‘इस्रो’ बंगलोर येथे आचाऱ्याच्या ५ जागा :

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व पाकशास्त्रातील प्रशिक्षित असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ ऑगस्ट २ सप्टेंबर २०१६ च्या अंकातील इस्त्रोची जाहिरात पहावी अथवा इस्रोच्या http://www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (रिक्रुटमेंट), इस्रो हेडक्वार्टर्स, अंतरिक्ष भवन, न्यू बीईएल रोड, बंगलोर- ५६००९४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१६.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे संशोधन साहाय्यक म्हणून संधी-

वयोमर्यादा ३३ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ सप्टेंबर २०१६ च्या अंकातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेची जाहिरात पहावी अथवा संस्थेच्या http://www.tifr.res.in/ positions या संकेतस्थळाला भेट द्यावी.  संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१६.

सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी, हैद्राबाद येथे स्टेनोग्राफर्सच्या १२ जागा-

उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी लघु लेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी डायरेक्टर (एस्टॅब्लिशमेंट), सरदार वल्लभभाई पटेल, नॅशनल पोलीस अकादमी, हैद्राबाद- ५०००५२

या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१६.

केंद्र शासित दीव व दमण प्रशासनात वर्कशॉप इन्स्ट्रक्टर म्हणून संधी-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी इंजिनीअरिंगमधील पदविका पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट

न्यूजच्या २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली दमण- दीव प्रशासनाची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज ऑफिस ऑफ दी प्रिंसीपॉल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, वरकुंड, नानी दमण, दमण ३९६२१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१६.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येते कनिष्ठ अभियंता म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या http://www.sgbau.ac.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१६

संत गाडगेबाबा- अमरावती विद्यापीठात सुरक्षा अधिकारी म्हणून संधी : अधिक माहिती व तपशिलासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या http://www.sgbau.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१६.

संरक्षण उत्पादन मंत्रालयात कुशल कामगारांच्या १७१ जागा-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ सप्टेंबर २०१६ च्या अंकातील संरक्षण उत्पादन विभागाची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडिंग ऑफिसर एरोनॅटिकल क्वालिटी अ‍ॅशुरन्स विंग (आर्मामेंट), डीजीएक्यूए, संरक्षण मंत्रालय, खमारिया, जबलपूर ४८२००५ (म.प्र.) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१६.

संरक्षण मंत्रालयांतर्गत सैनिकी गुप्तचर प्रशिक्षण संस्था, पुणे येथे कुशल कामगारांच्या ८ जागा-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ सप्टेंबर २०१६ च्या अंकातील संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट, मिलिटरी इंटेलिजंस ट्रेनिंग स्कूल आणि डेपो, वानवडी मार्ग, पुणे- ४११ ०४० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१६.

सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला पुणे येथे क्राफ्टसमनच्या २ जागा-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय कौशल्य परीक्षा पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणेची जाहिरात पहावी अथवा सेंटरच्या http://www.cwprs. gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज दी चीफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणे- ४११०२४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१६.

गेल (इंडिया) लि.मध्ये अधिकारीपदाच्या विविध संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी गेल (इंडिया) लि.च्या http://www.gailonline.com> careers  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१६.

भारतीय वायू सेनेत अविवाहीत पुरुष उमेदवारांना एअरमन ग्रुप एक्स् (टेक्निकल)/ग्रुप वाय् (नॉन-टेक्निकल)च्या पदांसाठी भरती परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी, २०१७ मध्ये घेतली जाईल.

पात्रता – (अ) एअरमन ‘ग्रुप एक्स’ – गणित, फिजिक्स आणि इंग्रजी विषयांसह १२ वी सरासरी किमान ५० गुणांसह आणि इंग्रजी विषयात किमान ५०गुण किंवा किमान ५० गुणांसह अभियांत्रिकी पदविका (कोणत्याही शाखेतील) आणि १० वी/१२ वी किंवा पदविकेला इंग्रजीत किमान ५० गुण.

(ब) एअरमन ग्रुप ‘वाय’ (नॉन-टेक्निकल) – १२वी (कोणतीही शाखा) सरासरी किमान ५० आणि इंग्रजीत किमान ५० गुण.

(क) एअरमन ग्रुप ‘वाय’ (नॉन-टेक्निकल) मेडिकल असिस्टंट ट्रेड्स – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह सरासरी किमान ५० गुणांसह आणि ‘इंग्रजी’ विषयात किमान ५० गुण

(ड) एअरमन ग्रुप ‘एक्स’ आणि ‘वाय’ – फिजिक्स, गणित, इंग्रजी विषयांसह सरासरी किमान ५० गुणांसह उत्तीर्ण. इंग्रजी विषयात किमान ५० गुण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. ७ जुल १९९७ आणि २० डिसेंबर २००० या दरम्यानचा असावा.

उंची – किमान १५२.५ सें.मी.

छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

ट्रेनिंग – सुरुवातीला जॉईंट बेसिक फेज ट्रेनिंग (जेबीपीटी) बेसिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बेळगाव  येथे. जेबीपीटी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना खालील ट्रेड्समधील ट्रेनिंगसाठी वाटप केले जाईल.

(अ) ग्रुप ‘एक्स’ (टेक्निकल) फिटर – इलेक्ट्रॉनिक्स,  इलेक्ट्रिकल,  स्ट्रक्चर, प्रॉप्युल्शन, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल सिस्टीम,  व्हेपन, वर्कशॉप (स्मिथ), वर्कशॉप (मेकॅनिकल),

(ब) ग्रुप ‘वाय’ (नॉन-टेक्निकल) अ‍ॅडमिन असिस्टंट,  अकाऊंट्स असिस्टंट, लॉजिस्टिक असिस्टंट, इनíव्हटॉनमेंट सपोर्ट सíव्हस असिस्टंट, ऑपस् असिस्टंट, कम्युनिकेशन टेक्निशियन, मेटीऑरॉजिकल असिस्टंट,  मेडिकल असिस्टंट.

स्टायपेंड – प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. ११,४००/- विद्यावेतन दिले जाईल.

वेतन – ग्रुप एक्ससाठी दरमहा रु. २६,६८५/- ग्रुप ‘वाय्’साठी रु. २३,५३५/- अधिक इतर भत्ते. ग्रुप इन्शुरन्स रु. ३७.५ लाख रुपयांचे रु. २,३००/- च्या दरमहा प्रीमियमवर. निवड पद्धती -(अ) लेखी परीक्षा – ग्रुप एक्ससाठी इंग्रजी, फिजिक्स आणि गणित या विषयांवर दहावी आणि बारावी सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित ६० मिनिटे कालावधी.

ग्रुप ‘वाय’साठी इंग्रजी विषयावर दहावी आणि बारावी सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित आणि रिझिनग आणि जनरल अवेअरनेस (आरएजीए)

कालावधी – ४५ मिनिटे.

ग्रुप एक्स आणि ग्रुप वायसाठी इंग्रजी, गणित, फिजिक्स १ दहावी आणि बारावी सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित आणि आरएजीए कालावधी ८५ मिनिटे.

(ब) अ‍ॅडॅप्टिबिलिटी टेस्ट – १

(क) शारीरिक क्षमता चाचणी –  १.६ कि.मी. ७ मिनिटांत धावणे, १० पुशअप्स,  २० स्कॅट्स अप्स,

(ड) अ‍ॅडॅप्टिबिलिटी टेस्ट – २

(ई) वैद्यकिय तपासणी ऑल इंडिया सिलेक्ट लिस्ट एअरमन सिलेक्शन सेंटर्स आणि पुढील संकेतस्थळावर दि. ३१ ऑक्टोबर २०१७ ला प्रदíशत केली जाईल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://www.airmenselection.gov.in, http://www.airmenselection.gov.in  या संकेतस्थळावर दि. २९ सप्टेंबर २०१६ पर्यंत करावा.

द. वा. आंबुलकर, सुहास पाटील