एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली (जाहिरात क्र. १२/२०१६) मध्ये () प्रोजेक्ट मॅनेजर, () डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर, () ज्युनियर इंजिनीअर, (/) डेप्युटी/असिस्टंट मॅनेजर, () मॅनेजमेंट ट्रेनीच्या एकूण १०० पदांची भरती.

पात्रता – पद क्र. (१) व (२) साठी सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी ६/३/२ वर्षांचा अनुभव. पद क्र. (३) साठी सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा. पद क्र. (४), (५) साठी एमबीए  ३/२ वर्षांचा अनुभव. पद क्र. (६) साठी सीए/एमबीए. ऑनलाइन अर्ज www.nbccindia.com वर दि. १९ डिसेंबर २०१६पर्यंत भरावेत.

जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट

(जेईएसटी – २०१७) –

पुढील नावाजलेल्या संशोधन संस्थांमध्ये फिजिक्स/ थिअरॉटिकल कॉम्प्युटर सायन्स/न्युरो सायन्स या विषयातील पीएचडी/इंटिग्रेटेड पीएचडी प्रवेशासाठी पात्रता परीक्षा दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी होणार.

(१) एचबीएनआय, मुंबई,

(२) टीआयएफआर, मुंबई,

(३) आरआरसीएटी, इंदौर,

(४) एनसीआरए – टीआयएफआर, पुणे

(५) आयआयएसईआर, पुणे, भोपाळ, इ.

पात्रता – इंटिग्रेटेड पीएचडीसाठी फिजिक्स/मॅथेमॅटिक्स विषयातील पदवी उमेदवाराकडे असावी.

रेग्युलर पीएचडीसाठी – एमएस्सी (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) बीई, इ. ऑनलाइन अर्ज www.jest.org.in  वर दि. १६ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत.

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील अविवाहित युवकांना सुवर्णसंधी.

महाराष्ट्र शासनाच्या ‘सनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय), औरंगाबाद’ येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) स्पर्धात्मक परीक्षेस बसण्याची तयारी करवून घेण्यासाठी प्रशिक्षण. पात्रता – उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर २००० ते ३१ डिसेंबर २००२ च्या दरम्यानचा असावा. उमेदवार मार्च/एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या एसएससी परीक्षेला बसणारा असावा.

किमान शारीरिक पात्रता – उंची – १५७ सें.मी. वजन – ४३ किलो. छाती – ७४ ते ७९ सें.मी. दृष्टी – चष्मा लावून जास्तीतजास्त ६/९ तसेच रातआंधळेपणा नसावा.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा एप्रिल २०१७ मध्ये कोल्हापूर, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद केंद्रांवर घेतली जाईल. लेखी परीक्षा ही इ. दहावीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित ज्यात एक पेपर ‘गणित’ आणि दुसरा पेपर ‘जनरल अ‍ॅबिलिटी’चा असेल. प्रत्येकी ७५ गुण. लेखी परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमातूनच घेतली जाते. लेखी परीक्षा व तोंडी मुलाखतीच्या सविस्तर माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ www.spiaurangabad.com पाहावे. अर्ज करण्याची पद्धत – (अ) ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर करावेत.

(ब) ऑफलाइन पद्धत – प्रवेश अर्ज व बँक चलान संस्थेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज संस्थेच्या पत्त्यावर दि. १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

भाभा ॅटॉमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) जाहिरात क्र. /२०१६ (आर). न्यूक्लियर रिसायकल बोर्ड (एनआरबी) बीएआरसी तारापूरमध्ये कॅटॅगरीस्टायपेंडरी ट्रेनी (१५७ पदे) आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क (१० पदे) यांची भरती.

(१) प्लांट ऑपरेटर (२० पदे), (२) ते (१९) इलेक्ट्रिशियन (३९ पदे), मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट) (१९ पदे), मेसॉन (गवंडी) (१४ पदे), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (९ पदे), वेल्डर (८ पदे) इ. एकूण १३७ पदे,

(२०) डीआर – २ – अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी) (१० पदे)

पात्रता – (१) प्लांट ऑपरेटर – बारावी (विज्ञान) (पीसीएम) किमान ६०% गुण.  (२) ते (१९) – दहावी (विज्ञान आणि गणित विषयांसह) किमान ६०%  गुण  संबंधित ट्रेडमधील आयटीआय

वयोमर्यादा – (३१ डिसेंबर २०१६ रोजी) १८ ते २२ वष्रे (इमाव – २५ वष्रे, अजा/अज – २७ वष्रे), (२०) यूडीसी – पात्रता – पदवी किमान ५०%  गुण. इष्ट पात्रता – इंग्रजी टायिपग – ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा – १८ ते २७ वष्रे (इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे) (परित्यक्ता/विधवा महिला – खुला गट ३५ वष्रे, इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे) (विकलांग ओएच (२ पदे), एचएच(१ पद), खुला – ३७ वष्रे, इमाव – ४० वष्रे, अजा/अज – ४२ वष्रे)

वेतन दरमहा – रु. २६,०००/- /

रु. ३०,०००/-  ऑनलाईन अर्ज www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळावरील  ‘How to apply’ या पर्यायावर क्लिक करून दि. १३ डिसेंबपर्यंत करावेत.