१ सेकंद ते ५० सेकंदांपर्यंत – २० गुण (४) ५०.१ सेकंद ते ६० सेकंदांपर्यंत – १० गुण (५)६० सेकंदांपेक्षा जास्त – शून्य गुण
(ड) ४० कि.ग्रॅ. वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मी. अंतर धावणे – (१) २५ सेकंद किंवा २५ सेकंदांपेक्षा कमी वेळ – ४० गुण (२) २५.१ सेकंद ते ३५ सेकंदांपर्यंत – २० गुण (३) ३५.१ सेकंद ते ४५ सेकंदांपर्यंत – १० गुण (४) ४५ सेकंदांपेक्षा जास्त – शून्य गुण
(इ) गोळाफेक (४ कि.ग्रॅ.) (१) ६ मी. व त्यापेक्षा जास्त – १०गुण (२) ५ मीटर ते ६ मीटरपेक्षा कमी ७ गुण (३) ४ मी. ते ५ मी.पेक्षा कमी – ४ गुण (४) ४ मी.पेक्षा कमी ० गुण
(ई) लांब उडी – (१)१५ फूट व त्यापेक्षा जास्त – १५ गुण (२) १२ फूट ते १५ फुटांपेक्षा कमी – १० गुण (३) ९ फूट ते १२ फुटांपेक्षा कमी – ५ गुण (४) ९ फुटांपेक्षा कमी – शून्य गुण
(फ) १५ पुशअप्स (जोर काढणे) प्रत्येक पुशअपला एक गुण.
प्रमाण पत्र चाचणी – (पुरुष व महिला) –
(अ) (१)अग्निशामक प्रमाणपत्र धारकास – १० गुण (२)दुय्यम अधिकारी प्रमाणपत्रधारकास – १५ गुण (एकूण २५ गुण)
(ब) (१)राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूस – १० गुण (२) राज्यस्तरीय खेळाडूस – ६ गुण (३) जिल्हा पातळीवरील खेळाडूस – ४ गुण (एकूण २० गुण)
(क) एनसीसी प्रमाणपत्र (शालेय पातळीवरील एमसीसी प्रमाणपत्र) (१) ‘सी’ प्रमाणपत्र – १० गुण (२)बी प्रमाणपत्र – ६ गुण (३) ‘अ’ प्रमाणपत्र – ०४ गुण
(ड) जड वाहनचालक प्रमाणपत्र (दि. १ सप्टेंबर २०१६ रोजी किमान ४ वर्षांपूर्वीचे) – १० गुण
(इ) (१) नागरी सेवादलाच्या अग्निशमन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र – ६ गुण (२) होमगार्डमध्ये कमीत कमी ३ वष्रे सेवा केल्याचे प्रमाणपत्र – गुण
(ई) सरकारी/निमसरकारी संस्था यांच्याकडे समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून एक वर्ष सेवा असल्यास अथवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीवरक्षक म्हणून किमान सहा महिने सेवा असल्यास – १५ गुण.

नॅशनल प्रोजेक्ट कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स) च्या १० जागा-
उमेदवार सीए, आयसीडब्ल्यूए वा एमबीए (फायनान्स) यासारखे पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील एनबीसीसीची जाहिरात पहावी अथवा कंपनीच्या http://www.upcc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१६.

टाटा मेमोरियल सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, खारघर, नवी मुंबई येथे टेक्निशियनच्या ३ जागा-
अधिक माहितीसाठी टाटा मेमोरियल सेंटरच्या http://www.actrec.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१६.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदाच्या २०० जागा-
अर्जदार सीए, आयसीडब्ल्यूए, एमबीए- फायनान्स, सीएआयआयबी यांसारखी पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील बँक ऑफ महाराष्ट्रची जाहिरात पहावी.किंवा बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. http://www.bankofmaharashtra.in संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१६.

नौदलात २९ जागा-
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व ड्राफ्टसमनची पात्रता पूर्ण केलेले असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पहावी अथवा http://www.indiannavy.nic.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (नेव्ही), डायरेक्टोरेट जनरल ऑफ नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्शन, वेस्ट ब्लॉक ५, विंग १ (एफ, एफ),आरके पुरम, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१६.

नौदलात ड्राफ्टसमनच्या ४८६ जागा-
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन वा इलेक्ट्रिकल ड्राफ्टसमनची पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकात नौदलाची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज फ्लॅग ऑफिसर कमांडिंग (सिव्हिलियन रिक्रुटमेंट सेल), हेडक्वार्टर्स सदर्न नेव्हल कमांड, कोची- ६८२ ००४. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१६.

स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबाद येथे टेक्निशियन्सच्या ९२ जागा-
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबादची जाहिरात पहावी अथवा http://www.sac.gov.in http://recruitment.sac.gov.in/OSAR या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१६.

महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे ३४ तलाठी पदांची भरती.
पात्रता – पदवी उत्तीर्ण, वयोमर्यादा- १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय १८ ते ४३ वर्षे) ऑनलाइन अर्ज http://www.ahemednagar.nic.in किंवा http://exams.chanakyasoft.in/anagarcollector या संकेतस्थळावर २४ ऑगस्ट २०१६पर्यंत भरावेत. फी भरण्याची शेवटची तारीख
२५ ऑगस्ट २०१६

‘सी-डॅक’मध्ये तांत्रिक व संशोधन क्षेत्रात २३ जागा:
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘सी-डॅकच्या http://www.cdac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१६.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक्स, बंगलोर येथे साइंटिफिक असिस्टंटच्या ७ जागा-
उमेदवार बीएस्सी अथवा माइनिंग मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक्स, आऊटर रिंग रोड, ईश्वर नगर, बीएसके २ स्टेज, बंगलोर ५६० ०७० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१६.

भारतीय सैन्यदलात अभियंत्यांसाठी १५० संधी
अर्जदार इंजिनीअिरगमधील पदवीधर असावेत अथवा इंजिनीअिरग पदवी परीक्षेला बसलेले असावेत व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ जुलै २०१६ च्या अंकातील सैन्यदलाची जाहिरात पाहावी. अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१६.

‘इस्त्रो’मध्ये टेक्निकल असिस्टंटच्या २१ जागा

उमेदवार इंजिनीअरिंगमधील पदविका परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील प्रकाशित झालेली इस्रोची जाहिरात पहावी. अथवा इस्रोच्या http://sdsc.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१६.
द. वा. आंबुलकर/ सुहास पाटील